धान्य साठवणीसाठी जीआयसी सायलो अधिक फायदेशीर

धान्य साठवणीसाठी जीआयसी सायलो अधिक फायदेशीर
धान्य साठवणीसाठी जीआयसी सायलो अधिक फायदेशीर

काढणीपश्चात अन्नधान्यांच्या साठवणीमध्ये अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. हंगामभर शेतीमध्ये कष्टाने पिकवलेले धान्य हे अयोग्य साठवणीमुळे खराब होऊ शकते. धान्यांच्या साठवणीसाठी सामान्यतः गोदामांचा किंवा सायलोचा वापर केला जातो. मात्र, गोदामाच्या तुलनेमध्ये सायलोमधील साठवण अधिक फायद्याची ठरू शकते.    

विकसनशील देशांमध्ये अन्नधान्यांच्या साठवणीकडे अद्यापही लक्ष दिले जात नाही. केवळ दुर्लक्षामुळे लक्षावधी क्विंटल धान्य वाया जाते. सध्या धान्यांच्या साठवणीसाठी गोदामांचा वापर होतो. मात्र, पक्क्या बांधकामाच्या गोदामासाठी होणाऱ्या खर्चामध्ये जीआयसी सायलोची उभारणी शक्य आहे. त्यासोबत अन्नधान्यांच्या हाताळणीसाठी, वहनासाठी स्वयंचलित यंत्रणांचा वापरही शक्य होतो. 

  • सायलोचा प्राथमिक खर्च हा जरी गोदामांच्या उभारणीइतकाच असला तरी पुढील काळामध्ये मनुष्यबळामध्ये मोठी बचत शक्य होते. 
  •    या जीआयसी सायलोची उंची अधिक ठेवणे शक्य असून, जागेमध्ये बचत होते. 
  •    सायलोमध्ये व्यवस्थित, स्वच्छ व सुरक्षितपणे दोन वर्षांपर्यंत धान्य साठविता येते.
  •    धान्य आत ठेवणे व बाहेर काढण्याच्या प्रक्रियेतील नुकसान कमी होते. यासाठी मनुष्यबळ अत्यंत कमी लागते. 
  •    धान्यामध्ये हवा खेळती राहत असल्यामुळे धान्यांचा दर्जा चांगला राहतो.
  • या उद्योगासाठी करता येतो सायलोचा वापर 

  •    खाद्य तेल आणि अन्य उद्योग
  •    साखर उद्योग
  •    डिस्टिलरी उद्योग 
  •    पशुखाद्य उद्योग
  •    धान्यापासून पीठनिर्मिती उद्योग
  •    धान्य साठवणीसाठी
  •    अन्नधान्याचे गोदाम 
  •    डाळ मिल
  • सायलो आणि पारंपरिक गोदामातील साठवणीतील फरक 

  •  सायलो उभारणीसाठी एकंदरीत कमी जागा लागते. गोदामांच्या उभारणीसाठी अधिक जागा लागते.
  •  सायलोमध्ये काम करण्यासाठी आॅपरेटरची संख्या अत्यंत कमी असते. मात्र, गोदामामध्ये धान्य हे पिशव्या किंवा पोत्यामध्ये ठेवले जात असल्याने चढ - उतार आणि हाताळणीसाठी अधिक मनुष्यबळ लागते.
  •  सायलोमध्ये धान्यामध्ये हवा खेळती राहते. गोदामामध्ये पिशव्यांमध्ये साठवलेल्या धान्यांमध्ये हवा खेळती राहत नाही. पर्यायाने रोग - किडींचा प्रादुर्भाव वाढतो.
  •  सायलोमध्ये प्रत्येक टप्प्यांवर उच्च आणि कमी पातळीचे इंडिकेटर व स्वयंचलित साधनांची सुविधा असते. अनेक कामे ही स्वयंचलित होतात. मात्र, गोदामांमध्ये स्वयंचलित पद्धतीच्या वापरावर अनेक मर्यादा येतात.
  •  सायलोसाठी एम्एचई पद्धतीचा वापर केला जात असल्याने प्रक्रिया उद्योगासाठी धान्यांचा सातत्यपुर्ण पुरवठा करणे शक्य होते. मात्र, गोदामामध्ये मनुष्यनिर्मित दोष राहण्याची शक्यता असते. सातत्यपूर्ण पुरवठ्यामध्ये अडचणी येतात.  
  • सायलोमध्ये धान्यांची चढ-उतार करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. मात्र, गोदामासाठी विद्युत ऊर्जेची कमी गरज लागते.
  • सायलोमध्ये पिशव्या किंवा पोत्यांची आवश्यकता नसते. गोदामांमध्ये प्रति टन धान्य साठवणीसाठी सुमारे ५०० रुपये पोत्यांवर खर्च होतो. त्यामुळे साठवण खर्चामध्ये वाढ होते.
  • सायलोमध्ये धान्याची नासाडी जवळपास होत नाही. गोदामामध्ये प्रति टन सुमारे ५० किलो धान्यांची नासाडी उंदीर, रोग व किडींमुळे होते.
  • सायलोमध्ये पाऊस व अन्य कारणांमुळे पाण्याच्या गळतीची शक्यता नसते. मात्र, गोदामांतील छताच्या गळतीमुळे, भिंतीतून आलेल्या ओलाव्यामुळे धान्य खराब होऊ शकते.
  • सायलोचे विविध भाग खोलून पुन्हा त्यांची उभारणी करता येत असल्याने सायलोचे स्थलांतर करणे तुलनेने सोपे असते. मात्र, गोदामांचे स्थलांतर हे शक्य नसते. करायचे असल्यास बांधकाम पाडणे आणि पुन्हा उभारणी याशिवाय शक्य नसते. पर्यायाने खर्चामध्ये वाढ होते.
  • सायलोमध्ये पहिल्यांदा आलेले धान्य प्रथम बाहेर पडते. मात्र, गोदामामध्ये पहिल्यांदा ठेवलेली पोते शेवटी बाहेर पडतात.
  • गोदामाच्या तुलनेमध्ये धान्यांचा दर्जा सायलोमध्ये अधिक काळ चांगला राहतो. 
  • सायलोतील महत्त्वाच्या यंत्रणा 

  • धान्य जमा करण्यासाठी - रिसीव्हिंग हॉपर. 
  • धान्य पुढील टप्प्याकडे नेण्यासाठी - चेन आणि बेल्ट कन्व्हेअर
  • धान्य अधिक उंचीपर्यंत नेण्यासाठी - बकेट इलेव्हेटर
  • धान्याची साफसफाईसाठी - ग्रेन क्लीनर
  •  धान्य सायलोमध्ये सोडण्यासाठी - चेन कन्व्हेअर
  • जीआयसी सायलो
  • धान्य बाहेर काढणे व ओढण्यासाठी - स्वीप अगर 
  • धान्य बाहेर काढण्यासाठी दरवाजा - अनलोडींग गेट
  • ट्रक किंवा गाडी किंवा प्रक्रिया उद्योगाकडे धान्य नेण्यासाठी - कन्व्हेअर बेल्ट.
  •  ः सचिन शेळके, ९९६०५००७०३  ः कृष्णा काळे, ८९९९१२८०९९ (लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे अन्नतंत्र महाविद्यालय, लोदगा, लातूर.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com