परभणी ः ‘‘परभणी जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात कृषी तसेच पशुसंवर्धन
टेक्नोवन
अर्का किरण’ पेरू वाणाची अति सघन लागवड फायदेशीर
जी. क्रांती कुमार यांनी पेरूच्या अर्का किरण या नव्या संकरित वाणांची लागवड अति सघन पद्धतीने केली. पारंपरिक पद्धतीने बाजारपेठेत विक्री करण्यासह त्यांनी पेरूचा रस करून विक्री करण्याचा पर्यायही निवडला.
आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील इसुका दार्सी या गावातील शेतकरी जी. क्रांती कुमार यांनी पेरूच्या अर्का किरण या नव्या संकरित वाणांची लागवड अति सघन पद्धतीने केली. पारंपरिक पद्धतीने बाजारपेठेत विक्री करण्यासह त्यांनी पेरूचा रस करून विक्री करण्याचा पर्यायही निवडला. त्यातून त्यांच्या नफ्यामध्ये १८ हजार रुपयांनी वाढ झाली.
जी. क्रांती कुमार यांना बंगळूर येथील फळबाग संशोधन संस्थेला भेट दिल्यानंतर या नवीन वाणाविषयी माहिती समजली. या वाणाची लागवड करण्यासाठी त्यांनी संस्थेमध्ये खास प्रशिक्षण घेतले. आंध्र प्रदेशातील प्रमाणित रोपवाटिकेतून रोपांची खरेदी केली.
- अति सघन पद्धतीने लागवड करण्याचे नियोजन केले. त्यासाठी २ बाय १ मीटर अंतराप्रमाणे एकरी २००० रोपे या प्रमाणे रोपांची खरेदी केली.
- सप्टेंबर २०१८ मध्ये पहिली पाच एकर, तर फेब्रुवारी २०१९ मध्ये दुसरी पाच एकर क्षेत्रामध्ये लागवड केली.
- संस्थेच्या मार्गदर्शनानुसार भरपूर प्रमाणात सेंद्रिय खतांसह दशपर्णी अर्क, शेण स्लरी, जीवामृत अशा जैविक घटकांचा वापर केला.
- पहिल्या वर्षी ७ टन उत्पादन मिळाले. त्याला दर ही ३५ हजार रुपये प्रति टन असा मिळाला.
- बाजारपेठेमध्ये विक्री करण्यासह पेरूचा रस विकण्याची कल्पना लढवली. ६० रुपये प्रति लिटर या दराने सुमारे ३०० लिटर रस विकला.
- या साऱ्या उपक्रमातून त्याला पहिल्या २.४५ लाख रुपये उत्पन्न मिळाले. दुसऱ्या वर्षी २० टन उत्पादन येण्याचा अंदाज असून, त्यातून उत्पन्नामध्ये आणखी वाढ होणार आहे.
- उत्पादन खर्च हा सुमारे ३ लाख रुपये झाला. खर्च नफ्याचे गुणोत्तर १ ः २.०४ इतके राहिले.
- रसाची विक्री केल्यामुळे पहिल्या वर्षी त्याला १८ हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले.
अर्का किरण ः
बंगळूर येथील भारतीय फळबाग संशोधन संस्थेने अर्का किरण या पेरूच्या संकरित वाण विकसित केला आहे. हा उत्तम दर्जाचा वाण असून, मध्यम व गोल आकाराचे फळ येते. त्याचा गर घट्ट असून, त्यात लायपीन प्रमाण (७.१४ मि. ग्रॅ. प्रति १०० ग्रॅम) उच्च पातळीवर आहे.
- 1 of 22
- ››