agriculture stories in marathi technowon tomato processing machinaries | Page 2 ||| Agrowon

टोमॅटो प्रक्रिया उद्योगासाठीची यंत्रे

सचिन शेळके, वैभव पाटील
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

टोमॅटोमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे काढणीपश्चात अधिक काळ साठवणे शक्य होत नाही. बाजारातील दरामध्ये चढ-उतारामुळे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळवणे शक्य होत नाही. अशा वेळी गावपातळीवर टोमॅटो प्रक्रिया उत्पादनांची निर्मिती केल्यास सर्वसामान्य शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकेल.

टोमॅटोमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे काढणीपश्चात अधिक काळ साठवणे शक्य होत नाही. बाजारातील दरामध्ये चढ-उतारामुळे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळवणे शक्य होत नाही. अशा वेळी गावपातळीवर टोमॅटो प्रक्रिया उत्पादनांची निर्मिती केल्यास सर्वसामान्य शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकेल.

टोमॅटो उत्पादनामध्ये जागतिक पातळीवर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील सर्वाधिक टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये आंध्र प्रदेश पहिल्या क्रमांकावर असून, त्यानंतर बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश इ. ठिकाणी उत्पादन होते. टोमॅटो काढणीवेळी दरातील चढ-उतार आणि काढणीपश्चात तंत्रज्ञानाच्या अभावामुळे ५ ते ५० टक्क्यांपर्यंत टोमॅटोचे नुकसान होते.

टोमॅटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असले तरी प्रक्रियेचे प्रमाण अत्यल्प आहे. टोमॅटोमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने काढणीनंतर काही काळातच खराब होतात. परिणामी काढणीनंतर त्वरित विक्री करावी लागत असल्याने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळण्यामध्ये अडचणी येतात. वास्तविक टोमॅटोच्या प्रक्रियेसाठी गावपातळीवर छोटे छोटे उद्योग उभारणे शक्य आहे. बाजारामध्ये टोमॅटोचे दर घसरल्यानंतर उत्पादनावर प्रक्रिया केल्यास ही उत्पादने अधिक काळ साठवून बाजारपेठेत आणता येतील. परिणामी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे प्रमाण कमी होईल.

प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रे, उपकरणे ः
१. वाळवण यंत्र (ड्रायर) - कोणत्याही अन्नपदार्थातील पाण्याचे प्रमाण हे तो पदार्थ किती दिवस टिकणार हे ठरवते. जितके जास्त पाणी त्या पदार्थात असेल, तितका तो पदार्थ लवकर खराब होतो व जितके पाणी कमी, तितका तो पदार्थ जास्त काळ टिकतो. वाळवण यंत्राद्वारे पाण्याचे प्रमाण कमी करता येते.

स्टँडर्ड ट्रे ड्रायर - स्टील व ॲल्युमिनिअमपासून बनवलेले हे यंत्र अर्धस्वयंचलित प्रकारचे आहे. त्यातील कमाल तापमान १५० अंश सेल्सिअसपर्यंत ठेवता येते. यामध्ये सिंगल एच.पी. व डबल एच.पी प्रकार असून सिंगल फेजवर चालू शकते. साधारण ५० ते १००० किलो इतक्या क्षमतेमध्ये ही यंत्रे उपलब्ध आहेत. ट्रेचा आकार ४६० × ६४० × ४५ (मि.मी.) आहे. या ड्रायरच्या किमती ७५ हजारांपासून सुरू होतात.

२. रिफ्रॅक्टोमीटर - पदार्थातील साखरेचे प्रमाण मोजण्यासाठी रिफ्रॅक्टोमीटरचा वापर केला जातो. गोडी मोजण्याचे एकक हे ब्रिक्स आहे. यासाठी सहज हाताळण्यायोग्य रेफ्रॅक्टोमीटर बाजारात उपलब्ध आहे. त्याचे वजन २९० ग्रॅम आहे. त्याची लांबी २० सेंमी आहे. १२५० रुपयांपासून याच्या किमती सुरू होतात. ३० ते ६० अंश ब्रिक्सपर्यंत गोडी मोजता येते.
पद्धत - प्रथम रिफ्रॅक्टोमीटरची स्क्रीन क्षारविरहित पाण्याने धुऊन घ्यावी. स्वच्छ पुसल्यानंतर त्यात नमुना घ्यावा. तो स्क्रीनला हळूच दाबल्यानंतर प्रकाशाच्या दिशेने धरावे. सामान्यपणे टोमॅटो ज्यूस, सिरप, साॅस यासाठी ० ते ३० अंश ब्रिक्स व जॅम आणि काॅन्सट्रेटसाठी ३० ते ७० अंश ब्रिक्स असावा लागतो.

