agriculture stories in marathi technowon curry leaves powder | Agrowon

कढीपत्ता भुकटी निर्मिती

डॉ. आर. टी. पाटील
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

कढीपत्ता हा आहारामध्ये स्वाद वाढवण्यासाठी, रुचकर करण्यासाठी प्रामुख्याने वापरला जातो. त्यांचा वापर वाढवfण्यासाठी विविध पदार्थ किंवा कॅप्सूल निर्मिती करता येते. त्यासाठी कढीपत्ता वाळवून त्याची भुकटी करून घ्यावी.

कढीपत्ता (शास्त्रीय नाव - Murraya koenigi) हे भारतीय झाड असून, त्याच्या पानांचा वापर भारतीय उपखंडातील अनेक व्यंजनांमध्ये केला जातो. प्रामुख्याने त्याचा वापर कढी, आमटी यांमध्ये केला जात असल्याने त्याला कढीपत्ता किंवा इंग्रजीमध्ये करी लिव्हज या नावाने ओळखले जाते. अनेक भारतीय भाषांमध्ये त्याला गोड निंबाची पाने या नावाने ओळखले जाते.

कढीपत्ता हा आहारामध्ये स्वाद वाढवण्यासाठी, रुचकर करण्यासाठी प्रामुख्याने वापरला जातो. त्यांचा वापर वाढवfण्यासाठी विविध पदार्थ किंवा कॅप्सूल निर्मिती करता येते. त्यासाठी कढीपत्ता वाळवून त्याची भुकटी करून घ्यावी.

कढीपत्ता (शास्त्रीय नाव - Murraya koenigi) हे भारतीय झाड असून, त्याच्या पानांचा वापर भारतीय उपखंडातील अनेक व्यंजनांमध्ये केला जातो. प्रामुख्याने त्याचा वापर कढी, आमटी यांमध्ये केला जात असल्याने त्याला कढीपत्ता किंवा इंग्रजीमध्ये करी लिव्हज या नावाने ओळखले जाते. अनेक भारतीय भाषांमध्ये त्याला गोड निंबाची पाने या नावाने ओळखले जाते.

दक्षिण भारतामध्ये त्यांचा वापर वाळवूनही केला जातो. मात्र दक्षिण आणि पश्‍चिम किनारा प्रदेशामध्ये तेलांमध्ये मोहरी, कापलेला कांदा याबरोबर कढीपत्त्याचा वापर प्रामुख्याने केला जातो. अनेक भाज्यांसोबत खोरण, वडा, रस्सम आणि कढी यामध्ये त्याचा वापर होतो. ही पाने आयुर्वेद आणि सिद्ध पद्धतींमध्ये औषधी मानली जातात. त्यामध्ये रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता असल्याचे मानले जात असले, तरी त्याचे वैद्यकीय पुरावे उपलब्ध नाहीत. कढीपत्त्याच्या पाने, काड्या, साल आणि बियांमध्ये सिन्नामाल्डिहाइड सोबतच अनेक कार्बाझोल अल्कालॉइड्स उदा. माहनिंबिन, गिरीनिंबिन आणि माहानिन आढळतात.
या सुगंधी पानांमध्ये तांबे, कॅल्शिअम, फॉस्फरस, फायबर, कर्बोदके, ऊर्जा, मॅग्नेशिअम आणि लोह अशी अन्नद्रव्ये असतात. तसेच त्यात आरोग्यासाठी उपयुक्त अ, ब, क आणि ई जीवनसत्ते, अमिनो आम्ले उपलब्ध आहेत. यातील औषधी घटक वजन कमी करणे, रक्तदाब, अपचन, रक्तक्षय, मधूमेह, केस गळणे अशा समस्यांवर उपयुक्त ठरत असल्याचे सांगतात.

आरोग्यासाठी उपयुक्तता ः

१) अॅण्टिऑक्सिडंट - कढीपत्त्यातील अॅण्टिऑक्सिडंट घटक पेशींना नुकसान पोचविणाऱ्या मुक्तकणांशी लढतात. कार्बाझोल अल्कालॉइड्‍स घटकांमुळे कढीपत्यामध्ये जिवाणूरोधक आणि दाहरोधक गुणधर्म आहेत.
२) कढीपत्त्यातील अल्कालॉइड्‍स ही कमी खोल जखमा आणि जळाल्यामुळे झालेल्या जखम भरण्यास मदत करतात. तसेच त्वचेवरील चट्टे, दाह यांवरही उपयुक्त ठरतात. कढीपत्त्याचे मलम अॅण्टसिेप्टिक म्हणून कार्य करते.
३) कढीपत्त्याची पाने चावून खाल्ल्यास किंवा त्यांचा आहारामध्ये समावेश केल्यास वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. शरीरातील मेद कमी करत असल्याचे मानले जाते.
४) कढीपत्त्याच्या पानातील प्रथिने स्वादुपिंडाच्या इन्सुलीन निर्माण करणाऱ्या पेशींचे मुक्तकणांपासून (फ्री रॅडिकल्स) संरक्षण करतात. त्यामुळे मधूमेह आटोक्यात ठेवण्यास मदत होते. तसेच त्यातील लोह, जस्त, तांबे या मूलद्रव्यांमुळे स्वादुपिंडाचे कार्य सुरळीत चालते.
५) ही पाने स्मृती वाढविण्यासाठी उपयुक्त आहेत.
६) अनेकांना सकाळी झोपेतून उठल्यानंतरही मरगळल्याप्रमाणे किंवा आजारी असल्याप्रमाणे वाटते. त्यांच्यासाठी कढीपत्त्याचा आहारातील वापर फायदेशीर ठरतो. पचनक्रिया सुधारण्यासोबतच उलटी किंवा मळमळीची भावना कमी होते.
७) सूक्ष्मजीव विरोधी गुणधर्म व त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक अशा अ आणि क जीवनसत्त्वाची पूर्तता कढीपत्त्यातून होत असल्याने त्यांचा वापर विविध सौदर्य प्रसाधनांमध्ये केला जातो.
८) केस मऊसूत होण्यासाठी दही आणि कढीपत्त्याचे मलम तयार करून लावण्याचे शिफारस करतात. आणि कोंड्याच्या समस्येसाठी मोहरी किंवा नारळाच्या तेलासोबत कढीपत्त्याच्या पानांचे मलम बनवून केसांवर लावता येते.

