शिशुआहारातील शर्करेविषयी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता

शिशुआहारातील शर्करेविषयी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता
शिशुआहारातील शर्करेविषयी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता

माणसाच्या आरोग्याला हानिकारक खाद्यविषयक सवयी नेमक्या कोणत्या काळापासून सुरू होतात, याचा अभ्यास पोषकता व आहारशास्त्रातील संशोधक करत आहेत. नुकत्याच जर्नल ऑफ दी अॅकेडमी ऑफ न्युट्रीशन अॅण्ड डायटेटिक्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार शर्करायुक्त आहार खाण्यांमध्ये ६ ते ११ महिने वयाच्या नवजात बालकांचे प्रमाण ६१ टक्के, तर नुकतीच चालू लागलेल्या १२ ते २३ महिने वयांच्या मुलांमध्ये हे प्रमाणे ९८ टक्के इतके आहे. नवजात मुलांमध्ये मुख्यतः विविध स्वादयुक्त गोड दही आणि त्यापेक्षा मोठ्या मुलांसाठी फळांचे रसयुक्त पेये दैनंदिन आहारामध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे निष्कर्ष २००५-०६ आणि २०१५-१६ मध्ये केलेल्या अभ्यासातील आहेत. तुलनात्मक विश्लेषणानंतर शर्करायुक्त पेयांचे मुलांमधील हे प्रमाण काहीसे कमी होत असल्याचे दिसून येते. मात्र, इतक्या लहानपणापासून अनारोग्यकारक ठरणाऱ्या खाण्याच्या सवयी तयार होणे, हे धोकादायक ठरू शकते. अमेरिकेतील आरोग्य आणि पोषकता तपासणी सर्वेक्षण विभागातील संशोधिका क्रिस्टेन ए. हेर्रिक यांनी सांगितले, की आमच्या अभ्यासामध्ये नवजात बालक ते नुकतीच चालू लागण्याच्या स्थितीतील बालकांच्या आहारातील शर्करायुक्त पदार्थांचे प्रमाण व एकूण लक्षात आला. हे प्रमाण अनुक्रमे ६१ टक्के आणि ९८ टक्के इतके प्रचंड आहे. हेच आहाराचे पॅटर्न भविष्यामध्ये कायम राहण्याची शक्यता असते. क्रिस्टेन यांनी आधी केलेल्या एका अभ्यासानुसार, जर मुलांनी एक वर्षे वयापूर्वी दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेळा शर्करायुक्त पेयांचा आस्वाद घेतला असेल, तर ६ वर्षे वयानंतर प्रतिदिन एकदा तरी पेय पिण्याची सवय राहते. दोन वर्षांवरील मुलांच्या आहार शर्करायुक्त असेल, तर त्यांचे दात खराब होणे, अस्थमा, स्थौल्य, रक्तदाब या बरोबरच लिपीड रचनेमध्ये बदल अशा अनेक समस्या तयार होऊ शकतात. निष्कर्ष ः

