पुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त कार्यपद्धतींच्या अवलंबाअभावी राज्यात गाय-म्हशींची
टेक्नोवन
सागरी पवनचक्क्यांच्या उभारणीतील आव्हानांचा विचार आवश्यक
गेल्या काही वर्षांपासून अमेरिकी ऊर्जा विभागाच्या वतीने पवन ऊर्जेच्या संदर्भात समुद्रामध्ये पवनचक्क्यांच्या उभारणीचे आव्हानात्मक नियोजन केले आहे. मात्र, या विंड टर्बाईनच्या निर्मितीसाठी आवश्यक दुर्मिळ धातूंच्या पुरवठ्यातील आव्हानामुळे नियोजनाप्रमाणे लक्ष्य गाठणे तितके सोपे राहिले नसल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
गेल्या काही वर्षांपासून अमेरिकी ऊर्जा विभागाच्या वतीने पवन ऊर्जेच्या संदर्भात समुद्रामध्ये पवनचक्क्यांच्या उभारणीचे आव्हानात्मक नियोजन केले आहे. मात्र, या विंड टर्बाईनच्या निर्मितीसाठी आवश्यक दुर्मिळ धातूंच्या पुरवठ्यातील आव्हानामुळे नियोजनाप्रमाणे लक्ष्य गाठणे तितके सोपे राहिले नसल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
गेल्या दशकामध्ये अमेरिकेमध्ये पवन ऊर्जेची उपलब्धता तीन पटीने वाढली आहे. हा देशातील सर्वात मोठा अपारंपरिक ऊर्जा स्रोत बनल्याचे मत अमेरिकन पवन ऊर्जा संघटनेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अमेरिकेतील ४१ राज्यांमध्ये ५६,८०० पेक्षा जास्त विंड टर्बाईन असून, त्यातून ६ टक्क्यांपेक्षा अधिक विद्युत ऊर्जा तयार होते. या व्यवसायातून १०५,००० रोजगार उपलब्ध होत असून, अब्जावधी डॉलरची खासगी आणि सार्वजनिक गुंतवणूक करण्यात आली आहे.
सध्या बहुतांश पवन ऊर्जा फार्म हे जमिनीवरील असून, केवळ एक व्यावसायिक फार्म ऱ्होड बेटावरील किनारावर्ती भागामध्ये आहे. या पाण्यातील पवन उर्जेला चालना देण्याचे धोरण अमेरिकी ऊर्जा विभागाने आखले आहे. मात्र, येल विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार ही पाण्यावरील पवन ऊर्जा ही तितकी सोपी आणि पर्यावरणपूरक राहणार नसल्याचे मत मांडले आहे. येल विद्यापीठातील पोस्ट डॉक्टरल विद्यार्थी व सध्या इस्राईल येथील आयडीसी हर्झलिया येथील व्याख्याता असलेल्या टॉमर फिशमॅन आणि अमिरात येथील प्रो. थॉमस ग्रेईडेल यांनी जर्नल नेचर सस्टेनेबिलिटी मध्ये लिहिलेल्या आपल्या लेखामध्ये हे मत मांडले आहे.
त्यांच्या मते समुद्रातील पवनचक्क्यांच्या निर्मितीसाठी आवश्यक दुर्मिळ धातूंचा पुरवठा करण्यामध्ये अडचणी उद्भवतील. त्याच प्रमाणे पर्यावरणासह आर्थिक आणि भौगोलिकदृष्ट्याही अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
त्याविषयी माहिती देताना फिशमॅन यांनी सांगितले, की ऱ्होड बेटांवर प्रचंड आकारमानाच्या व उंचीच्या पवनचक्क्या लावण्यात आल्या आहेत. एकेका पात्याची लांबी ही फूटबॉलच्या मैदानापेक्षाही मोठी आहे. या टर्बाईनसाठी मोठ्या आकाराच्या शक्तीमान चुंबकांची गरज भासते. या चुंबकाच्या निर्मितीसाठी नियोडिमियम सारखे दुर्मिळ भूखनिज (अंदाजे २००० पौंड वजनाचे) आवश्यक असते.
- जगातील नियोडिमियमचे सर्व साठे हे चीनमध्ये असून, तिथे पर्यावरणाचे नियम तुलनेने कमी असल्याने त्याची किंमत स्वस्त पडते. या खनिजापासून चुंबकाची निर्मिती ही जपानमध्ये केली जाते. त्यानंतर ते फ्रान्स मध्ये आयात करून विंड टर्बाईनमध्ये बसवले जातात. यातील प्रत्येक टप्पा हा अमेरिकेपासून दूर पार पडतो. त्यामुळे यातील कोणत्याही टप्प्यावर अडचणी येऊ शकतात. विशेषतः सध्या चीन आणि अमेरिकेच्या दरम्यान व्यापार युद्ध सुरू आहे, त्याचा फटका या उद्योगाला बसण्याची शक्यता फिशमॅन व्यक्त करतात.
- अमेरिकी ऊर्जा विभागाच्या नियोजनामध्ये नियोडिमियमच्या उपलब्धतेचा विचार करण्यात आलेला नाही. पूर्वी कॅलिफोर्नियातील पास रेअर पर्वतांच्या प्रदेशातील खाणीतून हे खनिज उपलब्ध होत होते. मात्र, आर्थिक अडचण आणि पर्यावरणाच्या समस्येमुळे येथील प्रकल्प काही वर्षांपूर्वीपासून बंद आहे.
- फिशमॅन आणि ग्रेईडेल यांनी पवन ऊर्जा निर्मितीच्या नियोजनातील संभाव्य अडचणीचा अभ्यासामध्ये वेध घेतला आहे. त्यातही समुद्रामध्ये उभारण्यात येणाऱ्या पवन ऊर्जा प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे मिळवावी लागणार आहेत. खनिजांचे पुनर्चक्रीकरण, पुनर्वापर यावर काम करावे लागेल. समस्या असल्या तरी समुद्रातील पवन ऊर्जेचे अनेक फायदेही उत्तम व्यवस्थापनातून साधता येतील.
- 1 of 14
- ››