उत्पादने
कढीपत्त्याची भुकटी

हे घरगुती पातळीवर करण्यायोग्य उत्पादन आहे. त्याची विक्री स्थाननिहाय कमी अधिक असले तरी सुमारे ३०० रुपये प्रति किलो प्रमाणे होते.
तयार करण्याची पद्धत ः कढीपत्त्याची पाने काड्यांपासून वेगळी करून घ्यावीत. ती स्वच्छ पाण्यांमध्ये धुऊन घ्यावीत. त्यानंतर कॉटन कपड्याच्या साह्याने पृष्ठभाग कोरडा करावा. ती सूर्यप्रकाश किंवा ओव्हनमध्ये कमी तापमानावर कुरकुरीत होईपर्यंत वाळवावीत. चांगली वाळल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यावीत. अधिक काळ साठविण्यासाठी हवाबंद डब्यामध्ये किंचित मीठ मिसळून ठेवावीत. रेफ्रिजरेटर किंवा थंड वातावरणामध्ये ठेवल्यास सहा महिन्यांपर्यंत साठवता येतात.

आरोग्यदायी असला तरी सर्वसामान्यपणे वेगळा कढीपत्ता खाल्ला जात नाही. त्याचा आहारातील वापर वाढविण्यासाठी कढीपत्त्याची भुकटीपासून कॅप्सूल किंवा गोळ्या बनवता येतात. या गोळ्या दिवसातून दोन वेळा घेणे सहजशक्य होते. त्याचप्रमाणे विविध चटण्या आणि पदार्थांमध्ये त्यांचा वापर करता येतो. ही आसाम येथील पाककृती असून, त्यामुळे कढीपत्त्याचा वापर आहारामध्ये वाढवणे शक्य होते.

ई-मेल ः ramabhau@gmail.com
(लेखक सिफेट या संस्थेचे माजी संचालक आहेत.)


इतर टेक्नोवन
बहुपयोगी पॉवर टिलरपॉवर टिलरमधील रोटोव्हेटरचा वापर नांगरट, ढेकळे...
ठिबक सिंचनातील पंप निवडीसाठी तांत्रिक...महाराष्ट्रामध्ये शेतकरी कापूस, हळद, ऊस, संत्रा,...
धान्य साठवणीसाठी जीआयसी सायलो अधिक...काढणीपश्चात अन्नधान्यांच्या साठवणीमध्ये अधिक...
भविष्यातील आहारामध्ये असतील फुलेहीसामान्यपणे फुलांचे उत्पादन हे व्यावसायिकरीत्या...
टोमॅटो प्रक्रिया उद्योगासाठीची यंत्रेटोमॅटोमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे...
छतावरील पर्जन्यजल संचय तंत्रातून १४ लाख...जालना कृषी विज्ञान केंद्राने ‘रुफ टॉप वॉटर...
धान्य, हळद साठवणुकीसाठी हर्मेटिक...हर्मेटिक तंत्रज्ञान हे धान्य, मसाले आणि हळद...
काजूच्या टरफलापासून औद्योगिक तेलनिर्मितीजिथे धागा तयार होतो, तिथेच वस्त्र तयार करण्याचा...
भारतीय शेतकऱ्यांपर्यंत नेणार जागतिक...देशात आधुनिक शेती व फळबागांचा विस्तार होत...
उस्मानाबादी शेळीच्या दुधाचा ‘शिवार सोप' आपल्याकडे शेळीपालन हे प्रामुख्याने मांसासाठी केले...
तळण पदार्थासाठी नवे तंत्र ः एअर फ्रायिंगभारतीयांमध्ये तळलेल्या पदार्थांची आवड...
स्वतःच्या गरजेनुसार यंत्रांची केली...बदलत्या काळात शेतीत मजुरांची संख्या कमी झाली....
फळांच्या व्यावसायिक प्रतवारीसाठी यंत्र...भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय कृषी...
शेवाळापासून पर्यावरणपूरक दिवे...फ्रेंच जैव रसायनतज्ज्ञ पियरे कॅल्लेजा यांनी...
कृषी अवशेष, रबर यांच्या मिश्रणापासून...शहरामध्ये अंगण नसले तरी गच्ची, गॅलरीमध्ये...
तणनियंत्रणासाठी घरगुती साधनांतून तयार...वर्धा जिल्ह्यातील कासारखेडा (ता. आर्वी) येथील...
क्षारपड जमीन सुधारण्यासाठी निचरा...मुंबई येथील केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्थेने...
पारंपरिक पदार्थांसाठी वातावरणरहित तळण...भारतीय लोकांना तळलेले पदार्थ मोठ्या प्रमाणात...
बायोगॅसद्वारे विद्युतनिर्मिती फायदेशीरडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या...
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...