agriculture stories in Marathi, Wildfires disrupt important pollination processes by moths and increase extinction risks | Agrowon

वणव्यामुळे पतंग, वनस्पतींच्या प्रजाती नष्ट होण्याचा धोका 

वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

जंगलामध्ये लागणाऱ्या वणव्याचे परागीकरण करणाऱ्या पतंगावरील परिणामांचा अभ्यास इंग्लंड येथील न्युकॅसल विद्यापीठ, यॉर्क विद्यापीठ यांच्यासह पोर्तुगाल येथील संशोधकांनी केला आहे. त्यात वणव्यासाठी वनस्पती आणि कीटकांचे समुदाय अधिक संवेदनशील असून, त्यांच्या अनेक जाती स्थानिक पातळीवर नष्ट होण्याचा धोका व्यक्त केला आहे. हे संशोधन ‘जर्नल फंक्शनल इकॉलॉजी’ प्रकाशित करण्यात आले आहे. 

जंगलामध्ये लागणाऱ्या वणव्याचे परागीकरण करणाऱ्या पतंगावरील परिणामांचा अभ्यास इंग्लंड येथील न्युकॅसल विद्यापीठ, यॉर्क विद्यापीठ यांच्यासह पोर्तुगाल येथील संशोधकांनी केला आहे. त्यात वणव्यासाठी वनस्पती आणि कीटकांचे समुदाय अधिक संवेदनशील असून, त्यांच्या अनेक जाती स्थानिक पातळीवर नष्ट होण्याचा धोका व्यक्त केला आहे. हे संशोधन ‘जर्नल फंक्शनल इकॉलॉजी’ प्रकाशित करण्यात आले आहे. 

पूर्वी झालेल्या अभ्यासामध्ये वणव्यामुळे अधिक प्रमाणात पराग तयार करणाऱ्या जंगली वनस्पती नष्ट होतात, त्याचा फायदा दिवसा परागीकरणात कार्यरत असणाऱ्या मधमाशी आणि फुलपाखरांना होत असल्याचे आढळले होते. मात्र, नव्याने झालेल्या या अभ्यासामध्ये रात्रीच्या वेळी कार्यरत असलेल्या पतंगाच्या काही प्रजाती या वणव्यानंतर दिसत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रजाती महत्त्वाच्या असून, परागीकरणामधील त्यांच्या भूमिकेकडे साधारणपणे दुर्लक्ष केले जाते. 
संशोधकांच्या गटाला पोर्तुगालमध्ये सापडलेल्या पतंगापैकी ७० टक्के पतंग हे पराग वाहत असल्याचे दिसून आले. मात्र, वसंतामध्ये हेच प्रमाण ९५ टक्क्यांपर्यंत होते. प्रक्षेत्रातील एकूण ८० टक्के फुलोऱ्यातील वनस्पतींचे परागीकरण पतंगाकडून होत असल्याचे आढळले आहे. मात्र, जळालेल्या प्रक्षेत्रामध्ये पतंगाकडून होणाऱ्या पराग वहनाचे हेच प्रमाण पाच पटीने कमी होते. 
ज्या ठिकाणी सातत्याने वणवे लागत असलेल्या भागामध्ये रात्रीच्या वेळी होणारे परीकरणावर परिणाम होतो. यातून वनस्पतीच्या महत्त्वाच्या प्रजाती नष्ट होऊ शकतात. 
या अभ्यासामध्ये न्यूकॅसल विद्यापीठ, यॉर्क विद्यापीठ, ए रोचा पोर्तुगाल आणि युनिव्हर्सिदाद डी एव्होरा येथील संशोधकांनी भाग घेतला होता. वणव्यामुळे जळालेल्या ठिकाणी पतंगाचे समुदाय लक्षणीयरीत्या बदलल्याचे आढळले. याचाच अर्थ त्यांच्या यजमान वनस्पती जळून गेल्यामुळे पतंगाच्या पैदाशीमध्ये अडचणी येतात. 

