मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतिकारक पाऊल आहे.
टेक्नोवन
बटाटा प्रक्रिया उद्योगासाठी यंत्रे
तळलेल्या पदार्थामध्ये बटाट्याचे चिप्स किंवा वेफर्स यांची मागणी सातत्याने वाढत आहे. सी.ए.जी.आर. च्या अहवालानुसार, जागतिक बाजारपेठेत येत्या पाच वर्षांत बटाटा चिप्सच्या विक्रीमध्ये ४.४० टक्के दराने वाढ होत जाणार आहे. भारतातही वेगवेगळ्या चव, स्वाद यांचा अंतर्भाव करत बटाटा वेफर्सची अनेक उत्पादने बाजारात येत आहेत.
तळलेल्या पदार्थामध्ये बटाट्याचे चिप्स किंवा वेफर्स यांची मागणी सातत्याने वाढत आहे. सी.ए.जी.आर. च्या अहवालानुसार, जागतिक बाजारपेठेत येत्या पाच वर्षांत बटाटा चिप्सच्या विक्रीमध्ये ४.४० टक्के दराने वाढ होत जाणार आहे. भारतातही वेगवेगळ्या चव, स्वाद यांचा अंतर्भाव करत बटाटा वेफर्सची अनेक उत्पादने बाजारात येत आहेत.
बटाटा चिप्स निर्मितीसाठी खासगी कंपन्यांकडून अनेक खास जाती विकसित आलेल्या आहेत. त्यामुळे उत्तम दर्जाच्या चिप्स तयार होतात. मात्र, त्या प्राधान्याने करारशेतीमध्ये वापरल्या जातात. स्थानिक पातळीवर बटाटा उत्पादन आणि त्यावर प्रक्रिया उद्योगाची उभारणी करणे शक्य आहे.
जागतिक बटाटा चिप्स बाजारपेठ ही खालील प्रकारामध्ये विभागली आहे.
१. तळलेले चिप्स
२. भाजलेले चिप्स
चवीनुसार विभागणी.
१. साधे चिप्स
२. खारवलेले
३. मसालेदार
व्यापाराचा प्रकार :
१. सुपरमार्केट
२. हायपर मार्केट
३. ऑनलाईन रिटेल स्टोअर
भारतामध्ये अद्यापही स्थानिक पातळीवरील अनेक ब्रॅण्ड लोकांच्या मनावर राज्य करतात. छोट्या प्रमाणामध्ये उद्योगाच्या उभारणीसाठी पुढील यंत्रे महत्त्वाची ठरतात.
१. साल काढण्याचे यंत्र
चिप्स तयार करण्यापूर्वी बटाटे स्वच्छ धुवून त्याची साल काढावी लागते. मोठ्या प्रमाणात उद्योगासाठी साल काढणे ही अधिक मजुरावलंबी प्रक्रिया ठरते. अशा वेळी साल काढण्याचे यंत्र उपयुक्त ठरते. यामध्ये बटाट्याच्या कापाची जाडी ठरवणे शक्य होते. या यंत्राच्या तळाशी गोलाकार अपघर्शक पदार्थांचा थर असलेली चकती असते. ही चकती फिरते त्यावरील बटाट्याच्या सालीशी घर्षण होते. साल निघून वेगळी होत जाते. चकतीचा व्यास १४ इंच असून, जाडी ०.५ इंच असते. साल काढलेले बटाटे पुढे सरकवले जातात. हे उपकरण २२० व्होल्ट, सिंगल फेज १ एचपी क्षमतेच्या मोटरद्वारे चालते. हे उपकरण अर्ध स्वयंचलित असून, स्टीलचे असते. या उपकरणाचे वजन ५५ किलो आहे. यात एका वेळेस १० किलो बटाट्याची साल काढणे शक्य आहे. अशा यंत्राची किंमत बाजारामध्ये १६ हजारांपासून पुढे आहेत.
२. बटाटा काप करण्याचे यंत्र (पोटॅटो स्लाइसर)
या यंत्रामध्ये माणसांद्वारे साल काढलेले बटाटे टाकले जातात. पुढे एका फिरत्या चकतीवर धारदार ब्लेड्स लावलेले असतात. ब्लेड्च्या प्रकारानुसार साधे काप, रेषा असलेले काप किंवा चौकोनी रेषा असलेले काप तयार करता येतात. हे यंत्र स्टेनलेस स्टील व ॲल्युमिनिअम पासून बनवलेले असते. यंत्राला गती देण्यासाठी ३० व्होल्ट क्षमतेची सिंगल फेस मोटर वापरतात. याची क्षमता २०० किलो प्रति तास इतकी आहे. या उपकरणाचे वजन ६० किलो आहे. बाजारामध्ये या यंत्राची किंमत २० हजारांपासून पुढे आहेत.
३. डिहायड्रेटर
बटाट्याची साल काढल्यानंतर त्यातील अतिरीक्त पाणी कमी करण्यासाठी या यंत्रांचा वापर केला जातो. हे यंत्र स्टेनलेस स्टीलपासून बनवतात. यामध्ये आतील बाजूस एक गोलाकार भांडे असून, त्यात शोषलेले पाणी साठवले जाते. दर काही टप्प्यानंतर हे भांडे काढून त्यातील पाणी काढून टाकावे. एका वेळेला १० किलोची बॅच बनवता येते. हे उपकरण अर्ध स्वयंचलित आहे. यातील मोटर सिंगल फेज अर्धा ते २ एचपी क्षमतेची असता. वजन सुमारे २० किलो आहे. बाजारामध्ये याची किंमत २६ हजारांपासून पुढे आहे.
४. तळण यंत्र (चिप्स फ्रायर)
वरील यंत्राद्वारे तयार केलेले चिप्स या तळणयंत्रामध्ये इलेव्हेटरद्वारे आणले जाते. यात तेल गरम करण्यासोबत सातत्याने फिरते ठेवले जाते. त्यामुळे तेल लवकर खराब होत नाही. त्याच प्रमाणे तळाशी जमा होणारा गाळ किंवा अन्य पदार्थ काढण्याची सुविधा असते. हे यंत्र संपूर्ण स्वयंचलित व स्टेनलेस स्टिलपासून बनवले असते. या उपकरणाची क्षमता ही तासाला २० ते २५ किलो असून, हे यंत्र १ एच. पी. सिंगल फ्रेजवर चालणाऱ्या उपकरणाचे वजन ८० किलो आहे. त्यापासून ताशी २० ते २५ किलो चिप्स तळले जातात. या उपकरणाची किंमत ५० हजारांपासून पुढे आहे.
संपर्क ः
सचिन शेळके, ८८८८९९२५२२
(अन्नप्रक्रिया व तंत्रज्ञान विभाग, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे अन्नतंत्र महाविद्यालय, लोदगा, लातुर.)
फोटो गॅलरी
- 1 of 21
- ››