Agriculture stories in Marathi, vegetable crop advisory , Agrowon, Maharashtra | Agrowon

भाजीपाला सल्ला
डॉ. एस. एम. घावडे
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

नोव्हेंबर महिन्यात विविध रब्बी हंगामांतील भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. या कालावधीत थंडीचे प्रमाण वाढते. त्यामुळे थंड हंगामात बीजांकुरण सहजपणे होऊ शकणाऱ्या आणि बाजारपेठेच्या दृष्टीने उपयुक्त पिकांची लागवड करावी.  

मूळवर्गीय भाजीपाला :

नोव्हेंबर महिन्यात विविध रब्बी हंगामांतील भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. या कालावधीत थंडीचे प्रमाण वाढते. त्यामुळे थंड हंगामात बीजांकुरण सहजपणे होऊ शकणाऱ्या आणि बाजारपेठेच्या दृष्टीने उपयुक्त पिकांची लागवड करावी.  

मूळवर्गीय भाजीपाला :

 • जापनीज व्हाइट, पुसा-चेतकी, पुसा-देशी या मुळा पिकाच्या वाणांची लागवडीसाठी निवड करावी. लागवड येत्या आठवडाभरात पूर्ण करावी. हेक्‍टरी ८-१० किलो बियाणे वापरावे. 
 • गाजराच्या पुसा केसर, पुसा मेघाली किंवा नान्टीज यापैकी एका जातीची निवड करावी. गाजराचे प्रतिहेक्‍टरी ५ किलो बियाणे वापरावे. 
 • सरी वरंब्यात ४५ x १० सें.मी. अंतरावर मुळा आणि गाजराच्या बियाण्याची पेरणी करावी. पेरणी वरंब्याच्या बगलेत करावी. पेरणीपूर्वी थायरम २.५ ग्रॅम प्रती किलो बियाणे अशी बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर ॲझोटोबॅक्‍टर २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे अशी जीवाणू खताची बीजप्रक्रिया करावी. 

पालेवर्गीय भाजीपाला :

 • पालक या पालेभाजी पिकाच्या ऑलग्रीन, जॉबनेर ग्रीन व पुसा हरित या जातींची लागवड करावी. मेथी या  पिकाच्या कस्तुरी, पुसा अर्ली बंचींग या जातींची लागवड करावी. 
 • लागवड सपाट वाफ्यावर २० ते ३० सें.मी. दोन ओळीतील अंतर ठेवून करावी. पालकाचे प्रतिहेक्‍टरी ३० ते ४० किलो तर मेथीचे २० ते ३० किलो बियाणे पुरेसे ठरते. 
 • पालक व मेथीची लागवड पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत करावी.
 • पालक आणि मेथीचे पीक ३५ ते ४० दिवसांत काढणीस तयार होते. साधारणपणे अशा प्रकारे २ ते ३ कापण्या करता येतात. त्यानंतर २०-२५ दिवसानंतर पुन्हा पुन्हा कापणी करता येते.

कोबीवर्गीय भाजीपाला :

 • कोबीवर्गीय भाजीपाल्यामध्ये लवकर येणाऱ्या हळव्या व उशिरा येणाऱ्या जातींचा समावेश होतो. फ्लॉवर पिकाच्या अर्ली कुवारी, पुसा दीपाली या लवकर येणाऱ्या; तसेच अघाणी, पुसा सिंथेटिक या हळव्या; तर स्नोबॉल १, स्नोबॉल १६ या उशिरा येणाऱ्या जातींपैकी एका जातीची निवड करावी. कोबीच्या गोल्डन एकर, प्राइड ऑफ इंडिया, पुसा ड्रम हेड, अर्ली ड्रम हेड या जातींची गरजेनुसार निवड करावी.
 • फ्लॉवरचे हेक्‍टरी ६०० ते ७५० ग्रॅम; तर कोबीचे ४०० ते ५०० ग्रॅम बियाणे वापरावे. गादीवाफ्यांवर रोपनिर्मिती करावी. लागवडीपूर्वी बियाण्यास कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे चोळून नंतर गादीवाफ्यावर त्यांची लागवड करावी. 
 • रोपवाटिकेत आवश्‍यक काळजी घेतल्यानंतर ३५ ते ४० दिवसांत रोपे लागवडीस तयार होतात. त्यानंतर रोपांची ४५ x ४५ किंवा ६० x ६० सें.मी. अंतरावर लागवड करावी. मुख्य क्षेत्रात लागवडीपूर्वी कोबीची रोपे डायमेथोएट ५ मि.लि. प्रति १० लिटर पाणी या द्रावणात बुडवून घ्यावीत. 

कंदवर्गीय भाजीपाला :

 • लसूण आणि कांद्यांच्या कंदांची ऑक्‍टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत अनुक्रमे १० x १० सें.मी. किंवा ६० x ३० सें.मी. या अंतरावर लागवड करावी. 
 • लागवडीपूर्वी लसणाच्या कळ्या व कांद्याचे कंद कार्बेन्डाझिम २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात १० मिनिटे पाण्यात बुडवून मग लागवड करावी. 
 • हेक्‍टरी कांद्याचे कंद २२ ते २५ क्विंटल; तर लसणाच्या ठसठशीत पाकळ्या ५ क्विंटल लागतात. लसणाच्या जी-४१, जी-३२३, श्‍वेता, गोदावरी, भिमातारा यापैकी एका जातीची निवड करावी.

डॉ. एस. एम. घावडे,९६५७७२५८४४
(मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

इतर पालेभाज्या
तंत्र अळू लागवडीचेअळू लागवड जून महिन्यात करावी. सरीमध्ये ९० सें.मी...
आरोग्यदायी रानभाजी चाईचा वेलशास्त्रीय नाव :- Dioscorea pentaphylla कुळ : -...
स्थानिक पालेभाज्यांचा आहारात वापर...आफ्रिकेमध्ये पोषकतेसह दुष्काळ सहनशीलतेसारखे अनेक...
भाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...
भाजीपाला सल्लाडिसेंबर महिन्यात थंडीचे प्रमाण वाढून दुसऱ्या...
कृषि सल्ला : पालेभाज्या, फळभाज्याडिसेंबर महिन्यात बहुतांश पालेभाजी पिकांची लागवड...
कृषि सल्ला : भाजीपाला, फळभाज्यामिरची : परभणी तेजस, पुसा ज्वाला, पंत सी-१...
भाजीपाला सल्लानोव्हेंबर महिन्यात विविध रब्बी हंगामांतील...