agriculture stories in Marathi technowon,Hand pollination, not agrochemicals, increases cocoa yield and farmer income | Agrowon

कोको उत्पादनवाढीसाठी हाताने परागीभवनाचे तंत्र उपयुक्त

वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑक्टोबर 2020

प्रक्षेत्र चाचण्यांमध्ये कीटकनाशके, खतांचा वापर आणि हाताने केलेल्या परागीभवनामुळे पडणाऱ्या उत्पादनातील फरकांचा अभ्यास केला आहे. त्यात कोणत्याही रसायनांच्या  वापरापेक्षाही परागीभवनाचे महत्त्व लक्षात आले आहे.

कोको पिकाला जागतिक पातळीवर मोठी मागणी आहे. मात्र, परागीभवनाअभावी पिकाच्या उत्पादनामध्ये घट होत असल्याचे समोर येत आहे. गॉटिंग्टन विद्यापीठातील संशोधकांनी इंडोनेशियन वन विभागामध्ये केलेल्या प्रक्षेत्र चाचण्यांमध्ये कीटकनाशके, खतांचा वापर आणि हाताने केलेल्या परागीभवनामुळे पडणाऱ्या उत्पादनातील फरकांचा अभ्यास केला आहे. त्यात कोणत्याही रसायनांच्या (खते, कीटकनाशके) वापरापेक्षाही परागीभवनाचे महत्त्व लक्षात आले आहे. संशोधनाचे हे निष्कर्ष ‘जर्नल अॅग्रीकल्चर, इकोसिस्टिम्स अॅण्ड एन्व्हॉयर्नमेंट’ मध्ये प्रकाशित केले आहेत.

कोको पिकाचे परागीभवन हे छोट्या माश्या, वास्प या किटकांमार्फत होते. परागीभवनानंतर फुलांचे फळांमध्ये रूपांतर होते. अर्थात, यातील कोकोचे परागीभवन करणारा नेमका व महत्त्वाचा घटक कोणता, याविषयी फारशी माहिती अद्याप उपलब्ध नाही. सामान्यतः किंवा नैसर्गिक स्थितीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक फुलांना किटक अजिबात भेट देत नसल्याचे दिसून आले आहे. परिणामी या फुलांपासून फळ तयार होत नाही. कोकोची फायदेशीरता लक्षात आल्यानंतर कोकोची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. पुढे त्यात मोठ्या प्रमाणात रसायनांचाही वापर सुरू झाला. मात्र, रसायनांच्या वापरानंतरही अपेक्षित उत्पादन वाढ होत नसल्याचेच स्पष्ट होते. गॉटिंग्टन विद्यापीठातील संशोधक मॅन्युअल टोलेडो-हर्नान्डेझ, प्रा. तेजा त्शारत्के, प्रा, थॉमस सी. वांगर यांनी इंडोनेशियन ताडूलको विद्यापीठातील विद्यार्थ्यांसह कोको झाडांचे हाताने परागीभवन करण्याचा प्रयोग केला. या प्रयोगामध्ये हाताने परागीभवन केलेल्या झाडांचे उत्पादन १६१ टक्क्याने वाढल्याचे निष्कर्ष मिळाले आहेत.
      माणसांच्या साह्याने परागीभवन करण्यासाठीचा खर्च विचारात घेतला तरी सामान्य अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये ६९ टक्क्यांने वाढ झाली.
     अन्य एका प्रक्षेत्रामध्ये केलेल्या खते व कीटकनाशकांच्या वापरामुळे उत्पादनामध्ये कोणताही फरक पडला नाही.

 

कोणत्याही जैविक प्रक्रियांचा वेग वाढवण्यासाठी कृषी आणि पर्यावरणीय घटकांचा एकत्रीकरणाची आवश्यकता असते. पर्यावरणातील किटकांसारखे लहान घटक हे आपल्या हातात नक्कीच नसतात. अशा वेळी हाताने परागीकरण करण्याचे नावीन्यपूर्ण तंत्र उपयुक्त ठरू शकते.
- मॅन्युअल टोलेडो-हर्नान्डेझ, पीएच. डी., गॉटिंग्टन विद्यापीठ.

