agriculture stories in Marathi watermelon harvesting | Agrowon

कलिंगड, खरबूज काढणी

डॉ. ओमप्रकाश हिरे
रविवार, 3 जानेवारी 2021

 संकरित वाण असलेल्या कलिंगडाचे उन्हाळ्यामध्ये एकरी सरासरी २० ते ४० टनाच्या दरम्यान उत्पादन घेता येते. हिवाळ्यामध्ये सरासरी १५ ते २५ टनाच्या दरम्यान उत्पादन येते.  

कलिंगड काढणीस तयार झाल्याची लक्षणे 
फळांवर बोटाने चापट मारल्यास धातूवर मारल्यासारखा आवाज येतो. अपरिपक्व फळात असा आवाज येत नाही. तसेच फळाला हाताने दाबल्यास कर्रकर्र असा आवाज येतो.

खरबूज काढणीस तयार झाल्याची लक्षणे
फळ पिकण्याची सुरुवात फुलोऱ्याच्या टोकाकडून होते. तसेच फळांच्या सालीचा रंग बदलतो. फळावर असणारी बारीक कूस निघून फळ जाळीदार व टणक बनते. फळांचा सामान्यपणे विशिष्ट सुवास येतो. 
साधारणतः उन्हाळ्यामध्ये लागवड केल्यास फळ ६० ते ६५ दिवसात तयार होते. हिवाळ्यामध्ये लागवड केल्यास फळ ७० ते ७५ दिवसात तयार होते.

उत्पादन 
 संकरित वाण असलेल्या कलिंगडाचे उन्हाळ्यामध्ये एकरी सरासरी २० ते ४० टनाच्या दरम्यान उत्पादन घेता येते. हिवाळ्यामध्ये सरासरी १५ ते २५ टनाच्या दरम्यान उत्पादन येते.  खरबूज या पिकाचे एकरी सरासरी उत्पादन १० ते १५ टनाच्या दरम्यान उत्पादन घेता येते. उत्पादन जात, वातावरण, जमीन व शेतकऱ्याच्या व्यवस्थापनानुसार कमी-जास्त होते.

महत्त्वाचे मुद्दे 

  •  पीक दोन पाने अवस्थेपासून ते ५० टक्के फुलोऱ्यांपर्यंत गरजेपेक्षा जास्त पाणी देऊ नये.
  •  पिकास फवारणी सकाळी किंवा सायंकाळी करावी.
  •  मधमाशांच्या शेताकडे आकर्षित व्हाव्यात, यासाठी चारी बाजूने झेंडूची लागवड करावी. तसेच थंडीच्या दिवसात लागवड असल्यास गूळ-ताकाची फवारणी घेणे, मधमाशीच्या पेट्या ठेवणे यातून परागीभवनास मदत होते.
  •  भुईमुगाशेजारी कलिंगडाची लागवड करू नये.
  •  कलिंगड व इतर वेलवर्गीय पिकांवर सल्फरयुक्त बुरशीनाशकांची फवारणी करू नये.
  •  पीक फुलोरा अवस्थेत रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करू नये.
  •  एकाच जमिनीमध्ये पुन्हा पुन्हा तेच पीक घेणे टाळावे. पिकाची फेरपालट करावी. 

डॉ. ओमप्रकाश हिरे,  ७५८८०१५४९१, 
(लेखक खासगी कंपनीत मृदा शास्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत) महाराष्ट्र


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...
शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...
अतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...
गोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...
सातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...
भारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...
मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...
सोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...
कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...