हरितगृह वायू कोणते?

हरितगृह वायू कोणते?
हरितगृह वायू कोणते?

मागील लेखामध्ये हरितगृह परिणाम म्हणजे काय, ते आपण पाहिले. या लेखामध्ये हरितगृह वायू व त्याचे वातावरणावरील परिणाम यांचा आढावा घेऊ.  क्योटो प्रोटोकॉलप्रमाणे मुख्य सहा हरितगृह वायू पुढीलप्रमाणे. कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, हायड्रोफ्लुरोकार्बन, पेरफ्लुरोकार्बन आणि सल्फर हेक्साफ्लुरॉईड. त्यातील तीन वायूचे प्रमाणे हे मुख्यतः मानवी कार्यपद्धतीमुळे सातत्याने वाढत असून, ते अधिक उष्णता रोखत आहेत. त्याचा परिणाम नैसर्गिक हरितगृह परिणामांवर होत आहे. परिणामी, जागतिक तापमानामध्ये वाढ होत असल्याने जागतिक काळजीचे विषय बनले आहेत. मानवी कार्यपद्धती आणि हस्तक्षेप ः

  • औद्योगिकरणानंतर कोळशासह खनिज इंधनांच्या वाढत गेलेल्या वापरामुळे वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड (वातावरणातील आयुष्यकाळ १०० वर्षे) , कार्बन मोनॉक्साईड उत्सर्जित होतो.
  • शेतीतील पिकांचे अवशेष कुजणे व पशुपालनातील मलमूत्र यातून मिथेन (वातावरणातील आयुष्यकाळ १२ वर्षे) उत्सर्जित होतो.
  • वातानुकुलनासह शितगृहे व अन्य सुविधा यामुळे फ्लुरोकार्बनचे उत्सर्जन वाढते. त्यांचे वातावरणातील १०० ते ३२०० वर्षे इतके आहेत. म्हणजेच एकदा उत्सर्जित झालेला हा वायू तितका काळ वातावरणात राहतो.
  • विविध हरितगृह वायूंचे आयुष्यकाळ आणि औद्योगिकरणापूर्वी आणि २०११ मधील तीव्रता याविषयी अधिक माहिती तक्ता क्र. १ मध्ये दिलेली आहे.
  • विविध हरितगृह वायूंचे आयुष्यकाळ आणि तीव्रता

    हरितगृह वायू रासायनिक सूत्र वातावरणातील आयुष्यकाळ (वर्षे) उत्सर्जित होण्याचे स्रोत औद्योगिकरणा आधीची तीव्रता (ppb) २०११ मधील तीव्रता (ppb)
    कार्बन डायऑक्साईड CO2 100* खनिज इंधनाचे ज्वलन, जंगलांचा ऱ्हास, सिमेंट उत्पादन 278,000 390,000 (in 2011)
    मिथेन CH4 12 खनिज इंधनाची निर्मिती, कृषी, कचरा अवशेषांचे कुजणे 722 1,803 (in 2011)
    नायट्रस ऑक्साईड N2O 114 खतांचा वापर, खनिज इंधने आणि बायोमास ज्वलन, औद्योगिक प्रक्रिया 271 324 (in 2011)
    क्लोरोफ्लुरोकार्बन -12 (CFC-12) CCl2F2 100 रेफ्रिजरंट 0 0.527
    हायड्रोफ्लुरोकार्बन -23 (HFC-23) CHF3 270 रेफ्रिजरंट 0 0.024
    सल्फर हेक्साफ्लुरॉईड SF6 3,200 विद्यूत ऊर्जा वहन 0 0.0073
    नायट्रोजन ट्रायफ्लुरॉईड NF3 740 अर्धवाहकांची निर्मिती 0 0.00086
    टीप ः कार्बन डायऑक्साईडसारखे काही वायू हे नैसर्गिक प्रक्रियेबरोबरच मानवी प्रक्रियेमुळे तयार होतात. CO2 हा वायू सामान्यतः पीपीएम ( दहा लाखातील एक भाग) या प्रमाणात मोजला जातो. कारण तो अन्य वायूंच्या तुलनेमध्ये १००० पटीने अधिक हानिकारक आहे. वरील तक्क्यांमध्ये एकसमानतेसाठी CO2 चे प्रमाणही अन्य वायूप्रमाणे पीपीबी (अब्जातील एक भाग) तीव्रतेमध्ये मांडण्यात आले आहे. ( स्रोत ः IPCC, पाचवा अहवाल, 2014)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com