agriculture stories in marathi technowon Fenugreek (methi) drying technique | Agrowon

मेथी वाळवण्याचे तंत्र

सचिन शेळके, अनु सिंह
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

भारतामध्ये मेथी (शा. नाव - ट्रिगोनेला फीनम - ग्रासम) या पालेभाजीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. एकूण उत्पादनापैकी ७७ टक्के राजस्थानमध्ये, १०.१२ टक्के मध्य प्रदेश, १० टक्के महाराष्ट्रामध्ये, ५.७३ टक्के गुुजरात, ३.५२ टक्के हरियाना, १.०७ टक्के पश्चिम बंगालमध्ये उत्पादन होते. हिवाळ्यामध्ये मेथीचे सर्वाधिक उत्पादन दिसून येते.

भारतामध्ये मेथी (शा. नाव - ट्रिगोनेला फीनम - ग्रासम) या पालेभाजीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. एकूण उत्पादनापैकी ७७ टक्के राजस्थानमध्ये, १०.१२ टक्के मध्य प्रदेश, १० टक्के महाराष्ट्रामध्ये, ५.७३ टक्के गुुजरात, ३.५२ टक्के हरियाना, १.०७ टक्के पश्चिम बंगालमध्ये उत्पादन होते. हिवाळ्यामध्ये मेथीचे सर्वाधिक उत्पादन दिसून येते.

प्रामुख्याने भाजीसाठी मेथीच्या पानांचा वापर होतो, तर मसाल्यामध्ये मेथी दाण्यांचा वापर होतो. कसुरी मेथी नावाने प्रचलित असलेली वाळवलेली मेथीपाने त्यांच्या सुगंधांमुळे विविध पदार्थांत वापरली जातात. मेथीमध्ये फाॅलिक ॲसिड, थियामीन, नियासिन, जीवनसत्त्व ए, बी, ६ सी ही जीवनसत्त्वे आढळतात.

पोषक तत्त्वे - (प्रति १०० ग्रॅम)
कॅलरी ५०, चरबी ६ ते ७ ग्रॅम, पोटॅशियम ७८० मिलीग्रॅम, कर्बोदके ५० ग्रॅम, प्रथिने २४ ग्रॅम, जीवनसत्त्व बी ६- २५ ते ३० टक्के, लोह १८० टक्के, मॅग्नेशियम ५० टक्के.

एकाच वेळी मेथीचे उत्पादन बाजारात आल्यास त्याची किंमत अत्यंत कमी होते. अशा वेळी मेथीची पाने वाळवून त्याची भुकटी तयार करणे, हा उत्तम पर्याय ठरू शकतो. त्याचा वापर घरगुती, हॉटेल, ढाबे, लग्नसमारंभ इ.मध्ये करता येणे शक्य आहे. साधारणपणे १०० ग्रॅम वजनासाठी २० रुपये दर मिळू शकतो. उत्तम पॅकिंगमध्ये कसुरी मेथी या नावाने विक्री करणे शक्य असून, त्याचा वापर पराठा व सूप यासाठी केला जातो.

मेथी पानांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ही भाजी लवकर खराब होते. पाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी दोन पद्धती आहेत.

नैसर्गिक पद्धत (सूर्यप्रकाशात सुकवणे) ः
या पद्धतीमध्ये भाजीचा रंग अनियमित होतो. परिणामी, त्याला चांगला दर मिळत नाही.

सूर्यप्रकाशात सौरयंत्रामध्ये वाळवण्याची प्रक्रिया :

१. प्रथम भाजी पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावी. भाजीच्या देठाजवळील भाग काढून टाकावा.
२. गरम पाण्यामध्ये (३० ते ३५ अंश सेल्सिअस) मीठ १ ते २ टक्के, सोडियम कार्बोनेट ०.१ ते ०.२ टक्के, सायट्रिक आम्ल ०.१ टक्के मिसळावे. या गरम पाण्यामध्ये मेथीची भाजी ३० ते ४० सेकंदासाठी बुडवून ठेवावी.
३. त्यानंतर मेथीची भाजी बाहेर काढून एका ट्रेमध्ये समप्रमाणात पसरून घ्यावे. हे ट्रे सौर वाळवण यंत्रामध्ये ठेवावेत.
४. सौरवाळवणी यंत्रामध्ये मेथीची भाजी ४० ते ४५ अंश सेल्सिअस तापमानाला १५ ते २० तास ठेवून सुकवावी.
५. सुकलेली मेथीची पालेभाजी ही पाॅली प्राॅपेलीन प्लॅस्टिक पिशवीत किंवा डब्यामध्ये हवाबंद करून थंड व कोरड्या जागी साठवावी.

सचिन शेळके, ८८८८९९२५२२
अनु सिंह, ६३९२६७३९७०.

(अन्न अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभाग, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे अन्नतंत्र महाविद्यालय, लोदगा, लातूर.)


इतर टेक्नोवन
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...
आवळा प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेआपल्या गुणकारी, औषधी गुणधर्मामुळे अनेक आयुर्वेदीय...
वितरणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाला गोदाम...सध्या केवळ ड्रोनच्या वापरातून उत्पादने...
अत्याधुनिक लायसीमीटर आधारित सिंचन...पिकाच्या सिंचनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी...
दूध काढण्यासाठी फिरती घडवंची, तिपाईदुग्ध व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन अखिल...
प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतील...हिरव्या वनस्पती किंवा पिकांद्वारे सूर्यप्रकाशाचे...
हायड्रोपोनिक्स पद्धतीने मिळवा चाराहायड्रोपोनिक्स म्हणजे माती विरहित किंवा केवळ...
चाऱ्यासाठी कमी किमतीचे हायड्रोपोनिक्स...अल्प भूधारक पशुपालकांना हिरव्या चाऱ्याची उपलब्धता...
अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर...अक्षय ऊर्जा स्रोतांमध्ये सूर्यप्रकाश, वारा,...
स्वयंचलित ठिबकासह ९० एकरांत यांत्रिकी...परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील कृषी पदवीधर व...
सुपारी प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेसुपारी हे कोकणातील व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाचे...
पिकातील सूक्ष्महवामान मोजणारी उपकरणेया वर्षी महाराष्ट्राच्या अनेक विभागात...
यांत्रिक पद्धतीने भात रोपलागवडीचा...सांगे (जि. पालघर) येथील कृषिभूषण व अभ्यासू शेतकरी...
विरळणी, तण काढणी करा झोपून!अत्यंत आरामदायी स्थितीमध्ये तणनियंत्रणासारखी काम...
अकरा ‘सेन्सर्स’ सह ‘वेदर स्टेशन’ द्वारे...वडाळी नजीक (ता.निफाड, जि. नाशिक) येथील रोशन...
योग्य प्रकारे करा ट्रॅक्टर,अवजारांचा...ट्रॅक्‍टरची सर्व निगा व देखभाल केल्यास सुगीमध्ये...
आले पिकासाठी सुधारित अवजारेवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने हळद आणि...
श्रम कमी करणारी सुधारित अवजारेमहिलांचे शेतीकामातील श्रम लक्षात घेऊन सुधारित...
ट्रॅक्टरचलित मडपंपाद्वारे शेणस्लरी...साखर कारखान्यातील मोठ्या पदावरून स्वेच्छानिवृत्ती...
आरोग्यदायी गूळ बनविण्याचे आधुनिक तंत्रदेशामध्ये दर्जेदार आणि आरोग्यदायी गूळ बनविण्याचे...