अलीकडे उष्ण किंवा शीत कटिबंधातील विविध पिकांमध्ये परागीभवनाची समस्या प्रामुख्याने जाणवत आहे. परागीभवनाच्या कमतरतेमुळे उत्पादन घसरत आहे. भविष्यामध्ये परागीभवनाची समस्या अत्यंत तीव्र होत जाणार आहे. त्यावर कशा प्रकारे मार्ग काढायचा, यासाठी अधिक संशोधन करावे लागणार आहे.
- प्रा. तेजा त्शारत्के, प्रमुख, कृषी-पर्यावरणशास्त्र विभाग, गॉटिंग्टन विद्यापीठ.


इतर टेक्नोवन
जनुकीय सुधारित पिकांसाठी अधिक...विविध पिकांमध्ये जनुकीय सुधारित जातींची भर पडत...
सूक्ष्म हवामानासाठी वारा प्रतिबंधक सजीव...थंड किंवा उष्ण वाऱ्यामुळे पिकाचे किंवा पशुधनाचे...
काटेकोर शेतीसाठी सापेक्ष आर्द्रतेचा...सापेक्ष आर्द्रता किंवा वातावरणातील बाष्प आणि पीक...
शेतीकामावेळी उडणाऱ्या धूलिकणांपासून करा...शेतीमध्ये विविध यंत्रे, अवजारांचा वापर करताना...
काकडीच्या सालापासून पर्यावरणपूरक...खरगपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (आयआयटी...
शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापरशेतीसमोरील समस्यांमध्ये बदलते हवामान, मजुरांची...
अल्पभूधारक शेतकऱ्यांने तयार केले छोटे...कोविड १९ च्या काळात टाळेबंदीमुळे अनेक उद्योगाचे...
काटेकोर शेतीसाठी पिकातील तापमानाचा...पॉलिहाऊस, शेडनेट यासारख्या संरक्षित शेतीमध्ये...
स्वयंचलित बहूपीक पेरणी यंत्ररब्बी हंगामातील गहू, ज्वारी, बाजरी, साळ, हरभरा,...
महिलांसाठी शेतीपयोगी अवजारेसुधारीत अवजारांचा वापर केल्याने शेतीच्या...
पिकातील सूर्यप्रकाशाची प्रत मोजणारी...आपल्याकडेही हरितगृह, शेडनेटगृहातील लागवड वेगाने...
खारपाणपट्ट्यातील समस्यांवर...दापुरा (ता. जि. अकोला) येथील स्वप्नील व संदीप या...
संरक्षित व नियंत्रित शेतीचे तंत्रज्ञानकृषी क्षेत्रात नियंत्रित शेतीला अनन्यसाधारण...
मुळांतील स्रावके ठरतात पिकासाठी संजीवनीवनस्पतींच्या वाढीमध्ये मुळाच्या परिवेशामध्ये...
कोको उत्पादनवाढीसाठी हाताने परागीभवनाचे...कोको पिकाला जागतिक पातळीवर मोठी मागणी आहे. मात्र...
वेळ, खर्चात बचत अन् गुणवत्तेसाठी...द्राक्ष बागेचे हंगाम व्यवस्थापन काटेकोरपणे होणे...
कृत्रिम बुद्धिमत्तेवर हवा नैतिकतेचा...वारविक विद्यापीठ, इंपिरिअल कॉलेज लंडन, इपीएफएल (...
पिकातील बाष्पोत्सर्जन मोजणारी उपकरणेशेतकऱ्यांनी सर्व जैविक घटक व आपले पीक याचा संबंध...
न रडवणारा गोड कांदा!कांदा हा नेहमीच कोणाला न कोणाला रडवतोच... एकतर...
संपूर्ण स्वयंचलित सिंचनासाठी केला...वॅगेनिंगन विद्यापीठातील संशोधकांच्या गटाने...