agriculture stories in marathi technowon, interview of Rajesh Jejurikar, Mahindra Farm Equipment | Agrowon

भारतीय शेतकऱ्यांपर्यंत नेणार जागतिक कृषी तंत्रज्ञान : जेजुरीकर

मनोज कापडे
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

देशात आधुनिक शेती व फळबागांचा विस्तार होत असल्यामुळे कृषी यांत्रिकीकरणाला चालना मिळते आहे. त्यात ट्रॅक्टरची भूमिका सर्वांत मोलाची ठरते आहे. छोटा आकार आणि बहुउद्देशीय कामे, असे ध्येय ठेवत ट्रॅक्टर कंपन्यांची वाटचाल सुरू आहे. ट्रॅक्टर उद्योगात देशी बाजारपेठेतील विक्री व निर्यात अशा दोन्ही आघाड्यांवर महिंद्रा अँड महिंद्राचा वरचष्मा आहे. महिंद्राच्या फार्म इक्विपमेंट सेक्टरचे अध्यक्ष राजेश जेजुरीकर यांच्याशी साधलेला संवाद...

देशाच्या कृषी यांत्रिकीकरणातील ट्रॅक्टर आणि महिंद्रा यांची भूमिका नेमकी काय आहे?

देशात आधुनिक शेती व फळबागांचा विस्तार होत असल्यामुळे कृषी यांत्रिकीकरणाला चालना मिळते आहे. त्यात ट्रॅक्टरची भूमिका सर्वांत मोलाची ठरते आहे. छोटा आकार आणि बहुउद्देशीय कामे, असे ध्येय ठेवत ट्रॅक्टर कंपन्यांची वाटचाल सुरू आहे. ट्रॅक्टर उद्योगात देशी बाजारपेठेतील विक्री व निर्यात अशा दोन्ही आघाड्यांवर महिंद्रा अँड महिंद्राचा वरचष्मा आहे. महिंद्राच्या फार्म इक्विपमेंट सेक्टरचे अध्यक्ष राजेश जेजुरीकर यांच्याशी साधलेला संवाद...

देशाच्या कृषी यांत्रिकीकरणातील ट्रॅक्टर आणि महिंद्रा यांची भूमिका नेमकी काय आहे?

- कृषी यांत्रिकीकरणामध्ये ट्रॅक्टर आणि त्यासोबतच शेती उपयोगी अवजारांचा महत्त्वाचा वाटा आहे. गेल्या तीन दशकांपासून ट्रॅक्टरनिर्मितीत महिंद्रा भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या आर्थिक वर्षापर्यंत आम्ही ३० लाख ट्रॅक्टरची निर्मिती करीत एक उच्चांक गाठला आहे. गेल्या वर्षभरामध्ये देश-विदेशातील बाजारपेठेत तीन लाख ३० हजार ४३६ ट्रॅक्टर विकले. त्यातून महिंद्रा समूहाच्या महसुलात २२ हजार कोटींची भर घातली गेली. जगाच्या ४० देशांमध्ये आता महिंद्रा पसरला आहे. देशाच्या शेती उपयोगी अवजारे विभागाचा महिंद्रा उद्योग समूह एक अविभाज्य भाग आहे. अल्पभूधारकांपासून मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत सर्वांच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने नवनव्या यंत्रांची सतत निर्मिती केली जाते. जागतिक दर्जाचे नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचविण्यासाठी महिंद्रा सतत प्रयत्नरत असतो. यासाठी मूळ कंपन्यांच्या विस्ताराबरोबरच अन्य स्टार्टअप कंपन्यांना विविध मार्गाने सोबत घेतले जात आहे.

जागतिक ट्रॅक्टर उद्योगात महिंद्राचे नेमके स्थान कसे आहे?

जागतिक कृषी यंत्राच्या उद्योगात महिंद्राचा ३० टक्के वाटा आहे. आम्ही आता अमेरिका, ब्राझील, मेक्सिको, फिनलॅंड, तुर्की आणि जपानमधील आमच्या उपकंपन्यांमार्फत प्रत्यक्ष जागतिक बाजारात स्थान प्राप्त केलेले आहे. अर्थात, आम्ही कृषी यांत्रिकीकरणात सतत नव्या बाजारपेठेचा शोध घेत असून, त्यासाठी नवी उत्पादने, नव्या आवृत्ती तयार केल्या जात आहेत. सोबतच विक्री आणि सेवांचे जाळे वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

भारतातील ट्रॅक्टरखरेदीत शेतकऱ्यांचा ओढा कोणत्या दिशेला आहे?

आमच्या विश्लेषणानुसार, ३० ते ५० अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरनेच भारतातील ८० टक्के बाजारपेठ व्यापलेली आहे. मात्र, अलिकडे ३० अश्वशक्तीपेक्षा लहान ट्रॅक्टरची मागणीदेखील वाढत आहे. याला कारण म्हणजे फळबागांमध्ये होत असलेली वाढ, हे होय. अशा फळबागांमध्ये कामांसाठी छोटे ट्रॅक्टर महत्त्वाची भूमिका बजावतात. अशा शेतकऱ्यांसाठी आम्ही जिओ हा छोटा ट्रॅक्टर बाजारात आणला आहे. त्याच्या मागणीमध्ये सतत वाढ होत आहे.

