agriculture stories in marathi, Three concepts from complexity could play a big role in social animal research | Agrowon

सजीवांच्या सामाजिकतेची गुंतागुंत उलगडेल तीन संकल्पनाद्वारे 

वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

विविध सामाजिक सजीवांमध्ये अत्यंत गुंतागुंतीच्या संरचना निर्माण झालेल्या दिसून येतात. त्या तयार होण्यामागे केवळ उत्क्रांती आणि जुळवणूक या दोन बाबींचा प्राधान्याने उल्लेख होतो. मात्र, नुकत्याच सॅण्टा फे संस्थेतील आजी माजी संशोधकांनी केलेल्या अभ्यासामध्ये आणती तीन संकल्पना महत्त्वाच्या असल्याचे सांगितले आहे. त्यातून प्राण्यांच्या सामाजिकतेचा अभ्यास, तुलना करणे सोपे होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

विविध सामाजिक सजीवांमध्ये अत्यंत गुंतागुंतीच्या संरचना निर्माण झालेल्या दिसून येतात. त्या तयार होण्यामागे केवळ उत्क्रांती आणि जुळवणूक या दोन बाबींचा प्राधान्याने उल्लेख होतो. मात्र, नुकत्याच सॅण्टा फे संस्थेतील आजी माजी संशोधकांनी केलेल्या अभ्यासामध्ये आणती तीन संकल्पना महत्त्वाच्या असल्याचे सांगितले आहे. त्यातून प्राण्यांच्या सामाजिकतेचा अभ्यास, तुलना करणे सोपे होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

मधमाशी, पक्षी आणि माणसांसह विविध प्राण्यांमध्ये त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांना सामोरे जाताना गुंतागुंतीच्या सामाजिक संरचना विकसित झाल्या आहेत. काही प्रजातीमध्ये अधिक गुंतागुंतीच्या संरचना का विकसित झाल्या, हा मूलभूत आव्हानात्मक प्रश्न असून, त्यावर सॅण्टा फे इन्स्टिट्यूट येथील चार आजी आणि एका माजी संशोधक विद्यार्थ्याने अभ्यास केला आहे. त्याचे निष्कर्ष नुकतेच अॅनिमल बिहेवियर या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित केले आहे. 

शास्त्रीय संकल्पनांची गुंतागुंत ही जीवशास्त्राचा भाग आहे. उदा. उत्क्रांती आणि जुळवणूक ही या दोन्ही क्षेत्रातील महत्त्वाच्या आणि मूलभूत बाबी आहेत. त्यात आणखी तीन संकल्पना - संघटनेचा आकार, दबाव आणि उद्भव यांची भर टाकली आहे. त्यातून ही गुंतागुंत समजण्यास आणि अभ्यासणे सोपे होणार आहे. हे चारही संशोधक गणित, माहिती तंत्रज्ञान, मेंदूतज्ज्ञ, सांस्कृतिक उत्क्रांती आणि प्राणी वर्तनशास्त्र अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील असून, त्यांच्या विविध दृष्टिकोनामुळे या अभ्यासाला सखोलता प्राप्त झाली आहे. संकल्पनाविषयी माहिती देताना सिनसिनाटी विद्यापीठातील एलिझाबेथ हॉबसन यांनी सांगितले, की गुंतागुंतीच्या सामाजिक संकल्पनांच्या निदानासाठी या तीन संकल्पना वेगवेगळ्या भासत असल्या तरी एकाचाच भाग असू शकतात. त्यातून प्राण्याच्या सामाजिक संरचनाविषयी संपूर्णपणे नव्या दिशा आणि दृष्टिकोन मिळण्यास मदत होईल. 

