agriculture stories in marathi turmeric pest management | Agrowon

हळदीवरील पाने खाणारी, गुंडाळणारी अळी नियंत्रण

डॉ. मनोज माळी, डॉ. रवींद्र जाधव
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

सध्या हळद पिकाची शाकीय वाढ होण्याचा कालावधी आहे. या अवस्थेमध्ये हळदीला फुटवे येतात. या काळामध्ये हळद पिकावर पाने गुंडाळणाऱ्या व पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. या किडींचे वेळीच नियंत्रण करण्यासाठी योग्य उपाययोजना त्वरित करणे गरजेचे आहे. 

पाने गुंडाळणारी अळी 

सध्या हळद पिकाची शाकीय वाढ होण्याचा कालावधी आहे. या अवस्थेमध्ये हळदीला फुटवे येतात. या काळामध्ये हळद पिकावर पाने गुंडाळणाऱ्या व पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. या किडींचे वेळीच नियंत्रण करण्यासाठी योग्य उपाययोजना त्वरित करणे गरजेचे आहे. 

पाने गुंडाळणारी अळी 

 • या किडीचा प्रादुर्भाव सर्वसाधारणपणे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होऊन नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दिसून येतो.
 •   या किडीचा प्रौढ पतंग मध्यम आकाराचा असून, पंख काळसर तपकिरी रंगाचे असतात. पंखावर पांढऱ्या रंगाचा मोठा ठिपका असतो.
 •   पूर्ण वाढलेली अळी २.५ ते ३.७ सें.मी. 
 •     लांब व हिरव्या रंगाची (ऑलिव्ह ग्रीन) असते. या अळ्या पाने गुंडाळून त्यात लपतात. आत राहूनच पाने खातात. पूर्ण वाढ झालेली अळी पानाच्या गुंडाळीतच कोषावस्थेत जाते. कोष फिकट हिरव्या रंगाचा असतो.  
 •   हळद पिकामध्ये या किडीच्या अंडी, अळी आणि कोष अवस्था या अनुक्रमे ४-५, १३-२५ आणि ६-७ दिवस असतात.
 • नियंत्रण :    किडीचा प्रादुर्भाव दिसू लागल्यावर पानांवरील अळ्या व कोष या किडीच्या विविध अवस्था वेचून नष्ट कराव्यात. 
 •   अळीने गुंडाळलेली पाने खोडून गोळा करून अळीसह नष्ट करावीत.
 •   क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन गरजेनुसार फवारावे.
   

पाने खाणारी अळी

 • पावसाळा सुरू झाल्यानंतर हवेतील आर्द्रता वाढताच या किडीचा प्रादुर्भाव दिसू लागतो. पाने सुरळी किंवा पोंगाअवस्थेत असताना ही अळी पानावर उपजीविका करते. पान खाऊन सुरळीमध्ये छिद्र करते. सुरळीतील पान ज्या वेळी पूर्णपणे उलगडते (उघडते) त्या वेळी एका सरळ रेषेमध्ये पानावरती छिद्रे आढळून येतात.
 • नियंत्रण 
 •   गुंडाळलेली पाने, अळी व कोष वेचून नष्ट करावीत.
 •   डायमिथोएट  (३० टक्के प्रवाही) १ मिलि किंवा क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.

ः डॉ. मनोज माळी (प्रभारी अधिकारी), ९४०३७ ७३६१४   
ः डॉ. रवींद्र जाधव, ९७६४२३४६३४ 

(हळद संशोधन योजना, कृषी संशोधन केंद्र, 
कसबे डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली

टीप : हळद पिकावर विद्यापीठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत. केंद्रीय कीटकनाशक मंडळाद्वारे लेबल क्लेम शिफारशीत कीडनाशकाचा वापर करावा.

टॅग्स

इतर मसाला पिके
दालचिनीची वेळेवर काढणी महत्त्वाचीदालचिनी झाडाची साल ही मसाल्यात दालचिनी म्हणून...
जवसापासून जेल, कुरकुरीत पदार्थविविध आजारांवरील उपचारामध्ये जवस उपयुक्त असूनही...
हळद पिकातील व्यवस्थापनसध्या हळद लागवड होऊन सुमारे सात महिन्यांचा...
हळद पिकातील प्रमुख रोगांचे नियंत्रणस ध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
हळद पिकातील प्रमुख रोगांचे नियंत्रणसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
हळदीवरील पाने खाणारी, गुंडाळणारी अळी...सध्या हळद पिकाची शाकीय वाढ होण्याचा कालावधी आहे....
हळद पिकातील प्रमुख किडीचे नियंत्रणसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
सुधारित पद्धतीने हळद लागवडीचे नियोजनठिबक सिंचनासारख्या आधुनिक सिंचन सुविधा उपलब्ध...
हळदीचे अपेक्षित उत्पादनासाठी सुधारित...हळद लागवडीसाठी मध्यम प्रतीची, काळी, पाण्याचा...
हळद पिकांसाठी बेणे निवड महत्त्वाची   पूर्वमशागतीनंतर पाण्याच्या...
हळद लागवडीची पूर्वतयारीहळद लागवडीसाठी योग्य जमिनीची, बेण्याची निवड ही...
हळदीपासून मूल्यवर्धीत पदार्थांची...हळद ही अन्नपचन, पित्तशामक व रक्तशुद्धी करणारी आहे...
साठवण हळद बेण्याची ...जेठा गड्डा, बगल गड्डा, आणि हळकुंडे लागवडीसाठी...
मिरचीवरील किडींचा प्रादुर्भाव ओळखा,...मिरची पिकावर प्रादुर्भाव करणाऱ्या किडींमध्ये कळी-...
मिरची रोपवाटिकेतील पीक संरक्षणसध्या अनेक ठिकाणी रोपवाटिका ते फळे लागण्याच्या...
हळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...
हळद शिजविण्यासाठी वापरा बॉयलरकाढणीनंतर हळदीवर ४ ते ५ दिवसांमध्येच शिजविण्याची...
सुधारित पद्धतीने हळदीची काढणीहळद काढणी अगोदर १५ ते ३० दिवस पाणी देणे बंद करावे...
योग्य वेळी करा मिरीची काढणीमिरी घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी...
योग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...