भाजीपाला थेट विक्रीतून युवा माउली गटाने केले अर्थार्जन
भाजीपाला थेट विक्रीतून युवा माउली गटाने केले अर्थार्जन

भाजीपाला थेट विक्रीतून युवा माउली गटाने केले अर्थार्जन

औरंगाबाद जिल्ह्यातील लाखेगाव (ता. पैठण) येथील युवा माउली शेतकरी गटाने आपल्या ८० सदस्यांच्या सेंद्रिय फळे आणि भाजीपाला उत्पादनाच्या थेट विक्रीचे नियोजन केले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील लाखेगाव (ता. पैठण) येथील युवा माउली शेतकरी गटाने आपल्या ८० सदस्यांच्या सेंद्रिय फळे आणि भाजीपाला उत्पादनाच्या थेट विक्रीचे नियोजन केले आहे. लॉकडाऊनच्या परिस्थितीत थेट विक्रीतून व अन्य वेळी शेतकरी आठवडी बाजारातून विक्री करत गटाने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून दिले आहे. उत्पादन घेण्याचे तंत्र अवगत झाल्यानंतर उत्पादित मालाच्या विक्रीसाठी थेट ग्राहक शोधत त्यांच्याशी दर्जेदार उत्पादनातून नाळ जोडण्याचे काम औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुका अंतर्गत येत असलेल्या लाखेगावच्या युवा माउली शेतकरी गटाने केले. शेतकरी आठवडे बाजारात निरंतर सहभाग अन् आता कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे थेट विक्रीतून सुमारे २० लाखाचे उत्पन्न मिळवल्याने त्यांचा उत्साह वाढला आहे. गटातील काही शेतकरी आता प्रक्रिया उद्योगाकडे वळत आहेत. गटाची पार्श्वभूमी ‘एकीशिवाय शेती अन् विकास नाही’ हे लक्षात आल्यानंतर २०१५ मध्ये निवृत्ती जनार्दन कागदे यांनी लाखेगाव येथील २० शेतकऱ्यांसह युवा माउली शेतकरी गटाची स्थापना केली. फळपिकांसह भाजीपाल्यांचे शेती करणारे व सेंद्रिय पद्धतीसाठी तयारी दर्शवणाऱ्या शेतकरी एकत्र आले. त्याची आत्मा अंतर्गत नोंदणी करण्यात आली. युवा माउली शेतकरी गटाच्या सदस्यांनी सुरुवातीला पणन विभागाच्या माध्यमातून सुरू झालेल्या आठवडे बाजारात विक्रीचे नियोजन केले. हा बाजार औरंगाबाद शहरात तीन ते चार ठिकाणी आठवड्याला भरतो. भाजीपाल्याचे ५० तर फळपिकांचे ३० शेतकरी स्थापनेवेळी वीस असलेली गटाची सदस्य संख्या भाजीपाला उत्पादक ५०, तर फळ उत्पादक ३० अशी ८० पर्यंत पोचली आहे. भाजीपाला व फळ पिकांचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतानाच अन्य शेतातील रासायनिक खतांचा वापरही पाच ते दहा टक्क्यांवर आणला आहे. बारमाही भाजीपाला उत्पादनासाठी खास नियोजन केले जाते. भाजीपाला पिके ः शेवगा, भेंडी, कारले, दोडके, गवार, चवळी, मेथी, कोथिंबीर, पालक, हादगा फुले, टोमॅटो, कांदा, वांगी, वालशेंग इ. फळ पिके ः मोसंबी, चिकू, पेरू, टरबूज, खरबूज, केशर व गावरान आंबे, द्राक्ष, चिंच इ. हादगा फुलांची विशेष मागणी हादगा फुलाला मागणी असल्याचे लक्षात येताच निवृत्ती कागदे यांनी अर्ध्या एकरात १००० हादगा झाडांची लागवड केली. या हादगा फुलाला साधारणतः शंभर रुपये प्रति किलोचा दर मिळतो. नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांत दरवर्षी हादगा फुलांची विक्रीतून किमान दोन लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याचे निवृत्ती कागदे सांगतात. हादगा फुले वाळवून त्यांची भुकटी करण्याचे नियोजन केले आहे. लॉकडाऊनमध्ये २० लाखांची विक्री गटातील भाजीपाला फळभाज्या उत्पादक शेतकऱ्यांकडून निश्‍चित दराने खरेदी केला जातो. प्रतवारी केल्यानंतर मालाची थेट ग्राहकांना विक्री केली जाते. शेतकऱ्यांकडून पालेभाजी प्रतिजुडी ५ रुपये तर फळभाजी प्रतिकॅरेट २०० रुपये निश्चित दराने घेतला जातो. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर युवा माउली गटाने सुमारे २० लाख रुपयांची फळे, भाजीपाला व धान्य यांची औरंगाबाद, पुणे, बारामती येथील ग्राहकांना थेट विक्री केली. शेतकऱ्यांना झाला फायदा लाखेगाव येथील असिफ पठाण यांच्याकडे भेंडी लागवड वीस गुंठ्यांत होती. त्याचप्रमाणे शेखर बोंबाळे यांच्याकडे एक एकर टरबूज लागवड होती. लॉकडाऊनच्या कालावधीत सर्वच भाज्या व फळांच्या विक्रीचा प्रश्न निर्माण झाला होता; पण युवा माउली शेतकरी गटाच्या माध्यमातून थेट ग्राहकांना विक्री शक्य झाल्याने चांगले अर्थार्जन झाले; अन्यथा हा माल वाया जाण्याचा धोका होता. गटाची वैशिष्ट्ये ः

  • शेतकरी आठवडे बाजारात कायम सहभाग.
  • प्रतवारी करूनच खरेदी आणि विक्री.
  • गटातील शेतकऱ्यांना दिला जातो निश्चित दर.
  • सेंद्रिय पद्धतीने फळे भाजीपाला उत्पादनावर भर.
  • दरवर्षी सरासरी दहा टन फळांची थेट विक्री.
  • लॉकडाऊनदरम्यान विकली जवळपास ९० टन फळे.
  • निवृत्ती कागदे, ९०९६४७४१९९ (प्रमुख, युवा माउली शेतकरी गट, लाखेगाव. ता. पैठण, जि. औरंगाबाद

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com