नुसत्या बुंध्यालाही जगवले शेजारच्या सजातीय झाडांनी 

नुसत्या बुंध्यालाही जगवले शेजारच्या सजातीय झाडांनी 
नुसत्या बुंध्यालाही जगवले शेजारच्या सजातीय झाडांनी 

न्यूझीलॅंड येथील घनदाट जंगलांमध्ये झाडाचा बुंधा स्वतःला शेजारच्या झाडांच्या समन्वयासाठी आणि एकमेकांमध्ये अन्न, पाण्याची देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने स्वतःला जिवंत ठेवत असल्याचे दिसून आले आहे. या जिवंत राहिलेल्या मूळ खुंटाच्या विकसित झालेल्या मुळाच्या पसाऱ्यांचा सभोवतालच्या झाडांना व झाडांपासून मिळालेल्या अन्नद्रव्यांचा बुंध्याला चांगला फायदा होतो. या निष्कर्षामुळे झाडांच्या एकल विचार करण्याच्या पद्धती बाजूला ठेवावी लागणार आहे. पूर्ण जंगलाच्या परिस्थितीला अत्यंत अचूकपणे समजून घेण्याची आवश्यकता यातून निर्माण झाली आहे. हे संशोधन ‘आयसायन्स’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित झाले आहे.  ऑकलॅंड तंत्रज्ञान विद्यापीठातील सहायक प्रो. सेबास्टियन लेयझिंगर व त्यांचे सहकारी मार्टिन बादर पश्चिम ऑकलॅंड येथील जंगलामध्ये फिरत असताना कौरी झाडांच्या नुसत्या बुंध्यापाशी थबकले. कारण, त्या बुंध्यावर एकही पान नसूनही तो बुंधा जिवंत होता. हे तसे आश्चर्यकारक होते. या मागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या बुंध्याला आणि त्याच्या शेजारच्या समान प्रजातीच्या झाडांना नेमके कसे पाणी मिळते, याचा अभ्यास सुरू केला. या बुंध्यापासून अन्य झाडांपर्यंत होत असलेले पाण्याचे प्रवाह हे एकमेकांशी व्यस्त प्रमाणात संबंधित होते.  येथील पाण्याच्या मोजमापाचा अर्थ असा की, बुंध्याची मुळे आणि त्यांच्या शेजारच्या समान प्रजातीच्या झाडाचे एकमेकांमध्ये कलम झाल्यासारखी स्थिती होती. हे मुळावरील कलम आपल्या शेजारच्या झाडांचा मुळे ओळखून झाले होते. जनुकीयदृष्ट्या भिन्न असलेल्या तरीही एकमेकांमध्ये अन्नद्रव्ये आणि पाणी यांची देवाणघेवाण या परिस्थितीकीमध्ये शक्य झाल्याचे दिसत होते.  ही स्थिती सामान्य झाडांपेक्षा वेगळी आहे. बहुतांश झाडे आपल्या संभाव्य पर्यावरणातून पाणी मिळवतात. येथे या स्थितीमध्ये बुंध्याने अन्य झाडे जे करतात, त्याचे अनुसरण केले. कारण, त्याच्याकडे वातावरणाशी देवाणघेवाण करण्यासाठी आवश्यक ती पाने नव्हती. बहुतांश वनस्पती पानांद्वारे होणाऱ्या बाष्पोत्सर्जन आणि हवेच्या देवाणघेवाणीवर अन्न तयार करण्याची प्रक्रिया राबवतात.  समान प्रजातीमध्ये मुळांचे कलम ही सामान्य बाब असल्याचे लेयझिंगर यांनी सांगितले. बुंध्यासाठी ही पद्धती फायद्याची आहे, यात शंका नाही. कारण, जर अन्य मुळांकडून अन्न आणि पाणी मिळाले नसता ते जिवंत राहू शकले नसते. बाजूच्या झाडांनी त्यांच्या या वयस्कर पूर्वजाला का जिवंत ठेवले असेल, हा प्रश्न शास्त्रज्ञांना सतावतो आहे. मात्र, जिवंत कौरी झाडे अन्य बुंध्यांना का जिवंत ठेवू इच्छितात, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.  कदाचित हे असेल कारण ः 

  • लेयझिंगर म्हणाले, की मुळांवरील कलम हे झाडाची पाने गळून जाण्यापूर्वी कधीतरी झाले असेल, असे या घटनेचे एक स्पष्टीकरण देता येईल. कलम झालेल्या मुळांद्वारे झाडांची मूळ प्रणाली कितीतरी पट अधिक विस्तारते. त्यामुळे तीव्र उतार असलेल्या जंगलामध्येही झाडांना पाणी आणि अन्नद्रव्ये घेणे सोपे जाते. अन्य झाडांपैकी एक झाडा कर्बोदके पुरवणे बंद करत असले तरी अन्य झाडांच्या ते लक्षात येत नसावे किंवा या वयस्कर झाडांला पेन्शनर प्रमाणे काही प्रमाणात अन्नाचा पुरवठा या झाडांकडून होत असावा. 
  • या साऱ्या प्रक्रियेविषयी समजताच आपल्या झाडांविषयीच्या अनेक समजांना मुठमाती द्यावी लागेल. कृषी तंत्रामध्ये प्रत्येक रोप किंवा झाड हे वेगळे असल्याचे गृहित धरून अनेक उपाययोजना करत असतो. 
  • -दुष्काळाच्या स्थितीमध्ये झाडे कमी पाण्यावरही एकमेकांच्या सहकार्याने जगू शकत असतील. अशा तंत्रामुळे त्यांच्या तग धरण्याची क्षमता वाढत असेल. अर्थात, या पद्धतीमुळे रोगांचा प्रसारही वेगाने होत असेल. 
  • सध्या संशोधन कौरी झाडाचा बुंधा आणि अन्य झाडांमध्ये निर्माण झालेले संबंध यांचा अधिक अभ्यास करत आहेत. अशा प्रकारचे आणखी बुंधे आणि त्यांच्या शेजाऱ्यांमधील एकमेकावरील अवलंबित्व शोधले जात आहे. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com