तापमानात वाढ, थंडीचे प्रमाण कमी होणार...

हवामान बदलाच्या या दशकात जानेवारी महिन्याचा पहिला आणि दुसरा आठवडा गेल्या ५ ते १० वर्षांत अतिथंड असल्याचे दिसून आले होते. मात्र त्यात या वर्षी वेगळा बदल होत असल्याचे दिसून येते.
तापमानात वाढ, थंडीचे प्रमाण कमी होणार...
तापमानात वाढ, थंडीचे प्रमाण कमी होणार...

महाराष्ट्राच्या उत्तरेस १०१२, तर दक्षिणेस १०१० हेप्टापास्कल इतका या आठवड्याच्या सुरुवातीच्या काळात हवेचा दाब राहणार आहे. या आठवड्याच्या अखेरीस संपूर्ण महाराष्ट्रावरील हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल इतका कमी होईल. हवेचे दाब हे स्पष्ट संकेत देतात, की कमाल तापमान १ ते २ अंश सेल्सिअसने आणि किमान तापमान २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढणे शक्‍य असून, त्याचा थेट परिणाम थंडीचे प्रमाण कमी होण्यात होणार आहे. सौम्य थंडी राहणे, त्यामुळे या आठवड्याच्या अखेरीस शक्‍य आहे. त्याचा थेट परिणाम गव्हाच्या पिकाच्या वाढीवर होईल. कमी दिवसांत अधिक उष्मांक मिळाल्यास गव्हाचे पीक लवकर तयार होते. त्यामुळे वाढ चांगली होत नाही. ओंबी लवकर बाहेर पडते आणि ओंबीचा आकार लहान राहतो. ऊस पिकाच्या साखर उताऱ्यावरही परिणाम होणे शक्‍य असून, उसाचा उतारा कमी येतो आणि ऊस पिकास लवकर तुरा येतो. ज्वारी पिकावर परिणाम होणे शक्‍य असून, ज्वारीचा उतारा कमी मिळतो. हवामान बदलाच्या या दशकात जानेवारी महिन्याचा पहिला आणि दुसरा आठवडा गेल्या ५ ते १० वर्षांत अतिथंड असल्याचे दिसून आले होते. मात्र त्यात या वर्षी वेगळा बदल होत असल्याचे दिसून येते. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने आग्नेयेकडून राहण्यामुळे या वर्षी थंडीवर परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले आहे. १) कोकण ः रायगड व ठाणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ३३ ते ३४ अंश सेल्सिअस राहील. रायगड जिल्ह्यात किमान तापमान १८ अंश सेल्सिअस, रत्नागिरी जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५९ ते ६१ टक्के राहील. ठाणे व रायगड जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५९ ते ६१ टक्के, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ५९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ठाणे व रायगड जिल्ह्यात ३४ ते ३५ टक्के, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत २३ ते २९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ९ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. २) उत्तर महाराष्ट्र ः नाशिक, धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमानात वाढ होऊन ते ३२ अंश सेल्सिअस, नाशिक व धुळे जिल्ह्यांत किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. नंदूरबार, जळगाव जिल्ह्यांत किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ५७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २९ ते ३२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ४ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. ३) मराठवाडा ः औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी व जालना जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहण्यामुळे कमाल तापमानात वाढ होत आहे. किमान तापमानातही वाढ होणे शक्‍य आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात किमान तापमान १४ अंश सेल्सिअस, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यांत किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील. जालना जिल्ह्यात ते १७ अंश सेल्सिअसपर्यंत वाढणे शक्‍य आहे. आकाश अंशतः ढगाळ राहील. त्याचाही परिणाम थंडीवर होईल. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ६० टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २६ ते ३३ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान थंड व कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते १२ कि.मी., तर वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. पश्‍चिम विदर्भ ः बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस, अकोला व वाशीम जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. अकोला जिल्ह्यात किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील, तर बुलडाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ते १७ अंश सेल्सिअसपर्यंत वाढणे शक्‍य आहे. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४७ ते ५३ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २८ ते ३३ टक्के राहील. ५) मध्य विदर्भ ः यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढणे शक्‍य आहे. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ५४ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २७ ते २९ टक्के राहील. ६) पूर्व विदर्भ ः भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. गोंदिया व भंडारा जिल्ह्यांत किमान तापमान १४ ते १५ अंश सेल्सिअस, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४८ टक्के राहील, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ५६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते ३० टक्के इतकी कमी राहील. ७) दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र ः सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस, सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत किमान तापमान १८ ते १९ अंश सेल्सिअस, पुणे व सातारा जिल्ह्यांत १६ ते १७ अंश सेल्सिअस आणि नगर व सोलापूर जिल्ह्यांत १५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५१ ते ६१ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता पुणे व नगर जिल्ह्यांत ३० ते ३१ टक्के, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत २३ टक्के, तर कोल्हापूर, सांगली १८ ते १९ टक्के राहील. कृषी सल्ला ः १) कापूस वेचणीचे काम वारा शांत असताना सकाळी करावे. २) गव्हास वाढीच्या अवस्थेनुसार पाणी द्यावे. ३) फळबागामधून बाष्पीभवनाचा वेग वाढेल. त्यासाठी झाडांच्या बुंध्यालगत गव्हाचा भुस्सा, गवत टाकून आच्छादन करावे व गरजेनुसार पाणी द्यावे. ४) उन्हाळी भुईमुगाच्या पेरणीसाठी जमीन तयार करावी. ५) काकडी, भेंडी, दोडका, दुधी भोपळा लागवडीसाठी जमीन तयार करावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com