छोट्या शेतकऱ्यांच्या गरजा, समस्या वेगळ्या आहेत. त्या पूर्ण करण्याविषयी आपले धोरण कसे आहे?

कृषी यांत्रिकीकरणातील उद्योगांना अन्नधान्य स्थितीचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. गेल्या २०-३० वर्षांतील जागतिक अन्नधान्याची मागणी आणि आत्ताची अन्नधान्यांची मागणी हा प्रवास लक्षात घेता भविष्यामध्ये अन्नधान्यांच्या मागणीमध्ये किमान ७० टक्क्यांनी वाढ होणार आहे. लागवडीखालील सुपीक जमिनीचे प्रमाण तेवढेच राहणार आहे. कमी क्षेत्रामध्ये अधिक उत्पादन असेच सूत्र राहणार आहे. ही उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी यांत्रिकीकरणाची भूमिका मोलाची असेल.
केवळ ट्रॅक्टर तयार करून विकणे, एवढीच मर्यादित भूमिका न ठेवता छोट्या शेतकऱ्याच्या समस्या ओळखून त्यावर मार्ग काढण्याचे धोरण आम्ही ठेवले आहे. शेतीमधील उत्पादन आणि उत्पादकतावाढीसाठी आवश्यक तंत्र, यंत्र यांची निर्मिती आणि वापर वाढविण्यासाठी महिंद्राकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
छोटे शेतकरी समृद्ध होण्यासाठी यांत्रिकीकरण दर्जेदार, सोपे करण्याची आमची धडपड आहे. त्यासाठी महिंद्राने शेतकऱ्यांना आपल्याकडे आणायचे, त्यांना अत्यावश्यक सेवा पुरवायची आणि त्यांच्याबरोबरच स्वतःचा विकास साधायचा, असे त्रिस्तरीय धोरण आम्ही आखले आहे. त्याला ३.० स्ट्रॅटेजी म्हणतो. जागतिक पातळीवर प्रामुख्याने मोठ्या शेतीसाठी अत्याधुनिक यंत्रे आणि तंत्रसुविधा उपलब्ध होत आहे. त्याच सुविधा छोट्या शेतकऱ्यांपर्यंत माफक दरात पोचविण्यासाठी संशोधन आणि विकास सुरू आहे. याच त्रिसूत्रीसाठी आम्ही जगातील चांगल्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली असून, त्यात कॅनडा व दक्षिण अमेरिकेतील काही कंपन्यांचा समावेश आहे. यातून उत्तम तंत्रज्ञान घेऊन आम्ही शेतकऱ्यांसमोर जात आहोत.

महिंद्राकडून स्टार्टअपमधील गुंतवणूक व अन्य ॲक्विझिशन याविषयी काय सांगाल?

माझ्या माहितीनुसार, जागतिक कृषी अवजार उत्पादनांची बाजारपेठ अंदाजे १६० अब्ज डॉलर्सच्या आसपास असावी. त्यात कृषी यंत्रांचा वाटा १०० अब्ज डॉलर्सचा, तर एकट्या ट्रॅक्टर्सचा वाटा ६० अब्ज डॉलर्सचा असावा. त्यामुळे कृषी यंत्रांची बाजारपेठ काबीज करण्यासाठी आम्हाला खूप मोठी संधी आहे. त्यासाठी फिनलंडमध्ये आम्ही सॅम्पो रोझेनल्यू या कंपनीमध्ये कंबाईन हार्वेस्टरसाठी ४९ टक्के भागीदारी घेतली आहे. भात यंत्रे मूल्य साखळीत जपानच्या मित्सुबिशीबरोबर ३३ टक्के, तर जमीन विकास करणाऱ्या यंत्रांसाठी तुर्कीच्या हिसार्लरबरोबर ७५.१ टक्के भागीदारी केली आहे. भारतासह विविध देशांतील स्थानिक गरजांचा विचार करून नवनवीन कृषी यंत्राच्या निर्मितीमध्ये वरचष्मा ठेवला आहे. महिंद्राने तीन कंपन्यांबरोबर करार करून तीन ठिकाणी विशेष तंत्र केंद्रे म्हणजेच टेक्नॉलॉजी सेंटर्स फॉर एक्सेलन्स उघडली आहेत. येथे होणारे संशोधन शेतकऱ्यांच्या बांधावर आणण्यासाठी आमची धडपड सुरू आहे. स्वित्झर्लंडमधील गमया कंपनीबरोबर ११.२५ टक्के भागीदारीत आम्ही कृषी यंत्र संशोधनात पुढे सरकत आहोत. येथे काटेकोर शेती, डिजिटल फार्मिंग टेक्नॉलॉजी, कृत्रिम बुद्धिमत्ता असलेली शेती, यंत्रांचे स्वयंशिक्षण (मशिन लर्निंग) या क्षेत्रामध्ये काम सुरू आहे. भविष्यासाठी आवश्यक अशा शेतीतंत्राचा शोध घेतला जात आहे. यातून भविष्यातील यांत्रिकीकरणाची दिशा ठरण्यामध्ये महिंद्रा मोलाची भूमिका बजावेल, यात आम्हाला शंका वाटत नाही.

