agriculture stories in marathi Vegetable marketing by Yuva Mauli farmers group | Page 2 ||| Agrowon

भाजीपाला थेट विक्रीतून युवा माउली गटाने केले अर्थार्जन

संतोष मुंढे
बुधवार, 1 जुलै 2020

औरंगाबाद जिल्ह्यातील लाखेगाव (ता. पैठण) येथील युवा माउली शेतकरी गटाने आपल्या ८० सदस्यांच्या सेंद्रिय फळे आणि भाजीपाला उत्पादनाच्या थेट विक्रीचे नियोजन केले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील लाखेगाव (ता. पैठण) येथील युवा माउली शेतकरी गटाने आपल्या ८० सदस्यांच्या सेंद्रिय फळे आणि भाजीपाला उत्पादनाच्या थेट विक्रीचे नियोजन केले आहे. लॉकडाऊनच्या परिस्थितीत थेट विक्रीतून व अन्य वेळी शेतकरी आठवडी बाजारातून विक्री करत गटाने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून दिले आहे.

उत्पादन घेण्याचे तंत्र अवगत झाल्यानंतर उत्पादित मालाच्या विक्रीसाठी थेट ग्राहक शोधत त्यांच्याशी दर्जेदार उत्पादनातून नाळ जोडण्याचे काम औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुका अंतर्गत येत असलेल्या लाखेगावच्या युवा माउली शेतकरी गटाने केले. शेतकरी आठवडे बाजारात निरंतर सहभाग अन् आता कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे थेट विक्रीतून सुमारे २० लाखाचे उत्पन्न मिळवल्याने त्यांचा उत्साह वाढला आहे. गटातील काही शेतकरी आता प्रक्रिया उद्योगाकडे वळत आहेत.

गटाची पार्श्वभूमी
‘एकीशिवाय शेती अन् विकास नाही’ हे लक्षात आल्यानंतर २०१५ मध्ये निवृत्ती जनार्दन कागदे यांनी लाखेगाव येथील २० शेतकऱ्यांसह युवा माउली शेतकरी गटाची स्थापना केली. फळपिकांसह भाजीपाल्यांचे शेती करणारे व सेंद्रिय पद्धतीसाठी तयारी दर्शवणाऱ्या शेतकरी एकत्र आले. त्याची आत्मा अंतर्गत नोंदणी करण्यात आली. युवा माउली शेतकरी गटाच्या सदस्यांनी सुरुवातीला पणन विभागाच्या माध्यमातून सुरू झालेल्या आठवडे बाजारात विक्रीचे नियोजन केले. हा बाजार औरंगाबाद शहरात तीन ते चार ठिकाणी आठवड्याला भरतो.

भाजीपाल्याचे ५० तर फळपिकांचे ३० शेतकरी
स्थापनेवेळी वीस असलेली गटाची सदस्य संख्या भाजीपाला उत्पादक ५०, तर फळ उत्पादक ३० अशी ८० पर्यंत पोचली आहे. भाजीपाला व फळ पिकांचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतानाच अन्य शेतातील रासायनिक खतांचा वापरही पाच ते दहा टक्क्यांवर आणला आहे. बारमाही भाजीपाला उत्पादनासाठी खास नियोजन केले जाते.
भाजीपाला पिके ः शेवगा, भेंडी, कारले, दोडके, गवार, चवळी, मेथी, कोथिंबीर, पालक, हादगा फुले, टोमॅटो, कांदा, वांगी, वालशेंग इ.
फळ पिके ः मोसंबी, चिकू, पेरू, टरबूज, खरबूज, केशर व गावरान आंबे, द्राक्ष, चिंच इ.

हादगा फुलांची विशेष मागणी
हादगा फुलाला मागणी असल्याचे लक्षात येताच निवृत्ती कागदे यांनी अर्ध्या एकरात १००० हादगा झाडांची लागवड केली. या हादगा फुलाला साधारणतः शंभर रुपये प्रति किलोचा दर मिळतो. नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांत दरवर्षी हादगा फुलांची विक्रीतून किमान दोन लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याचे निवृत्ती कागदे सांगतात. हादगा फुले वाळवून त्यांची भुकटी करण्याचे नियोजन केले आहे.

लॉकडाऊनमध्ये २० लाखांची विक्री
गटातील भाजीपाला फळभाज्या उत्पादक शेतकऱ्यांकडून निश्‍चित दराने खरेदी केला जातो. प्रतवारी केल्यानंतर मालाची थेट ग्राहकांना विक्री केली जाते. शेतकऱ्यांकडून पालेभाजी प्रतिजुडी ५ रुपये तर फळभाजी प्रतिकॅरेट २०० रुपये निश्चित दराने घेतला जातो.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर युवा माउली गटाने सुमारे २० लाख रुपयांची फळे, भाजीपाला व धान्य यांची औरंगाबाद, पुणे, बारामती येथील ग्राहकांना थेट विक्री केली.

