agriculture stories in Marathi Thinning & weed control Lay down method | Agrowon

विरळणी, तण काढणी करा झोपून!

वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

अत्यंत आरामदायी स्थितीमध्ये तणनियंत्रणासारखी काम करण्यासाठी अनेक साधने परदेशामध्ये वापरली जातात. परिणामी सहजतेने काम होते व कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.

अत्यंत आरामदायी स्थितीमध्ये तणनियंत्रणासारखी काम करण्यासाठी अनेक साधने परदेशामध्ये वापरली जातात. परिणामी सहजतेने काम होते व कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.

तणांची उगवण हा पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम करणारा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पिकाच्या वाढीच्या सुरवातीच्या टप्प्यामध्ये वाढलेली तणे ही पिकांची पाणी, अन्नद्रव्ये आणि सूर्यप्रकाश यासाठी स्पर्धा करतात. तणे काढण्यासाठी खुरप्यांसह विविध छोट्या मोठ्या अवजारांचा वापर केला जातो. मात्र, यातील अनेक छोटी अवजारे चालवण्यासाठी दिवसभर उकिडवे, दोन पायांवर बसून वाकून काम करावे लागते. परिणामी माणसांची कार्यक्षमता कमी होते.

अत्यंत आरामदायी स्थितीमध्ये ही अवजारे चालवता आली तर असा विचार दमलेल्या शेतकऱ्यांच्या किंवा शेतमजूरांच्या मनामध्ये नक्कीच येत असेल. परदेशामध्ये शेतांचे क्षेत्र प्रचंड मोठे असल्याने तण नियंत्रणासारखी कामे माणसांच्या साह्याने करणे अवघड ठरते. त्यासाठी प्रामुख्याने तणनाशकांचा वापर केला जातो. मात्र, सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी अडचण होते. त्यांच्यासाठी खरोखरच अगदी झोपून काम करणे शक्य व्हावे, यासाठी साधने तयार करण्यात आली आहेत. त्यांना वेगवेगळ्या कंपन्यांनी वेगवेगळी नावे दिली असली तरी सामान्यतः ‘लेझी वीडर’, ‘ले डाऊन वीडर’, ‘बेड वीडर’ असे म्हटले जाते.

  • या उपकरणांना चाके असून, त्यावर रोपांच्या ओळींतील रूंदीप्रमाणे बदलता येणारी एक माणूस झोपण्यायोग्य व्यवस्था केलेली असते. त्यावर सावली केलेली असते.
  • काही साधने ही ट्रॅक्टरचलित, तर काही सौर उर्जेवर चालणारी आहेत. काही माणसांद्वारे पायाने धक्का देऊन चालणारीही आहेत.
  • यावरील बेडवर माणूस पालथे झोपून तणे काढणे, विरळणीसारखी कामे करू शकतो. अगदी मान, चेहरा टेकवण्यासाठी योग्य सोय केलेली असून, तिथे पारदर्शक काचेचा वापर केल्याने जमिनीलगतची पिके आणि तणे स्पष्ट दिसतात.
  • दोन्ही हात काम करण्यासाठी रिकामे राहतात. अत्यंत आरामदायी व्यवस्था असल्याने माणसांची कार्यक्षमता वाढते.

फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...
आवळा प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेआपल्या गुणकारी, औषधी गुणधर्मामुळे अनेक आयुर्वेदीय...
वितरणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाला गोदाम...सध्या केवळ ड्रोनच्या वापरातून उत्पादने...
अत्याधुनिक लायसीमीटर आधारित सिंचन...पिकाच्या सिंचनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी...
दूध काढण्यासाठी फिरती घडवंची, तिपाईदुग्ध व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन अखिल...
प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतील...हिरव्या वनस्पती किंवा पिकांद्वारे सूर्यप्रकाशाचे...
हायड्रोपोनिक्स पद्धतीने मिळवा चाराहायड्रोपोनिक्स म्हणजे माती विरहित किंवा केवळ...
चाऱ्यासाठी कमी किमतीचे हायड्रोपोनिक्स...अल्प भूधारक पशुपालकांना हिरव्या चाऱ्याची उपलब्धता...
अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर...अक्षय ऊर्जा स्रोतांमध्ये सूर्यप्रकाश, वारा,...
स्वयंचलित ठिबकासह ९० एकरांत यांत्रिकी...परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील कृषी पदवीधर व...
सुपारी प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेसुपारी हे कोकणातील व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाचे...
पिकातील सूक्ष्महवामान मोजणारी उपकरणेया वर्षी महाराष्ट्राच्या अनेक विभागात...
यांत्रिक पद्धतीने भात रोपलागवडीचा...सांगे (जि. पालघर) येथील कृषिभूषण व अभ्यासू शेतकरी...
विरळणी, तण काढणी करा झोपून!अत्यंत आरामदायी स्थितीमध्ये तणनियंत्रणासारखी काम...
अकरा ‘सेन्सर्स’ सह ‘वेदर स्टेशन’ द्वारे...वडाळी नजीक (ता.निफाड, जि. नाशिक) येथील रोशन...
योग्य प्रकारे करा ट्रॅक्टर,अवजारांचा...ट्रॅक्‍टरची सर्व निगा व देखभाल केल्यास सुगीमध्ये...
आले पिकासाठी सुधारित अवजारेवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने हळद आणि...
श्रम कमी करणारी सुधारित अवजारेमहिलांचे शेतीकामातील श्रम लक्षात घेऊन सुधारित...
ट्रॅक्टरचलित मडपंपाद्वारे शेणस्लरी...साखर कारखान्यातील मोठ्या पदावरून स्वेच्छानिवृत्ती...
आरोग्यदायी गूळ बनविण्याचे आधुनिक तंत्रदेशामध्ये दर्जेदार आणि आरोग्यदायी गूळ बनविण्याचे...