कोरोना संकटात टाळेबंदीमुळे राज्याची तिजोरी रिकामी झाली असली तरी कृषी व सलग्न क्षेत्रांनी ११.७ टक्
टेक्नोवन
शून्य मशागतीसह पेरणी यंत्राचा वापर
तागाच्या लागवडीसाठी शून्य मशागत तंत्रासह आधुनिक पेरणी यंत्राचा वापर पश्चिम बंगाल येथील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरला आहे.
तागाच्या लागवडीसाठी शून्य मशागत तंत्रासह आधुनिक पेरणी यंत्राचा वापर पश्चिम बंगाल येथील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरला आहे. या तंत्राच्या प्रसारासाठी उत्तर बंग कृषी विश्वविद्यालय, सिमिट संस्था, ‘ऑस्ट्रेलियन सेंटर फॉर इंटरनॅशनल अॅग्रीकल्चर रिसर्च’ यांनी एकत्रितरीत्या प्रात्यक्षिक प्रकल्प राबवला होता.
ताग हे पश्चिम बंगालमधील महत्त्वाच्या पिकांपैकी एक असून, सुमारे ५.१५ लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. त्यातून मिळणारे उत्पादन हे देशांच्या एकूण उत्पादनाच्या तीन चतुर्थांश इतके आहे.
पश्चिम बंगालमध्ये ताग आणि भात ही पीक पद्धती तेराई भागामध्ये लोकप्रिय आहे. तेराई भागातील उष्ण आणि आर्द्र वातावरण या पिकासाठी अनुकूल असून, अल्पभूधारक आणि सिमांत शेतकरी या पिकाचे उत्पादन घेतात. गेल्या काही वर्षापासून रब्बी मका पिकाखालील क्षेत्र वाढत असून, तागाचे प्रमाण कमी होत आहे. तागांच्या तंतूची सारी बाजारपेठ ही मध्यस्थांच्या हातामध्ये असून, शेतकऱ्यांना तुलनेमध्ये कमी उत्पन्न मिळते.
उत्तर बंग कृषी विश्वविद्यालयातील शास्त्रज्ञांनी २०१४-१५ मध्ये शाश्वत शेतीसाठी प्रात्यक्षिक प्रकल्प राबवला होता. CIMMYT संस्थेच्या सहकार्याने ‘ऑस्ट्रेलियन सेंटर फॉर इंटरनॅशनल अॅग्रीकल्चर रिसर्च’ (ACIAR) यांच्या आर्थिक साह्याने राबवलेल्या या प्रकल्पामध्ये विविध पिकांच्या व्यवस्थापन पद्धतीमध्ये प्रमाणीकरण करण्याचे नियोजन होते. २०१७-१८ मध्ये ताग (ज्यूट) पिकासाठी एक प्रोटोकॉल तयार करण्यात आला. त्याच्या चाचण्या आणि प्रात्यक्षिके विविध शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये घेण्यात आली. त्यासाठी गेल्या तीन वर्षापासून कृषी विभाग, सातमिले सतीश क्लब आणि पथागर ही स्वयंसेवी संस्था यांच्या साह्याने प्रसार करण्यात आला.
- मशागतीशिवाय शेतीकडे शेतकऱ्यांना वळविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. विविध पिकांसाठी उपयुक्त अशा विनामशागत तंत्र व पेरणी यंत्रांचा वापर करण्यात आला. मात्र, प्रात्यक्षिकामध्ये चांगले निष्कर्ष मिळाल्यानंतर कमी मजूर लागणाऱ्या या तंत्राकडे शेतकरी आकर्षित झाले.
- काढणीसाठीही अलीकडे हे शेतकरी कंबाईन हार्वेस्टरचा वापर करू लागले आहेत. पूर्वी पुढील पिकासाठी शेत रिकामे करण्यासाठी गहू पिकांचे अवशेष जाळले जात. त्यातून मोठे प्रदूषण होत असे. मात्र, हे अवशेष तसेच शेतात ठेवून कमीत कमी मशागतीसह तागाची लागवड करण्याचे तंत्र भारतात प्रथमच शास्त्रज्ञांनी वापरले.
- या वर्षी कुटबेहेर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील सुमारे २५ शेतकऱ्यांच्या १० एकर क्षेत्रावर प्रात्यक्षिक करण्यात आली. त्यातील अनेकजण विविध पीक पेरणी यंत्राचा वापर करत असले तरी विनामशागत तंत्राचा वापर प्रथमच केला.
- या तंत्रामुळे उत्पादन खर्च केवळ २०, २५० रुपये इतका मर्यादित ठेवण्यात यश आले. म्हणजेच पारंपरिक तंत्राच्या तुलनेमध्ये ५२८० रुपयांची बचत झाली.
- विविध पिकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या पेरणी यंत्राला या भागामध्ये ‘हॅपी सीडर’ या नावाने ओळखले जाते. या यंत्राच्या वापरामुळे प्रति एकर १९८० रुपयांची बचत झाली.
- यातून चांगले निष्कर्ष मिळाल्याने होसेनआरा बीबी, बिजय रॉय, रामेन बर्मन, भाबतोष पातवरी अशा अनेक शेतकऱ्यांना समाधान मिळाले. त्यातून प्रचार होऊन अगदी कोविड -१९ च्या मर्यादेमध्येही अनेक शेतकऱ्यांनी प्रात्यक्षिक क्षेत्रांना भेटी दिल्या.
- 1 of 22
- ››