agriculture stories in marathi , Turbulence creates ice in clouds | Agrowon

ढगातील हिमकणांच्या निर्मितीची प्रक्रिया मोजली

वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

एकत्रित प्रकारच्या ढगांमध्ये हवेच्या उभ्या प्रवाहामुळे बर्फाची निर्मिती वाढते. हा सहसंबध सैद्धांतिकदृष्ट्या खूप आधीच मांडण्यात आला असला, तरी त्याची निसर्गामध्ये पहिल्यांच प्रचिती आली आहे. लेइब्निझ इन्स्टिट्यूट फॉर ट्रोपोस्फेअरीक रिसर्च (ट्रोपोज) येथील संशोधकांनी लेसर आणि रडार उपकरणाच्या साह्याने हवेच्या उभ्या प्रवाहाचे वेग मोजला असून, पातळ एकत्रित ढगांमध्ये बर्फाची निर्मिती होताना मोजली आहे. हे संशोधन ‘नेचर रिसर्च’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

एकत्रित प्रकारच्या ढगांमध्ये हवेच्या उभ्या प्रवाहामुळे बर्फाची निर्मिती वाढते. हा सहसंबध सैद्धांतिकदृष्ट्या खूप आधीच मांडण्यात आला असला, तरी त्याची निसर्गामध्ये पहिल्यांच प्रचिती आली आहे. लेइब्निझ इन्स्टिट्यूट फॉर ट्रोपोस्फेअरीक रिसर्च (ट्रोपोज) येथील संशोधकांनी लेसर आणि रडार उपकरणाच्या साह्याने हवेच्या उभ्या प्रवाहाचे वेग मोजला असून, पातळ एकत्रित ढगांमध्ये बर्फाची निर्मिती होताना मोजली आहे. हे संशोधन ‘नेचर रिसर्च’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

ढगाच्या विविध प्रकारच्या थरांमध्ये हवेचा उभा प्रवाह गेल्यास त्यामध्ये गारांची निर्मिती होते. अशा ढगांमध्ये हिमकण, पाण्याचे बाष्प आणि त्याचवेळी अतिशीत असे द्रवकण असतात. पृथ्वीवरील हवामान आणि जल साखळीतील या सर्वात महत्त्वाच्या या घटकांचा अभ्यास लेइब्निझ इन्स्टिट्यूट फॉर ट्रोपोस्फेअरीक रिसर्च (ट्रोपोज) येथे करण्यात येत आहे. या प्रक्रियेमध्ये कार्यान्वित असलेल्या हवेतील धुलिकण, हवेचे प्रवाह आणि सूक्ष्मभौतिकी प्रक्रिया यांचा समावेश असतो. या बाबींचे एकमेकांशी अत्यंत गुंतागुंतीचे संबंध आहेत.

ढगांच्या आजवर सर्वात दुर्लक्षित असलेल्या प्रकारावर विशेषतः २ ते ८ कि.मी. उंचीवरील मोठ्या क्षेत्रावर पसरलेल्या; पण १०० ते २०० मीटर इतक्या उभ्या जाडीच्या व हिमकणांचे प्रमाण अत्यंत कमी (काही मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर) असलेल्या ढगांवर या अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित केले. या ढगाच्या पातळ थरातून लेसर किरण, रडार आणि डॉपलर लिडार यांच्या साह्याने मोजमाप केले. हवेचा उभा प्रवाह, त्यातून होणारी चक्राकार स्थिती आणि बर्फकणांची निर्मिती यांचे एकमेकाशी असलेला संबंध मोजण्यात आला.
त्याविषयी माहिती देताना ट्रोपोज येथील डॉ. जोहान्स बुहल म्हणाले, की अधिक ताकदवान, पण पातळ ढगाला जेव्हा उभ्या हवेच्या प्रवाहाद्वारे हलवून टाकले जाते, त्यावेळी त्यातून अधिक हिमकणांची निर्मिती होते. हा संबंध ज्यावेळी ढग वजा १२ अंश सेल्सिअस इतके थंड असताना मोजण्यात आले होते. पुढील टप्प्यामध्ये हिमकणांचे स्फटिक तयार होणे ते त्याचे हिमवर्षावामध्ये रूपांतर होणे या टप्प्याचा अभ्यास करण्यात येणार आहे.


इतर ताज्या घडामोडी
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...
नांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...
हिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली  ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
पूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...
निर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...
लातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...
मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त...मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून...
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...