३. फळे धुण्यासाठी यंत्र - फळांना चिकटून बसलेली धूळ व अन्य प्रदूषक घटक स्वच्छ करण्यासाठी या यंत्राचा वापर केला जातो. फळे थंड किंवा कोमट पाण्याने धुतली जातात. हे यंत्र स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले असून, ३१० व्होल्ट सिंगल फेजवर चालते. त्याची फ्रिक्वेन्सी ५० ते ६० हर्टझ् इतकी आहे. एका तासामध्ये २०० किलो फळे धुता येतात. याची किंमत बाजारामध्ये ५० हजार रुपयांपासून सुरू होते.

४. गर वेगळा करण्याचे यंत्र (पल्पर) - फळातील रस आणि गर वेगळा करण्यासाठी ज्यूसर किंवा पल्परचा वापर केला जातो. सध्या भारतामध्ये अर्धा एचपी व सिंगल फेजवर चालणारे फ्रूट पल्पर यंत्र बाजारात उपलब्ध आहे. त्याची क्षमता ५० किलो प्रतितास इतकी आहे. रसाची विविध प्रकारची घनता मिळवण्यासाठी ०.२५ ते ८ मि.मी. या आकाराच्या जाळ्या उपलब्ध आहेत. यंत्राचे सर्व भाग स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले असतात. हे उपकरण संपूर्ण स्वयंचलित आहे. त्याचा वापर टोमॅटो, सफरचंद व आंबा या फळांसाठी प्रामुख्याने होतो. याची किंमत १५ हजार रुपये इतकी आहे.

५. ऑटो क्लेव्ह - ऑटो क्लेव्हचा वापर प्रक्रियेदरम्यान वापरल्या जाणाऱ्या विविध साहित्यांच्या निर्जंतुकीकरणासाठी होतो. सूक्ष्मजीवांच्या वाढीमुळे तयार होणारा पदार्थ खराब होणे टाळता येते. पदार्थ जास्त काळ टिकतो. बाजारामध्ये अर्धस्वयंचलित प्रकारची निर्जंतुकीकरण उपकरणे उपलब्ध आहेत. यामध्ये वाफेच्या निर्मितीसाठी सुमारे २००- १५०० लिटर पाणी आवश्यक असते. यात पाण्याला १२१ अंश सेल्सिअस उष्णता दिली जाते. त्यातून पाण्याची वाफ दाबाखाली सर्व साहित्य निर्जंतूक करते. यात अर्धा ते दोन एच.पी. क्षमतेची उपकरणे आहेत. त्यात तयार होणारा वाफेचा दाब हा १० ते २० पी.एस.आय. इतका असतो. बाजारामध्ये किंमत रु. ८०,००० इतकी आहे.

६. पल्वलायझर - टोमॅटोची भुकटी बनविण्यासाठी याचा वापर होतो. हे यंत्र २ एच.पी. क्षमतेचे असून, १४४० फेरे प्रतिमिनिट या वेगाने फिरते. हे उपकरण पूर्ण स्वयंचलित असून, प्रतिबॅच २० ते २२ किलो टोमॅटोवर प्रक्रिया करता येते. याचे सर्व भाग ॲल्युमिनिअम आणि स्टेनलेस स्टीलपासून बनलेले असतात. याच्या किमती क्षमतेनुसार १४ हजारांपासून पुढे आहेत.

