मळणी यंत्राची क्षमता, गुणवत्ता जपण्यासाठी

पिकाच्या लागवडीपासून काढणीपर्यंत उत्तम व्यवस्थापन केल्यानंतर हाती आलेल्या उत्पादनाची काढणीपश्चात प्रक्रियेकडे शेतकऱ्यांचे अनेक वेळा दुर्लक्ष होते. यात मोठे नुकसान त्याला सोसावे लागू शकते.
मळणी यंत्राची क्षमता, गुणवत्ता जपण्यासाठी
मळणी यंत्राची क्षमता, गुणवत्ता जपण्यासाठी

काढणीनंतर पिकांची मळणी केली जाते. मळणीसाठी पारंपरिक पद्धतीप्रमाणेच यंत्राचा वापर वेगाने वाढला आहे. पिकाच्या लागवडीपासून काढणीपर्यंत उत्तम व्यवस्थापन केल्यानंतर हाती आलेल्या उत्पादनाची काढणीपश्चात प्रक्रियेकडे शेतकऱ्यांचे अनेक वेळा दुर्लक्ष होते. यात मोठे नुकसान त्याला सोसावे लागू शकते. कोणत्याही मळणी यंत्राची क्षमता आणि गुणवत्ता पुढील तीन घटकांवर अवलंबून असते. १) पीक घटक २) मळणीयंत्र घटक ३) कार्यरत घटक पीक घटक : या प्रकारात खालील तीन घटकांचा समावेश होतो. १. पिकाचा प्रकार २. पिकाचे वाण ३. पिकांमधील ओलावा मळणी यंत्रामध्ये समान वेग आणि दिशेने होणाऱ्या माऱ्यामुळे लहान आकाराच्या धान्यापेक्षा मोठ्या आकाराच्या धान्याचे नुकसान हे जास्त होते. धान्यामधील ओलावा हा धान्याचे नुकसान कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जर पिकांमध्ये जास्त ओलावा असेल तर मळणी यंत्राला मळणीसाठी जास्त प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे धान्याचे मोठ्या प्रमाणावर अंतर्गत नुकसानदेखील होते. सोयाबीनसाठी निर्धारित ओलावा हा ८ ते १२ टक्के इतका असावा. मळणी यंत्र आणि कार्यरत घटक यात ड्रमचा वेग, ड्रमचा आकार, खाद्य दर आणि भरडले जाण्यासाठी ठेवण्यात आलेले अंतर (कॉन्केव्ह क्लिअरन्स) या चार घटकांचा समावेश असतो. ड्रम वेग ः प्रत्येक पिकासाठी ठरवून दिलेला ड्रम वेग ठेवावा. या निर्धारित वेगापेक्षा ड्रमचा वेग जास्त असल्यास धान्य फुटून अधिक नुकसान होऊ शकते. ड्रमचा वेग त्यापेक्षा खूपच कमी ठेवल्यास मळणी चांगली होत नाही. वेगवेगळ्या पिकांसाठी शिफारशीत केलेला निर्धारित ड्रम वेग

  •  पीक - ड्रम वेग (RPM)
  • तांदूळ - ६७५-१०००
  • गहू - ५५०-११००
  •  डाळवर्गीय पीक - ४००-७५०
  • बाजरी - ४००-५५०
  • वाटाणा - ४३०-७५०
  • खाद्य दर : खाद्य दर हा किलो प्रति तास या एककात मोजला जातो. खाद्य दर हा समप्रमाणात असणे अत्यावश्यक आहे. खाद्य दर खूपच जास्त असेल तर सिलिंडर जॅम होऊ शकतो. खूपच कमी खाद्य दर असेल तर मळणी चांगली होत नाही. मळणी यंत्रातील समस्यांची कारणे आणि निवारण : मळणी यंत्राचा वापर करीत असताना वेगवेगळ्या समस्या उद्भवत असतात. उदा. थ्रेशिंग ड्रम जॅम होणे, मळणी यंत्र चालू असताना धान्य मोठ्या प्रमाणात फुटणे. या विविध समस्यांची काही ठराविक कारणे आहेत. त्यांचे निवारण करण्यासाठी खालील उपाय केले जाऊ शकतात. १. थ्रेशिंग ड्रम जॅम होणे  कारणे व उपाय

  • क्षमतेपेक्षा जास्त खाद्य दर - मळणीयंत्र वापरताना खाद्य दर नेहमी क्षमतेनुसार ठेवा.
  • पट्टा सैल करणे - सर्व पट्टे व त्याचा ताण तपासून पहा.
  • ड्रम वेग खूप कमी असणे - गरजेनुसार ड्रम स्पीड वाढवा.
  • ओले पीक - मळणीआधी पीक चांगले वाळवा.
  • सिलिंडर व कॉन्केव्ह यांच्यातील अंतर कमी करणे. - सिलिंडर आणि कॉन्केव्ह यांच्यातील अंतर योग्य ठेवा.
  • २. मळणी यंत्र वापरताना मोठ्या प्रमाणात धान्य फुटणे कारणे व उपाय

  •  ड्रम स्पीड खूप जास्त असणे. --- गरजेनुसार ड्रम स्पीड कमी करा.
  • सिलिंडर व कॉन्केव्ह यांच्यातील अंतर कमी करणे --- ड्रम व कॉन्केव्ह यांच्यातील अंतर योग्य ठेवा.
  • ३. पेंढ्याबरोबर धान्य उडून/वाहून जाणे. कारणे व उपाय

  •  पंख्याचा वेग खूप जास्त असणे. - पंख्याचा वेग कमी करा.
  • जाळीचे छिद्र जॅम होणे. -जाळीचे सर्व छिद्र स्वच्छ करून मोकळे करा
  • ४. धान्याबरोबर भुसा व इतर कचरा येणे. कारणे व उपाय

  • पंख्याचा वेग खूप कमी असणे. - पंख्याचा वेग नियंत्रित ठेवा.
  • जाळीचा अयोग्य आकार असणे. - जाळीचा आकार योग्य ठेवा.
  • असमान खाद्य दर असणे.  - खाद्य दर नेहमी सारखा ठेवा.
  • मळणी यंत्र हाताळताना घ्यावयाची खबरदारी :

  • कोणत्याही यंत्राचा वापर करत असताना त्यात अपघाताच्या शक्यता नक्कीच असतात. मात्र, अपघातांचे एकूण प्रमाण पाहिल्यास मळणीयंत्र हाताळताना होणाऱ्या अपघाताची संख्या अन्य यंत्रापेक्षा खूपच जास्त आहे. भारतात एका वर्षांमध्ये कृषी क्षेत्रात होणाऱ्या अपघाताच्या ३०.५ टक्के अपघात हे केवळ कृषी यंत्रामुळे होतात. कृषी यंत्रामुळे होणाऱ्या अपघाताच्या १४ टक्के अपघात हे मळणी यंत्रावर काम करताना होतात. अपघात रोखण्यासाठी पुढील बाबी लक्षात ठेवाव्यात.
  • कोणतेही सुरक्षा उपकरण काढू नका.
  • सैल कपडे घालू नका.
  • मळणीयंत्रावर उभे राहू नका.
  • फिडींग करताना दुरूनच फीडिंग करावे.
  • मळणी यंत्र बंद करण्यापूर्वी कोणतेही बदल अथवा समायोजन करू नका.
  • डॉ. अमोल एम.गोरे, ९४०४७६७९१७ (कृषी अभियांत्रिकी विभाग, महाराष्ट्र तंत्रज्ञान संस्था, औरंगाबाद.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com