शेतात घेतलेल्या तुतीच्या पिकावरच रेशीम अळ्यांचे संगोपन करून कोषांचे उत्पादन घेतले जाते.
टेक्नोवन
कृत्रिम बुद्धिमत्तेवर हवा नैतिकतेचा पहारा!
वारविक विद्यापीठ, इंपिरिअल कॉलेज लंडन, इपीएफएल (लाऊझेन) आणि सायटेब लि. या संस्थांतील संशोधकांनी एकत्रितरीत्या कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त प्रणालींच्या निरीक्षण, नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी खास गणितीय उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे
वारविक विद्यापीठ, इंपिरिअल कॉलेज लंडन, इपीएफएल (लाऊझेन) आणि सायटेब लि. या संस्थांतील संशोधकांनी एकत्रितरीत्या कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त प्रणालींच्या निरीक्षण, नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी खास गणितीय उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे निर्णय घेण्यातून उद्भवू शकणाऱ्या संभाव्य धोक्याविषयी इशारा आधीच मिळू शकतो.
यंत्रमानव आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित यंत्राच्या निर्मितीचा वेग वाढू लागला आहे. अशा वेळी त्यांच्या वापरातून मानवी समाजामध्ये निर्माण होणाऱ्या नैतिक प्रश्न किंवा समस्यांची दखल घेण्याची आवश्यकताही वाढत आहे. कारण व्यावसायिक निर्णय घेतेवेळी अधिक फायदेशीर निर्णयासाठी अनैतिक, सामाजिकदृष्ट्या अयोग्य असे निर्णय घेतले जाऊ शकतात. कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त घटकांचा वापराला सध्या होत असलेला विरोध बहुतांशवेळी याच एका मुद्द्यावरून होत आहे. प्रत्यक्षामध्ये मानवासाठी बेरोजगारीसोबत अन्य समस्याही भेडसावणार आहेत. अशा वेळी वारविक विद्यापीठ, इंपिरिअल कॉलेज लंडन, इपीएफएल (लाऊझेन) आणि सायटेब लि. या संस्थांतील संशोधकांनी एकत्रितरीत्या कृत्रिम बुद्धीमत्तायुक्त प्रणालींच्या निरीक्षण, नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी खास गणितीय उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
उदा. विशिष्ट ग्राहकांसाठी एखादे इन्शुरन्स उत्पादन बाजारात आणायचे आहे, त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे किंमत ठरवायची आहे. वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या किमती असू शकतात. अर्थात, त्यामध्ये या लोकांच्या मानसिकतेचा किंवा खरेदी करण्याच्या पद्धतीचा अभ्यास केला जाईल. त्यातून योग्य आणि अधिक फायदेशीर ठरेल, अशा प्रकारचे उत्पादन तयार केले जाईल. हे धोरणात्मक उत्पादनाची निर्मिती आणि लोकांपर्यंत पोचवण्याची पद्धती यात अनेक अनैतिक किंवा अयोग्य गोष्टी अंतर्भूत होतील. कंपनीच्या फायद्याच्या दृष्टीने लोकांचे जास्तीत जास्त दावे कमी रकमेमध्ये निकालात काढण्याचा प्रयत्न केला जाईल. मानवी निगराणीशिवाय केवळ कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे घेतल्या जाणाऱ्या धोरणात्मक किंवा दैनंदिन निर्णयातून पुढील गोष्टी उद्भवू शकतात.
१) ग्राहकांना विनाकारण भुर्दंड पडेल.
२) राष्ट्रीय नियामक मंडळाच्या नजरेमध्ये ही चलाखी आल्यास कंपनीला जबरदस्त दंड भरावा लागू शकतो.
३) ग्राहकांकडून तुमच्या उत्पादने किंवा कंपनीवर बहिष्कार टाकला जाईल.
या तिन्ही गोष्टी खरेतर कंपनीच्या दृष्टीने दीर्घकालीन हानिकारक आहेत.
या समस्येवर मात करण्यासाठी वारविक विद्यापीठ, इपीएफएल आणि सायटेब लि. येथील निकोलस बिएले, हिथर बॅट्टी, अॅन्थोनी सी. डेव्हिसन आणि प्रो. रॉबर्ट मॅकाय या संशोधकांनी नवे गणितीय तत्त्व तयार केले आहे. त्याचे सविस्तर विश्लेषण ‘रॉयल सोसायटी ओपन सायन्सेस’ मध्ये प्रकाशित संशोधनामध्ये मांडण्यात आले आहे.
विविध उद्योगांमध्ये धोरणात्मक किंवा दैनंदिन निर्णयासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधार घेण्याचे प्रमाण वाढत जाणार आहे. अशा वेळी त्याची नैतिकता आणि मानवी हित तपासण्याचे कामही तितकेच किचकट होणार आहे. अशा वेळी आम्ही विकसित केलेल्या अनैतिक सर्वोत्तमता तत्त्वामुळे नियामक, कर्मचारी आणि धोरणकर्ते या सर्वांसाठी योग्य निर्णय घेण्यास मदत होऊ शकते. यातून भविष्यातील अनागोंदी टाळणे शक्य होईल.
- प्रो. रॉबर्ट मॅकाय, गणित संस्था, वारविक विद्यापीठ.
- 1 of 21
- ››