अशा आहेत संकल्पना 

  • सामाजिक आकार (social scale) - हा प्राण्याच्या समाजातील गुंतागुंतीची तीव्रता मोजण्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. आकारानुसार गुंतागुंतीचे प्रमाण बदलत जाते. दोन वैयक्तिक मधमाश्यांमधील संबंध हे तुलनेने साधे असू शकतात. मात्र, वसाहतीमधील संरचना या अधिक गुंतागुंतीच्या असू शकतात. 
  • दबाब (compression) - यात ती प्रणाली कशा प्रकारे माहिती उलगडते हे समजते. प्राणीशास्त्रज्ञ या दबावाचा वापर वेगवेगळ्या प्राण्यांचा एकमेकांशी किंवा वेगळ्या प्राण्यांची तुलनेसाठी करू शकतात. किंवा सामाजिक प्राण्यांमध्ये एकमेकांशी असलेले संबंध आणि गटांची रचना समजण्यासाठी आवश्यक मेंदूतील प्रक्रियांसाठी यांचा वापर होऊ शकतो. म्हणजेच या प्राण्यांना त्यांच्या समाजामध्ये वावरताना, काम करताना येणारा एकूण ताण कसा कमी करतात, हे समजू शकते. 
  • उद्भव (emergence) - समाजामध्ये नवीन पॅटर्न निर्माण होण्याची स्थिती. उदा. पक्ष्यांमध्ये लाटेप्रमाणे तयार होणारे वर्तन. हे एका पक्ष्याच्या पातळीवर शक्य नसते, पण गटामध्ये त्याला विविध आयाम मिळू शकतात. समाजातील अधिकृत पदरचना ही सामान्यतः सांस्कृतिक शिक्षणातून तयार होते किंवा गटातील नेतृत्वाकडून ती नव्याने दाखवली जाते. 

 


इतर ताज्या घडामोडी
योग्य पद्धतीने करा बटाटा काढणीयंदा बटाटा पिकाची काढणी फेब्रुवारी- मार्च...
मध्य प्रदेशात द्राक्ष लागवडीसाठी ‘...पुणे : मध्य प्रदेशातील बागायतदार शेतकरी आता...
खरबूज लागवड तंत्रज्ञानखरबूज पिकाची लागवड जानेवारी ते मार्च यादरम्यान...
नांदर्खे, खोंडमळीत आधार प्रमाणीकरण,...नंदुरबार  ः महात्मा फुले कर्जमुक्ती...
जळगाव  : आधार प्रमाणीकरण करण्यासाठी...जळगाव  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कांदा दरांवरील दबाव वाढलाजळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
गडहिंग्लजमध्ये यंदा अधिक पाणीसाठागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : गतवर्षीच्या ऑगस्ट...
यवतमाळ जिल्हा बॅंकेकरिता तब्बल ३००...यवतमाळ  ः जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या...
मोसंबीला खतमात्रा देणे अत्यंत आवश्‍यक...औरंगाबाद : ‘‘मोसंबी पीक हे शेतकऱ्यांची...
उच्च तंत्रज्ञानावर आधारित फुलशेती...नाशिक : मालेगाव तालुक्यातील वडेल येथील कृषी...
नांदेड विभागात साखरेचे २५ लाख क्विंटलवर...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नांदेड जिल्ह्यातील भूजल पातळीत १.२६...नांदेड : नांदेड जिल्ह्यातील भूजल पातळीमध्ये...
नाशिक : माथाडींच्या संपामुळे बाजार...नाशिक  : राज्यातील माथाडी कामगारांच्या...
‘भीमा’च्या कामगारांचे पैसे पाच...मोहोळ, जि. सोलापूर : कामगारांच्या खात्यावर ५...
सावरकरांच्या गौरव प्रस्तावावरून भाजप...मुंबई ः स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव...
करमाळ्यात शुद्ध; पंढरपुरात सर्वांत...सोलापूर : जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे ६१५...
शिवस्मारक निविदेत गैरव्यवहार नाही;...मुंबई ः मुंबईजवळच्या अरबी समुद्रात उभारण्यात...
तूर खरेदीसाठी हमी देण्याबाबत मंत्रिमंडळ...मुंबई ः ‘‘राज्यात सध्या ३१७ तूर खरेदी केंद्रे...
पुणे जिल्ह्यात भाजीपाला पिकांकडे...पुणे ः गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पोषक...
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी २६ मार्चला...मुंबई ः राज्यसभेच्या ५५ जागांसाठी येत्या २६ मार्च...