agriculture stories in marathi WATER LOGGED GRAPE VINEYARD PROBLEMS & REMEADIES | Page 2 ||| Agrowon

पाणी साचलेल्या द्राक्षबागांसाठी उपाययोजना 

डॉ. आर. जी. सोमकुंवर 
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

द्राक्ष लागवडीखाली असलेल्या क्षेत्रात गेल्या आठवड्यामध्ये दरवर्षीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. यामुळे खोलगट भागामध्ये असलेल्या बागांमध्ये पाणी जमा झाले. सांगलीसारख्या पूरस्थितीमध्ये द्राक्षबागा पूर्णपणे पाण्यात होत्या. काही बागेत कॅनोपीच्या वरपर्यंत, तर काही बागेत ओलांड्यापर्यंत सुमारे ४ ते ५ दिवस पाणी साचलेले होते. आता पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी काही ठिकाणी बागेत अद्याप पाणी साठून आहे. काही ठिकाणी वरचे पाणी ओसरले असले तरी मुळांच्या कक्षेमध्ये पाणी भरलेले आहे. या साऱ्या परिस्थितीचा वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालीवर पुढील प्रकारे परिणाम होऊ शकतात. 

द्राक्ष लागवडीखाली असलेल्या क्षेत्रात गेल्या आठवड्यामध्ये दरवर्षीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. यामुळे खोलगट भागामध्ये असलेल्या बागांमध्ये पाणी जमा झाले. सांगलीसारख्या पूरस्थितीमध्ये द्राक्षबागा पूर्णपणे पाण्यात होत्या. काही बागेत कॅनोपीच्या वरपर्यंत, तर काही बागेत ओलांड्यापर्यंत सुमारे ४ ते ५ दिवस पाणी साचलेले होते. आता पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी काही ठिकाणी बागेत अद्याप पाणी साठून आहे. काही ठिकाणी वरचे पाणी ओसरले असले तरी मुळांच्या कक्षेमध्ये पाणी भरलेले आहे. या साऱ्या परिस्थितीचा वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालीवर पुढील प्रकारे परिणाम होऊ शकतात. 

१) पानांचे कार्य करणे बंद होणे  
जी बाग पाण्यामध्ये जास्त काळ बुडली होती, अशा बागेमध्ये पाणी कमी झाल्यानंतर पानांवर माती व गाळाचा थर जमा झाल्याची स्थिती आहे. अशा बागांमध्ये पर्णरंध्रे बंद झाल्यामुळे श्वसन करण्यास असमर्थ ठरू शकतात. त्याचा फटका वेलींना बसू शकतो. 

उपाययोजना 
बागेमध्ये ट्रॅक्टर फिरवण्यायोग्य स्थिती असल्यास केवळ पाण्याची फवारणी त्वरीत करून घ्यावी. पानांवरील गाळाचा थर धुवून काढण्याकरिता आवश्यकतेनुसार २ ते ३ फवारण्या कराव्या लागतील. या पाण्याच्या फवारणीमुळे पर्णरंध्रे मोकळी होऊन पानांचे कार्य सुरू होईल. 

२) पानगळ होणे 
बागेत जास्त काळ पाणी साचून राहिल्यामुळे मुळांनी कार्य करणे बंद केले असेल अशा बागेतून पाणी बाहेर निघाल्यानंतर हळूहळू पानगळ होताना दिसून येईल. वेलीची पाने पाण्यामध्ये अधिक काळ राहिल्यामुळे कार्य रोखले जाऊन, पानांची देठाशी असलेली मजबूत पकड कमी झाली. अशा परिस्थितीत मुळांकडून फुटींच्या शेंड्याकडे होत असलेला अन्नद्रव्यांचा पुरवठा कमी होतो किंवा पूर्णपणे बंद झालेल्या परिस्थितीमध्ये पाने अकार्यक्षम होतात आणि पानगळ सुरू होते. 
अशा वेळी बागेमध्ये कोणतीही उपाययोजना साथ देत नाही. मात्र, बागेतील परिस्थिती पाहून काही उपाययोजना केल्यास तीव्रतेचे प्रमाण कमी होऊ शकेल. 