शेतकऱ्यांना झाला फायदा
लाखेगाव येथील असिफ पठाण यांच्याकडे भेंडी लागवड वीस गुंठ्यांत होती. त्याचप्रमाणे शेखर बोंबाळे यांच्याकडे एक एकर टरबूज लागवड होती. लॉकडाऊनच्या कालावधीत सर्वच भाज्या व फळांच्या विक्रीचा प्रश्न निर्माण झाला होता; पण युवा माउली शेतकरी गटाच्या माध्यमातून थेट ग्राहकांना विक्री शक्य झाल्याने चांगले अर्थार्जन झाले; अन्यथा हा माल वाया जाण्याचा धोका होता.

गटाची वैशिष्ट्ये ः

  • शेतकरी आठवडे बाजारात कायम सहभाग.
  • प्रतवारी करूनच खरेदी आणि विक्री.
  • गटातील शेतकऱ्यांना दिला जातो निश्चित दर.
  • सेंद्रिय पद्धतीने फळे भाजीपाला उत्पादनावर भर.
  • दरवर्षी सरासरी दहा टन फळांची थेट विक्री.
  • लॉकडाऊनदरम्यान विकली जवळपास ९० टन फळे.

निवृत्ती कागदे, ९०९६४७४१९९
(प्रमुख, युवा माउली शेतकरी गट, लाखेगाव. ता. पैठण, जि. औरंगाबाद


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
आदर्श कामांच्या उभारणीतून ठसा उमटवलेले...द्राक्ष, डाळिंब,कांद्यासाठी जगभर प्रसिद्ध नाशिक...
कुडावळेमध्ये `शत प्रतिशत भात लागवड'...गाव आणि शेतीचा शाश्वत विकास करायचा असेल तर...
यांत्रिक पद्धतीने भात लागवड ठरतेय...चांदखेड (ता. मावळ जि. पुणे) परिसरातील वाढत्या...
युवा शेतकऱ्याची वीस एकर व्यावसायिक करार...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गडमठ (ता.वैभववाडी) येथील...
एकनाथ खडसेंच्या शेतीत सीडलेस जांभूळ,...राजकीय वर्तुळात चर्चेत असलेला चेहरा म्हणजे एकनाथ...
काजूगर निर्मितीचा स्वयंचलित अत्याधुनिक...रत्नागिरी जिल्ह्यात गव्हाणे येथे रत्नागिरी कृषी...
संयमवृत्तीनेच होते नफावृध्दी व...जनावरे मग ती दुभती असोत की नको असलेली, योग्य...
दूग्ध, रेशीम व्यवसायातून अर्थकारण केले...परभणी शहरानजीक शेती असलेल्या ढगे कुटुंबाने शेतीला...
शेतकरी नियोजन- कापूसमाझ्या शेतातील कपाशीचे पीक सध्या जवळपास ३५ ते ४२...
पीक नियोजनातून बसवले कुटुंबाचे आर्थिक...बाभूळसर (ता. शिरूर) येथील रामचंद्र नागवडे व...
महिला बचतगटाचा ‘जय भोलेनाथ’ ब्रॅण्डभेंडा बुद्रूक (ता. नेवासा,जि.नगर) येथील वीस...
हिरवे हिरवेगार गालिचे, हरित तृणांच्या...हिरवे हिरवेगार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे......
यांत्रिकी पद्धतीने मूरघास निर्मिती...सध्या दुग्धव्यवसायात मूरघास ही अत्यंत महत्त्वाची...
कृषीसंपन्नता, आरोग्य, पर्यावरण हेच...कोटमगावाने (ता. जि. नाशिक) कृषीसंपन्न, आरोग्य व...
द्राक्ष, पेरूतून प्रगतीकडे कृषी...कृषी पदविका घेतल्यानंतर त्याचा योग्य वापर करीत...
कोकणात प्रयत्नावादातून दिली...कोकणात दुग्धव्यवसाय म्हणावा तसा विकसित झालेला...
खरीप पिकांतील तण नियंत्रण व्यवस्थापनजगात सर्वांत जास्त वापर तणनाशकांचा (४३.६ टक्के)...
अतीव संघर्ष, धैर्यातून साधली उल्लेखनीय...उस्मानाबाद जिल्ह्यातील अणदूर येथील वैशाली घुगे...
चिकाटी, आर्थिक नियोजनातून पोल्ट्री...वांजोळी (जि. नगर) येथील ३८ वर्षे वयाच्या अमोल...
जलसंधारण,शिक्षण अन् कृषी विकासाचा रचला...सुदृढ, आत्मनिर्भर समाज घडविणे या उद्देशातून जळका...