agriculture stories in Marathi Threshing machine efficiency | Page 2 ||| Agrowon

मळणी यंत्राची क्षमता, गुणवत्ता जपण्यासाठी

डॉ. अमोल एम.गोरे
शुक्रवार, 15 जानेवारी 2021

पिकाच्या लागवडीपासून काढणीपर्यंत उत्तम व्यवस्थापन केल्यानंतर हाती आलेल्या उत्पादनाची काढणीपश्चात प्रक्रियेकडे शेतकऱ्यांचे अनेक वेळा दुर्लक्ष होते. यात मोठे नुकसान त्याला सोसावे लागू शकते.

काढणीनंतर पिकांची मळणी केली जाते. मळणीसाठी पारंपरिक पद्धतीप्रमाणेच यंत्राचा वापर वेगाने वाढला आहे. पिकाच्या लागवडीपासून काढणीपर्यंत उत्तम व्यवस्थापन केल्यानंतर हाती आलेल्या उत्पादनाची काढणीपश्चात प्रक्रियेकडे शेतकऱ्यांचे अनेक वेळा दुर्लक्ष होते. यात मोठे नुकसान त्याला सोसावे लागू शकते.

कोणत्याही मळणी यंत्राची क्षमता आणि गुणवत्ता पुढील तीन घटकांवर अवलंबून असते.
१) पीक घटक
२) मळणीयंत्र घटक
३) कार्यरत घटक

पीक घटक : या प्रकारात खालील तीन घटकांचा समावेश होतो.
१. पिकाचा प्रकार २. पिकाचे वाण ३. पिकांमधील ओलावा
मळणी यंत्रामध्ये समान वेग आणि दिशेने होणाऱ्या माऱ्यामुळे लहान आकाराच्या धान्यापेक्षा मोठ्या आकाराच्या धान्याचे नुकसान हे जास्त होते.
धान्यामधील ओलावा हा धान्याचे नुकसान कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जर पिकांमध्ये जास्त ओलावा असेल तर मळणी यंत्राला मळणीसाठी जास्त प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे धान्याचे मोठ्या प्रमाणावर अंतर्गत नुकसानदेखील होते. सोयाबीनसाठी निर्धारित ओलावा हा ८ ते १२ टक्के इतका असावा.

मळणी यंत्र आणि कार्यरत घटक यात ड्रमचा वेग, ड्रमचा आकार, खाद्य दर आणि भरडले जाण्यासाठी ठेवण्यात आलेले अंतर (कॉन्केव्ह क्लिअरन्स) या चार घटकांचा समावेश असतो.

ड्रम वेग ः प्रत्येक पिकासाठी ठरवून दिलेला ड्रम वेग ठेवावा. या निर्धारित वेगापेक्षा ड्रमचा वेग जास्त असल्यास धान्य फुटून अधिक नुकसान होऊ शकते. ड्रमचा वेग त्यापेक्षा खूपच कमी ठेवल्यास मळणी चांगली होत नाही.

वेगवेगळ्या पिकांसाठी शिफारशीत केलेला निर्धारित ड्रम वेग

 •  पीक - ड्रम वेग (RPM)
 • तांदूळ - ६७५-१०००
 • गहू - ५५०-११००
 •  डाळवर्गीय पीक - ४००-७५०
 • बाजरी - ४००-५५०
 • वाटाणा - ४३०-७५०

खाद्य दर :
खाद्य दर हा किलो प्रति तास या एककात मोजला जातो. खाद्य दर हा समप्रमाणात असणे अत्यावश्यक आहे. खाद्य दर खूपच जास्त असेल तर सिलिंडर जॅम होऊ शकतो. खूपच कमी खाद्य दर असेल तर मळणी चांगली होत नाही.

मळणी यंत्रातील समस्यांची कारणे आणि निवारण :
मळणी यंत्राचा वापर करीत असताना वेगवेगळ्या समस्या उद्भवत असतात. उदा. थ्रेशिंग ड्रम जॅम होणे, मळणी यंत्र चालू असताना धान्य मोठ्या प्रमाणात फुटणे. या विविध समस्यांची काही ठराविक कारणे आहेत. त्यांचे निवारण करण्यासाठी खालील उपाय केले जाऊ शकतात.

१. थ्रेशिंग ड्रम जॅम होणे
 कारणे व उपाय

 • क्षमतेपेक्षा जास्त खाद्य दर - मळणीयंत्र वापरताना खाद्य दर नेहमी क्षमतेनुसार ठेवा.
 • पट्टा सैल करणे - सर्व पट्टे व त्याचा ताण तपासून पहा.
 • ड्रम वेग खूप कमी असणे - गरजेनुसार ड्रम स्पीड वाढवा.
 • ओले पीक - मळणीआधी पीक चांगले वाळवा.
 • सिलिंडर व कॉन्केव्ह यांच्यातील अंतर कमी करणे. - सिलिंडर आणि कॉन्केव्ह यांच्यातील अंतर योग्य ठेवा.

२. मळणी यंत्र वापरताना मोठ्या प्रमाणात धान्य फुटणे
कारणे व उपाय

 •  ड्रम स्पीड खूप जास्त असणे. --- गरजेनुसार ड्रम स्पीड कमी करा.
 • सिलिंडर व कॉन्केव्ह यांच्यातील अंतर कमी करणे --- ड्रम व कॉन्केव्ह यांच्यातील अंतर योग्य ठेवा.