संशोधकांचे मत... 
यॉर्क विद्यापीठातील डॉ. कॅल्लम मॅकग्रेगर यांनी सांगितले, की वणव्यानंतर वाढलेल्या पराग आणि फुलोऱ्याच्या स्थितीमध्ये दिवसा कार्यरत असलेल्या मधमाश्यांसारख्या परागवाहकांच्या संख्येत चांगले परिणाम दिसून येतात. मात्र, रात्री परागीकरणाऱ्या कीटकांच्या संख्येवरील परिणाम अद्याप अज्ञात होते. जळालेल्या आणि जवळच्या न जळालेल्या प्रक्षेत्रांचा तुलनात्मक अभ्यास केला असता आम्हाला वणव्यानंतर फुलांच्या प्रजाती व संख्येमध्ये वाढ झाल्याचे आढळले. हे प्रामुख्याने हिवाळा आणि वसंतामध्ये दिसून येते. मात्र, वणव्यानंतर पतंगाच्या प्रजाती आणि संख्येमध्ये सर्व हंगामामध्ये घट झाल्याचे दिसून आले. 
पोर्तुगाल येथील संशोधिका पॉला बान्झा यांनी सांगितले, की पतंग आणि वनस्पतीमधील समन्वयाचे विश्लेषण करण्यात येत आहे. वणव्यामुळे जळालेल्या ठिकाणी वनस्पती आणि कीटकांच्या प्रजाती त्यांच्यावर होणाऱ्या परिणामांचा प्रतिकार करण्यामध्ये अक्षम ठरत असल्याचे आढळले आहे. 


इतर बातम्या
नगर जिल्ह्याच्या विकासासाठी ९७१ कोटींची...नगर ः जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडे ९७१...
खानदेशातील ‘रब्बी’ला ढगाळ वातावरणाचे...जळगाव : खानदेशात यंदा हुडहुडी भरविणारी थंडी दोन-...
उद्योगमंत्र्यांनी जाणली रेशीम...औरंगाबाद : जिल्ह्यात रेशीम कोषाचे उत्पादन,...
फुलकिड्यांच्या प्रादुर्भावामुळे काजू...सिंधुदुर्ग : ढेकण्या, शेंडेमर, फांदीमर रोगांमुळे...
दहा वर्षांत सातारा जिल्ह्यातील १३८०...सातारा  ः जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी...
मुळा, भंडारदरा धरणांतून आजपासून आवर्तननगर  ः यंदा पाऊस चांगला झाल्याने...
पुणे कृषी महाविद्यालयातील ...पुणे  ः विद्यार्थी वसतिगृहाचे प्रवेशद्वार...
भीमा खोऱ्यातील धरणांमध्ये ८५ टक्के पाणीपुणे  : जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात यंदा दमदार...
हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यांत...हिंगोली : पाऊस लांबल्यामुळे हिंगोली, नांदेड,...
‘पोकरा’अंतर्गत तांत्रिक सहकार्यासाठी...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या...
शिरवाडे वणीत जलसंधारणासाठी...नाशिक : कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान आणि...
अनियमित थंडी ऊस रिकव्हरीच्या मुळावरकोल्हापूरः जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही ऊस...
कुरखेडा तालुक्यात सेवा सोसायट्यांचा धान...गडचिरोली  ः कमिशन व हमालीची रक्‍कम मिळत...
देशात केवळ ३५ तेलबिया हबनिर्मितीनवी दिल्ली: देशातील तेलबिया उत्पादन वाढावे आणि...
नवव्या जागतिक कृषी महोत्सवास उद्यापासून...नाशिक : श्रीस्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी...
राज्यात गारठा कमी, उकाडा वाढलापुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह...
संवादासाठी तंत्रज्ञान महोत्सव फायदेशीर...सोलापूर : ‘‘शेतीतील नवे ज्ञान, तंत्रज्ञान, बदल...
धान खरेदी केंद्रासाठी शेतकऱ्यांचा...भंडारा  ः गेल्या दोन महिन्यांपासून बंद...
काँग्रेसचा दर बुधवारी मुंबईत ‘लोकदरबार’ मुंबई  : विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या...
अलिबागचा पांढरा कांदा ‘जीआय’च्या वाटेवरपुणे : औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध असलेल्या...