agriculture stories in marathi technowon, onion processing machines | Agrowon

कांदा प्रक्रिया उद्योगासाठी यंत्रे

गणेश खुळे, डॉ. रामनाथ शुक्ला
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

कांद्याच्या उत्पादनासोबतच दरामध्ये मोठी चढ-उतार होत असते, त्यावर मात करून दरामध्ये स्थिरता मिळवण्यासाठी ग्रामीण पातळीवर छोटे कांदा प्रक्रिया उद्योग सुरू होणे आवश्यक आहे. अशा छोट्या प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक यंत्रे, उपकरणांची माहिती घेऊ.

कांद्याच्या उत्पादनासोबतच दरामध्ये मोठी चढ-उतार होत असते, त्यावर मात करून दरामध्ये स्थिरता मिळवण्यासाठी ग्रामीण पातळीवर छोटे कांदा प्रक्रिया उद्योग सुरू होणे आवश्यक आहे. अशा छोट्या प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक यंत्रे, उपकरणांची माहिती घेऊ.

महाराष्ट्रात विविध हंगामांतील कांदा वर्षभर बाजारपेठेत येत असतो. मात्र, बाजारभावातील चढ-उतारामुळे अनेकवेळा शेतकरी अडचणीमध्ये येतो. यावर काही प्रमाणात कांदा चाळीचा पर्याय उपयुक्त ठरतो. मात्र, एका ठरावीक मर्यादेपलीकडे कांद्याच्या साठवणीमध्ये कांदा सडणे, कुजणे, वजन कमी होणे, मोड येणे अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातच अनेक भागांमध्ये साठवणुकीच्या पुरेशा व कार्यक्षम सोयी उपलब्ध नाहीत.
या समस्येवर मात करण्यासाठी गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत कांदा प्रक्रिया उद्योग उभारणे सहजशक्य आहे. कांद्यावर प्रक्रिया करून विविध उत्पादनांची निर्मिती केल्यास शेतकऱ्यांना निश्चित चांगला फायदा होऊ शकतो. सध्या भारतामध्ये एकूण कृषिमालापैकी केवळ ५ टक्के मालावर प्रक्रिया होते. उर्वरित कृषिमाल हा योग्य साठवण आणि प्रक्रियेविना खराब होतो.

कांद्यामध्ये पाण्याचे प्रमाण म्हणजेच जलांश जास्त आहे, त्यामुळे तो जास्त काळ टिकू शकत नाही. यासाठी कांद्यावर मुख्यतः निर्जलीकरणासारखी प्रक्रिया आवश्यक ठरते. या प्रक्रियेद्वारे कांद्यापासून चकत्या, पावडर, पेस्ट, रस आणि कांदा लोणच्यासारखे अधिक काळ टिकवणारे पदार्थ बनवता येतात. निर्यातीमध्ये या पदार्थांना चांगली मागणी आहे.

कांदा प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक यंत्रे

पिलिंग मशिन (साल /बाह्य आवरण काढण्याचे यंत्र) ः
कांद्यावरील बाह्य आवरण म्हणजेच त्यावरील साल काढण्याकरिता या यंत्राचा वापर केला जातो. हे एक स्वयंचलित यंत्र असून, याची क्षमता ५० किलो प्रतितासपासून पुढे आहे. आपल्या भागातील उपलब्ध कांदा आणि त्यावरील प्रक्रिया या अनुषंगाने आवश्यक त्या क्षमतेची यंत्रे बाजारात उपलब्ध आहेत. या यंत्राची किंमत अंदाजे २० हजारांपासून पुढे क्षमतेनुसार वेगवेगळी असू शकते.

कांदा रूट आणि हेड कटिंग मशिन (मुळे व शेंडा कापण्याचे यंत्र) ः

  • हे स्वयंचलित यंत्र वापरून कांद्याची मुळे व शेंडे कापण्यात येतात.
  • या यंत्राची क्षमता १०० किलो प्रतितासपासून पुढे असून किंमत १५ हजारांपासून सुरू होते.

कांदा वॉशिंग मशिन (धुण्याचे यंत्र) -

  • बाह्य आवरण आणि मुळे काढलेला कांदा धुण्यासाठी या यंत्राचा वापर केला जातो. यामुळे कांद्यावरील धूळ व अन्य खराब घटक निघून कांदा स्वच्छ होईल.
  • हे यंत्र स्वयंचलित आहे. याच्या किमती १५ हजार रुपयांपासून सुरू होऊन क्षमतेनुसार कमी- अधिक होऊ शकतात.

कांदा कटर किंवा स्लाइसर यंत्र (कांद्याच्या चकत्या करण्याचे यंत्र) -
या यंत्राद्वारे कांद्याच्या लहान चकत्या केल्या जातात. निर्जलीकरणादरम्यान पाण्याचे प्रमाण लवकर कमी होण्यासाठी चकत्यांची जाडी ही ०.३ ते ०.६ सेंमी असावी.
हे यंत्र स्वयंचलित असून, या यंत्राची किंमत १० हजारापासून पुढे क्षमतेनुसार कमी- अधिक असू शकते.