पुढील दोन-तीन वर्षांत महिंद्राकडून बाजारात नवीन काय येणार, याविषयी सांगा?

निश्चितच. ट्रॅक्टर हा शेतीचा अविभाज्य घटक आहे. देशाच्या कृषी विकासात ट्रॅक्टरचे स्थान अमूल्य आहे. ट्रॅक्टर उत्पादनात असल्याचा अभिमान महिंद्रा उद्योगाला आहे. आम्ही आता नोव्हो, युव्हो, जिओ असे नव्या पिढीचे ट्रॅक्टर बाजारात आणलेले आहेत. आमच्या स्वराज ट्रॅक्टरचीदेखील नवी श्रेणी दाखल झालेली आहे. शेतकऱ्यांच्या अपेक्षा, मागणी यांचा विचार करूनच नवी उत्पादने आणतो आहोत. भविष्यात फळबागेसाठी काही नवी उत्पादने प्रस्तावित आहेत. भारतासह अमेरिका, फिनलॅंड, तुर्की, अल्जेरिया, ऑस्ट्रेलिया, जपान अशा आठ ठिकाणी आम्ही यंत्रांची जुळवाजुळव करीत आहोत. भारतामध्ये कांदिवली, नागपूर, रुद्रपूर, जयपूर, जहिराबाद आणि मोहाली या ठिकाणी उत्पादने सुरू आहेत. देशातील शेती आणि शेतकरी विकास डोळ्यांसमोर ठेवून कृषी क्षेत्रातील उत्पादन आणि पुरवठा साखळीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याची आमची इच्छा आहे.

संपर्क -
SERRAO.ARTHUR@mahindra.com

सेराव आर्थर (सीनिअर मॅनेजर, महिंद्रा, कॉर्पोरेट कम्यु.)
 


इतर टेक्नोवन
अचूक सिंचनासाठी स्वयंचलित यंत्रणास्वयंचलित सूक्ष्म सिंचन यंत्रणेद्वारे (ऑटोमेशन)...
इंधनबचतीसाठी पर्यावरणपूरक सौर चूलसौरऊर्जेच्या साह्याने रोजच्या जेवणातील सर्व...
तयार खाद्यपदार्थ, पूर्वमिश्रणे...सध्याच्या घाईगडबडीच्या युगामध्ये लोक तयार...
ऊस शेतीसाठी आवश्यक यंत्रेऊस उत्पादनात केवळ मजुरीवर ३५ ते ४० टक्के खर्च...
जलशुद्धीकरणासाठी सौर शुद्धजल संयंत्रदुर्गम भागांत तसेच समुद्रकिनाऱ्यावर पिण्यायोग्य...
शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्षशून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्षाची उभारणी कमी खर्चात...
ऊर्जेशिवाय शीतकरणाचे तंत्रकोणत्याही ऊर्जेच्या वापराशिवाय शीतकरणाची एक...
जास्त अन्न शिजविण्यासाठी शेफलर सौरचूल...शेफलर सौर चूल पेटी सौरचूल आणि पॅराबोलिक...
...ही आहेत आंतरमशागतीसाठी अवजारेशेती मशागतीमध्ये आता ट्रॅक्टर, पॉवर टिलर अशी...
बटाटा प्रक्रिया उद्योगासाठी यंत्रेतळलेल्या पदार्थामध्ये बटाट्याचे चिप्स किंवा...
मेथी वाळवण्याचे तंत्रभारतामध्ये मेथी (शा. नाव - ट्रिगोनेला फीनम -...
फ्राइम्स प्रक्रिया उद्योगातील यंत्रेतळलेल्या पदार्थांच्या बाजारपेठेमध्ये फ्राइम्स...
..अशी आहे डाळनिर्मितीची प्रक्रियामागील भागात मिनी डाळ मिल व त्या माध्यमातून डाळ...
सौर ऊर्जा उपकरणाचे उपयोग, फायदेभविष्यात ऊर्जेचे पर्याय शोधणे महत्त्वाचे ठरणार...
फळप्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त यंत्रेकोणत्याही अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये येणाऱ्या...
नत्रयुक्त खतांच्या वापराशिवाय उत्पादन...कडधान्याच्या मुळावरील गाठीमध्ये वसाहती करणाऱ्या...
सौर ऊर्जेवर आधारीत उपकरणांचा वापरपारंपरिक ऊर्जास्त्रोतांच्या तुटवड्यामुळे व जास्त...
किफायतशीर बैलचलित अवजारेबैलचलित बहूपीक टोकण यंत्रामध्ये पिकानुसार...
सोयादूध, पनीर बनवण्याची यंत्रेसोयाबीनपासून दूध आणि त्याचे पनीर ही उत्पादने...
जवसापासून जेल, कुरकुरीत पदार्थविविध आजारांवरील उपचारामध्ये जवस उपयुक्त असूनही...