  • अमेरिकेच्या आहारविषयक सूचनांमध्ये प्रौढ पुरुषांसाठी ९ चमचे किंवा त्यापेक्षा कमी, प्रौढ स्त्रिया आणि २ ते १९ वर्षांदरम्यानच्या मुलांसाठी ६ चमचे किंवा त्यापेक्षा कमी साखर आहारामध्ये घेण्याची शिफारस आहे. मात्र, ६ ते २३ महिन्यांपर्यंतच्या मुलांसाठी कोणतेही संशोधन झालेले नाही. या अभ्यासाआधी अमेरिकन ह्रदय संघटनेच्या वतीने दोन वर्षांखालील मुलांसाठी काही शिफारशी केलेल्या आहेत. क्रिस्टेन हेर्रिक यांनी सांगितले, की आमच्या या अभ्यासातून भविष्यातील सूचना किंवा शिफारशी करण्यापूर्वी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता स्पष्ट झाली आहे.
  • या अभ्यासामध्ये ६ ते २३ महिने या वयोगटातील १२११ मुलांच्या २०११ ते २०१६ या दरम्यान राष्ट्रीय आरोग्य आणि पोषकता अभ्यास सर्वेक्षणातून उपलब्ध माहितीचे विश्लेषण केले आहे.
  • ६ ते ११ महिने वयोगटातील मुलांच्या आहारामध्ये एक चमचा साखर असून, हे प्रमाण त्यांच्या एकूण दैनंदिन कॅलरी ऊर्जा घेण्याच्या २ टक्के आहे.
  • १२ ते २३ महिने वयोगटातील (म्हणजे नुकत्याच चालू लागलेल्या) मुलांच्या आहारामध्ये साखरेचे प्रमाण सुमारे ६ चमचे इतके आहे. हे प्रमाण त्यांच्या एकूण दैनंदिन कॅलरी ऊर्जा घेण्याच्या ८ टक्के इतके आहे.
  • मुलांच्या लिंग, कुटुंबाची आर्थिक स्थिती, कुटुंब प्रमुख या बाबतीतील वेगळेपणाचा कोणताही फरक वरील प्रमाणावर दिसलेला नाही. मात्र, वर्ण आणि खंडनिहाय वेगळ्या कुटुंबांमध्ये हे प्रमाण कमी आढळले. उदा. स्पॅनिश वगळता अन्य आशियाई मुलांमध्ये साखरेचे प्रमाण ३.७ चमचे इतके होते. तर स्पॅनिश वगळता काळ्या मुलांमध्ये हेच प्रमाणे सुमारे ८.२ चमच्याइतके अधिक आढळले.
  • ६ ते ११ महिन्यांच्या मुलांच्या आहारामध्ये साखरेचा अंतर्भाव होण्यामागे प्रामुख्याने योगर्ट, मुलांचे गोड पदार्थ, बेकरी पदार्थ कारणीभूत आहेत. तर १२ ते २३ महिन्यांच्या मुलांमध्ये फळांचे तयार रस, गोड बेकरी पदार्थ, साखरयुक्त कॅण्डी यांचा समावेश आहे.
  • पालकांनी घ्यावयाची काळजी डॉ. हेर्रिक यांच्या मते, लहान मुलांच्या आहारातील पदार्थांची निवड करताना पालकांची अधिक चोखंदळ राहिले पाहिजे. मातेच्या दुधाकडून अन्य आहाराकडे मुलांना नेत असताना पोषकता, चवीचे प्राधान्य आणि खाण्याच्या सवयी यांचा परिणाम होत असतो. या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावरील आहाराविषयी अधिक अभ्यास होण्याची आवश्यकता आहे. पोषकतेशिवाय केवळ कॅलरीज... सप्टेंबर २०१९ मध्ये अॅकेडमी ऑफ न्युट्रीशन अॅण्ड डायेटिक्स यांनी अमेरिकन हार्ट असोशिएशन, अमेरिकन ॲकेडमी ऑफ पेडियाट्रीक डेन्टिस्ट्री आणि अमेरिकन अॅकेडमी ऑफ पेडियास्टिक्स यांच्या सहकार्याने जाहीर केलेल्या शिफारशीनुसार, पाच वर्षांपर्यंतच्या मुलांच्या एकात्मिक पेय शिफारशींमध्ये मातेचे दूध, शिशुआहार, पाणी आणि नुसते दूध यांचा समावेश केला आहे. त्यांनी लहान मुलांच्या आहारामध्ये साखर घातलेल्या किंवा कमी कॅलरीयुक्त गोडवा आणणाऱ्या कोणत्याही पेयांविषयी काळजी घेण्याची सूचना दिली आहे. उदा. सुगंधी दूध, चॉकलेट, स्ट्रॉबेरी इ. कारण बाजारात उपलब्ध बहुतांश पेयांमध्ये कोणतेही पोषकता मूल्य नसून केवळ कॅलरीज असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com