डिहायड्रेटर किंवा ड्रायर (कांदा वाळवण्याचे यंत्र) -

  • डिहायड्रेटर किंवा ड्रायरमध्ये पदार्थातील पाण्याचे प्रमाण कमी केले जाते. कांद्याच्या चकत्या वाळवण्यासाठी ट्रे ड्रायर किंवा सोलर ड्रायर वापरले जातात.
  • कांद्याच्या चकत्या ५५ अंश सेल्सिअस तापमानाला १० ते १२ तासांकरिता ड्रायरमध्ये ठेवल्या जातात. याची क्षमता ही ट्रेच्या संख्येवर अवलंबून असते. जितके जास्त ट्रे तितकी जास्त क्षमता, तितकी किंमत जास्त असते.
  • बाजारात सध्या १२, २४, ४८, ९६, १९२ ट्रे असणारे ड्रायर उपलब्ध आहेत.

काही कंपन्यांमार्फत वरील सर्व यंत्रे एकत्रित किंवा वेगवेगळी उपलब्ध होऊ शकतात.

ग्राइंडर (गिरणी)

  • वाळवलेल्या चकत्यांपासून ग्राइंडरद्वारे भुकटी बनवली जाते.
  • ग्राइंडरची क्षमता ही ५० किलो प्रतितासपासून पुढे उपलब्ध आहे.
  • ५० किलो प्रतितास क्षमतेच्या ग्राइंडरची किंमत ही २० हजार रु. आहे.

एकूण ५ ते १० लाखांपर्यंत गुंतवणूक केल्यास शेतकरी किंवा शेतकरी गट कांदा प्रक्रिया उद्योग सुरू करू शकतात. या प्रक्रिया पदार्थांच्या दरामध्ये बऱ्यापैकी स्थिरता असल्याने ताज्या कांद्याच्या तुलनेमध्ये आर्थिक स्थिरता मिळू शकते. या छोट्या उद्योगाच्या साह्याने सामान्य शेतकऱ्यांना कांद्याच्या दरातील चढ-उतारावर काही प्रमाणात तरी मात करणे शक्य होईल, अशी आशा आहे.

गणेश खुळे, ९३५९४३५१८३
(अन्न प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग, सैम हिग्गिनबॉटम कृषी, प्रौद्योगिकी आणि विज्ञान विश्वविद्यालय, प्रयागराज, उत्तर प्रदेश)


फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
धान्य साठवणीसाठी जीआयसी सायलो अधिक...काढणीपश्चात अन्नधान्यांच्या साठवणीमध्ये अधिक...
भविष्यातील आहारामध्ये असतील फुलेहीसामान्यपणे फुलांचे उत्पादन हे व्यावसायिकरीत्या...
टोमॅटो प्रक्रिया उद्योगासाठीची यंत्रेटोमॅटोमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे...
छतावरील पर्जन्यजल संचय तंत्रातून १४ लाख...जालना कृषी विज्ञान केंद्राने ‘रुफ टॉप वॉटर...
धान्य, हळद साठवणुकीसाठी हर्मेटिक...हर्मेटिक तंत्रज्ञान हे धान्य, मसाले आणि हळद...
काजूच्या टरफलापासून औद्योगिक तेलनिर्मितीजिथे धागा तयार होतो, तिथेच वस्त्र तयार करण्याचा...
भारतीय शेतकऱ्यांपर्यंत नेणार जागतिक...देशात आधुनिक शेती व फळबागांचा विस्तार होत...
उस्मानाबादी शेळीच्या दुधाचा ‘शिवार सोप' आपल्याकडे शेळीपालन हे प्रामुख्याने मांसासाठी केले...
तळण पदार्थासाठी नवे तंत्र ः एअर फ्रायिंगभारतीयांमध्ये तळलेल्या पदार्थांची आवड...
स्वतःच्या गरजेनुसार यंत्रांची केली...बदलत्या काळात शेतीत मजुरांची संख्या कमी झाली....
फळांच्या व्यावसायिक प्रतवारीसाठी यंत्र...भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय कृषी...
शेवाळापासून पर्यावरणपूरक दिवे...फ्रेंच जैव रसायनतज्ज्ञ पियरे कॅल्लेजा यांनी...
कृषी अवशेष, रबर यांच्या मिश्रणापासून...शहरामध्ये अंगण नसले तरी गच्ची, गॅलरीमध्ये...
तणनियंत्रणासाठी घरगुती साधनांतून तयार...वर्धा जिल्ह्यातील कासारखेडा (ता. आर्वी) येथील...
क्षारपड जमीन सुधारण्यासाठी निचरा...मुंबई येथील केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्थेने...
पारंपरिक पदार्थांसाठी वातावरणरहित तळण...भारतीय लोकांना तळलेले पदार्थ मोठ्या प्रमाणात...
बायोगॅसद्वारे विद्युतनिर्मिती फायदेशीरडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या...
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
यंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या...पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध...
ऊर्जा कार्यक्षम गूळ प्रक्रिया यंत्रसाखरेच्या तुलनेत गूळ हा अधिक प्रमाणात पौष्टीक,...