उपाययोजना  

  • साचलेले पाणी निघून गेल्यानंतर वेलीवर, ओलांडा व खोडांवर साचलेला गाळ, माती यांचा थर साध्या पाण्याच्या फवारणीद्वारे धुवून घ्यावेत. 
  • वेलीस नत्राची फवारणी व जमिनीतून उपलब्धता करावी. त्यामुळे शेंड्यावर नवीन फुटी निघतील. या फुटी ४-५ पाने होईपर्यंत वाढू द्याव्यात. म्हणजे या परिस्थितीत काडीवरील पानगळ काही अंशी थांबवता येईल. 
  • बागेत शेंड्याकडे १-२ डोळे मागे ठेवून फूट कापून घ्यावी. जमिनीतून नत्राचा पुरवठा सुरू झाल्यास नवीन फूट निघण्यास मदत होईल. 
  • ज्या बागेत अजूनही मुळाच्या कक्षेत पाणी आहे. बागेत ट्रॅक्टरद्वारे कार्य करणे शक्य नाही. अशा स्थितीमध्ये पानगळ थांबवणे अवघड आहे किंवा शक्य नाही. जेव्हा बागेमध्ये काम करण्यायोग्य स्थिती तयार होईल, त्यावेळी फळछाटणी सुरू करावी. यावेळी पानगळ झालेली असल्यामुळे डोळे फुगलेले असतील. 
  • मुळीच्या कक्षेत थोडेफार कोरडे वातावरण होत असताना मुळांचे कार्य सुलभ व्हावे याकरिता ह्यूमिक ॲसिड २ ते ३ किलो प्रति एकर या प्रमाणे द्यावे. 

३) खुंटरोपे

ही खुंटरोपेसुद्धा पाण्यात होती, अशा बागेत खुंटकाडीचीही पानगळ झालेली असेल. अशा बागेत सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कलम करण्याचे टाळावे. कारण या परिस्थितीत काडीमध्ये रस नसेल, कलम यशस्वी होण्याची शक्यता कमी असेल, तेव्हा बागेतील परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर कलम करता येईल. 

डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२०-२६९५६०६० 
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)


फोटो गॅलरी

इतर कृषी सल्ला
काडी परिपक्वतेच्या अवस्थेतील रोग...द्राक्ष बागेत सध्याच्या परिस्थिती जुलै...
तपासा बियाण्याची सजलीकरण शक्तीप्रत्येक जातीच्या बियाणाची उगवण शक्ती वेगवेगळी...
कृषी सल्‍ला ( ज्वारी, सोयाबीन, संत्रा/...पेरणीयोग्‍य पाऊस झालेला असल्‍यास जमिनीत पुरेसा...
कृषी सल्ला (आडसाली ऊस, तूर, कापूस,...पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळात मित्र कीटकांची...
पिकांतील आंतरमशागतीचे महत्त्वखरीप पिकाच्या जोमदार वाढीसाठी तसेच अपेक्षित...
कीड नियंत्रणासाठी ट्रायकोकार्डचा वापरएकात्मिक कीडनियंत्रणामध्ये मित्र कीटकांचे महत्त्व...
राज्यात हलक्‍या ते मध्यम पावसाची शक्‍यतामहाराष्ट्रावर १००४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
कपाशीवरील तुडतुड्याचे नियंत्रणतुडतुडे ही बी टी कपाशीवरील सर्वात महत्त्वाची रस...
एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी कामगंध...विशिष्ठ गंधाकडे आकर्षित होण्याच्या किटकांच्या...
कॅनोपी व्यवस्थापनातून रोगनियंत्रणसध्याच्या वातावरणाचा विचार करता प्रत्येक ठिकाणी...
पीक संरक्षणासाठी चिकट सापळ्यांचे प्रमाण...कीटकांच्या डोळ्यांच्या रचनेचा विचार करून योग्य...
भात शेतीमध्ये निळे-हिरवे शेवाळाचा वापरहवेतील मुक्त नत्र स्थिर करणाऱ्या निळ्या-हिरव्या...
फवारणीसाठी रसायनांचे मिश्रण करताना...शेतकरी अनेक वेळा दोन कीटकनाशके, बुरशीनाशके किंवा...
सेंद्रीय द्रवरूप जैविक खत तयार करण्याची...पिकांच्या वाढीसाठी जमिनीमध्ये सूक्ष्मजिवाणू...
कोकण, कोल्हापूर पट्ट्यात मुसळधार...कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर...
भात रोपवाटिकेत खोडकिडीचा प्रादुर्भावऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये खरिपातील भात पीक...
केळीवरील करपा रोगाचे नियंत्रणसध्या केळी पिकाच्या पील बागेत करपा रोगाचा...
सापळा पिकांची लागवड महत्त्वाचीएकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी सापळा पिकांची लागवड...
सोयाबीनवरील खोडमाशीचे व्यवस्थापनयवतमाळ जिल्ह्यामधील काही तालुक्यांमध्ये सोयबीन...
टप्प्याटप्प्याने करतो डाळिंब बहराचे...शेतकरी नियोजन पीक ः डाळिंब शेतकरी ः ज्ञानेश्वर...