३. पेंढ्याबरोबर धान्य उडून/वाहून जाणे.
कारणे व उपाय

 •  पंख्याचा वेग खूप जास्त असणे. - पंख्याचा वेग कमी करा.
 • जाळीचे छिद्र जॅम होणे. -जाळीचे सर्व छिद्र स्वच्छ करून मोकळे करा

४. धान्याबरोबर भुसा व इतर कचरा येणे.
कारणे व उपाय

 • पंख्याचा वेग खूप कमी असणे. - पंख्याचा वेग नियंत्रित ठेवा.
 • जाळीचा अयोग्य आकार असणे. - जाळीचा आकार योग्य ठेवा.
 • असमान खाद्य दर असणे.  - खाद्य दर नेहमी सारखा ठेवा.

मळणी यंत्र हाताळताना घ्यावयाची खबरदारी :

 • कोणत्याही यंत्राचा वापर करत असताना त्यात अपघाताच्या शक्यता नक्कीच असतात. मात्र, अपघातांचे एकूण प्रमाण पाहिल्यास मळणीयंत्र हाताळताना होणाऱ्या अपघाताची संख्या अन्य यंत्रापेक्षा खूपच जास्त आहे. भारतात एका वर्षांमध्ये कृषी क्षेत्रात होणाऱ्या अपघाताच्या ३०.५ टक्के अपघात हे केवळ कृषी यंत्रामुळे होतात. कृषी यंत्रामुळे होणाऱ्या अपघाताच्या १४ टक्के अपघात हे मळणी यंत्रावर काम करताना होतात. अपघात रोखण्यासाठी पुढील बाबी लक्षात ठेवाव्यात.
 • कोणतेही सुरक्षा उपकरण काढू नका.
 • सैल कपडे घालू नका.
 • मळणीयंत्रावर उभे राहू नका.
 • फिडींग करताना दुरूनच फीडिंग करावे.
 • मळणी यंत्र बंद करण्यापूर्वी कोणतेही बदल अथवा समायोजन करू नका.

डॉ. अमोल एम.गोरे, ९४०४७६७९१७
(कृषी अभियांत्रिकी विभाग, महाराष्ट्र तंत्रज्ञान संस्था, औरंगाबाद.)


इतर टेक्नोवन
काढणीपश्‍चात कामासाठी सुधारित यंत्रेमानवचलित सुपारी सोलणी यंत्र पारंपरिक पद्धतीने...
सुधारित तंत्राद्वारे वाढवली उसाची...सतत शिकण्याची आस, अभ्यास, मेहनत व सुधारित...
कपाशी अवशेषातील बोंड अळीचा नाश करणारी...कपाशी पिकामध्ये अमेरिकन बोंड अळी आणि गुलाबी बोंड...
सुगंधी तेलनिर्मितीतून शेतकऱ्यांना...जिरॅनॉलचे प्रमाण अधिक असल्यामुले पाल्मरोसा (शा....
गोचिड निर्मूलनासाठी पर्यावरणपुरक पद्धतीजनावरांच्या शरीरावरील गोचिड निर्मुलन करण्यासाठी...
सुधारित भोपळा जातीच्या लागवडीतून...ओडिशा येथील चंदन कुमार खुंटिया यांनी केवळ...
फवारणी यंत्राची देखभालआपण शेतामध्ये फवारणी यंत्रांचा अनेक वेळा वापर करत...
कडक जमिनींसाठी ठरतोय ‘व्हायब्रेटिंग...खोल जमिनीत तयार झालेला कडक थर फोडण्यासाठी तसेच...
शेळी दूध प्रक्रियेला संधीभारतीय कृषी संशोधन परिषदने शेळीच्या दुधापासून...
मशागतीसाठी सुधारित रोटरी नांगररोटरी नांगर हे प्राथमिक मशागतीसाठी वापरले जाणारे...
विद्यार्थी बंधूंनी उभारला जैविक स्लरी...पुणे जिल्ह्यातील नानगाव येथील प्रतीक व प्रवीण या...
कार्यक्षम जल व्यवस्थापनासाठी नव्या दिशाकाटेकोर सिंचन व कार्यक्षम जलवापर पद्धतीच्या...
शेती नियोजनासाठी ड्रोन तंत्रज्ञानपिकांमधील पाण्याचा ताण, सूक्ष्म अन्नद्रव्यांची...
पर्वतीय, पठारी प्रदेशातील शेतीसाठी...भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या रांची येथील पर्वतीय...
हवामान बदल समरस शेतीसाठी हवी यंत्रणाआज अन्नधान्याचे उत्पादन पुरेसे असले, तरी भविष्यात...
आधुनिक काळाची गरज ः कृषी यंत्रमानवजागतिक पातळीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...
कृषी अभियांत्रिकी ज्ञानाचा उपयोग व्हावामहाराष्ट्र राज्य अवर्षण, दुष्काळ याबरोबरच अनियमित...
‘हायड्रोपोनिक’ तंत्रज्ञानावर आधारित...नांदेड शहरापासून जवळच असलेल्या पुयणी (ता. नांदेड...
ट्रॅक्टरचलित फवारणी यंत्रेरोग, किडीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी फवारणी...
अर्का किरण’ पेरू वाणाची अति सघन लागवड...आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील इसुका दार्सी...