७. स्टीम जॅकेट कॅटल - हे उपकरण विशेषतः साॅस, सूप गरम करणे, शिजवणे किंवा मिश्रण एकत्रित करणे यासाठी वापरले जाते. किटलीला दोन थर असतात. त्यातील बाह्यथरांमध्ये पाण्याची वाफ सोडली जाते. वाफेच्या उष्णतेने आतील पदार्थ शिजवला जातो. याचे तापमान साधारणपणे १०० अंश सेल्सिअसपर्यंत राहते. पदार्थ थंड करण्यासाठी याला एक अतिरिक्त जॅकेट जोडलेले असते. त्यामध्ये थंड पाणी सोडून पदार्थाचे तापमान कमी केले जाते. यामध्ये पन्नास लिटरपासून तीन हजार लिटरपर्यंतच्या क्षमता उपलब्ध आहेत. हे उपकरण अर्धस्वयंचलित असून, सिंगल फेज विद्युत प्रणाली किंवा गॅसवर चालतो. याच्या किमती ५० हजारांपासून पुढे आहेत.

संपर्क ः सचिन शेळके, ८८८८९९२५२२
(लोकनेते गोपिनाथरावजी मुंडे अन्नतंत्र महाविद्यालय, लोदगा, लातूर)


फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
यंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या...पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध...
ऊर्जा कार्यक्षम गूळ प्रक्रिया यंत्रसाखरेच्या तुलनेत गूळ हा अधिक प्रमाणात पौष्टीक,...
पारंपरिक साठवण पद्धतीला नव्या...पारंपरिक साठवण पद्धतींना नव्या तंत्रज्ञानाची जोड...
बीबीएफ यंत्रानेच करा हरभरा पेरणीरुंद वरंबा सरी यंत्राद्वारे गरजेनुसार ६० ते १५०...
कढीपत्ता भुकटी निर्मितीकढीपत्ता हा आहारामध्ये स्वाद वाढवण्यासाठी, रुचकर...
धान्य, बियाणे साठवणुकीसाठी झिल्ले,...महाराष्ट्रातील आदिवासीबहुल जिल्ह्यांत अनेक...
निर्वातात पदार्थ तळण्याचे तंत्रज्ञान तळलेले पदार्थ हे आपल्या आहाराचा एक भाग आहे....
सागरी पवनचक्क्यांच्या उभारणीतील...गेल्या काही वर्षांपासून अमेरिकी ऊर्जा विभागाच्या...
कांदा प्रक्रिया उद्योगासाठी यंत्रेकांद्याच्या उत्पादनासोबतच दरामध्ये मोठी चढ-उतार...
बेकरी प्रक्रिया उद्योगासाठी उपकरणेप्रामुख्याने तृणधान्यावरील प्रक्रिया उद्योगामध्ये...
ट्रॅक्‍टरची तांत्रिक तपासणी महत्त्वाची...ट्रॅक्‍टरची योग्य निगा राखावी. ट्रॅक्‍टर...
जिवंत माशांच्या वाहतुकीसाठी वाहनाची...लुधियाना येथील केंद्रीय काढणी पश्चात अभियांत्रिकी...
यंत्रांच्या साह्याने सकस गोळीपेंड...नंदूरबार येथील कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके)...
जलरोधक ई कपड्याची निर्मिती लेसर...भविष्यामध्ये अंगावर वापरता येणाऱ्या उपकरणे,...
भट्टीशिवायही लेसरने जोडता येईल सिरॅमिक सध्या सिरॅमिकच्या जोडणीसाठी भट्टी किंवा अधिक...
झेंड्याद्वारे मिळवता येईल ऊर्जा वाऱ्यावर फडकणाऱ्या झेंड्यांनी आजवर अनेकांना...
ट्रॅक्‍टर देखभालीसह अवजारांची निवड...ट्रॅक्‍टरच्या निवडीच्या वेळी जमीनधारणा, मातीचा...
अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांनी स्विकारले...खरिपात भात व पुढे डिसेंबरच्या सुमारास भुईमूग अशा...
भातासोबत मत्स्यशेती करण्याचे तंत्र भात पिकामध्ये साचणाऱ्या पाण्यामध्ये मासेपालन...
पशुखाद्य निर्मितीसाठी आवश्यक यंत्रे माणसांप्रमाणेच पाळीव पशुपक्ष्यांच्याही पोषकतेच्या...