agriculture stories in marathi Women Farmer from Gorakhpur harvests highest yield from latest Wheat Variety - Karan Vandana (DBW १८७)  | Agrowon

ईशान्येकडील राज्यांसाठी नवी गहू जात ‘करण वंदना’

वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

ईशान्येकडील पठारी प्रदेशासाठी सिंचित क्षेत्र आणि वेळेवर पेरणीसाठी करण वंदना (डीबीडब्ल्यू १८७) ही जात प्रसारित करण्यात आली आहे. प्रामुख्याने पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, आसाम आणि पश्‍चिम बंगाल या राज्यांसाठी ही जात उपयुक्त ठरणार आहे. 

ईशान्येकडील पठारी प्रदेशासाठी सिंचित क्षेत्र आणि वेळेवर पेरणीसाठी करण वंदना (डीबीडब्ल्यू १८७) ही जात प्रसारित करण्यात आली आहे. प्रामुख्याने पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, आसाम आणि पश्‍चिम बंगाल या राज्यांसाठी ही जात उपयुक्त ठरणार आहे. 

नव्याने प्रसारित केलेल्या गहू जातीचा प्रसार करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या करनाल येथील भारतीय गहू आणि बार्ली संशोधन संस्थेने गोरखपूर (उत्तर प्रदेश) येथील महायोगी गोरखनाथ कृषी विज्ञान केंद्राच्या सहकाऱ्याने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या वेळी उपस्थित असलेल्या १०० शेतकऱ्यांमध्ये कोकीला अर्जून देवी या महिला शेतकरीही होत्या. त्यांनाही सर्व शेतकऱ्यांसोबत करण वंदना या नव्या जातींचे २.५ किलो बियाणे मिळाले होते. हे बियाणे त्यांनी आपल्या गावी म्हणजेच राखूखोर (ता. जंगलकौडिया, जि. गोरखपूर) येथे नोव्हेंबर २०१८ च्या तिसऱ्या आठवड्यामध्ये लावले. श्रीमती कोकिला यांनी शिफारशीप्रमाणे १५०ः६०ः४० किलो नत्र, स्फुरद आणि पालाश अशा खतांचा डोस दिला. त्याच प्रमाणे दोन वेळा सिंचन केले. पीक कालावधीमद्ये माणसांकरवी दोन वेळा तण काढून घेतले. योग्य प्रकारे नियोजन केल्यामुळे १० एप्रिल २०१९ रोजी केलेल्या काढणीमध्ये केवळ २६६ वर्गमीटर क्षेत्रामध्ये २२० किलो गहू उत्पादन मिळाले. हे प्रमाण ८२.५२ क्विंटल प्रति हेक्टर इतके होते. 

अन्य शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ ः 

प्रशिक्षणामध्ये मिळालेल्या २.५ किलो बियाणांची लागवड केलेल्या अन्य काही शेतकऱ्यांनाही ८० ते २२० किलोपर्यंत चांगले गहू उत्पादन मिळाले आहे. कोकिला देवींसह अन्य शेतकऱ्यांनाही कमी क्षेत्रामध्ये चांगले उत्पादन मिळाल्यामुळे अन्य शेतकऱ्यांमध्येही या नव्या जातीविषयी उत्सुकता वाढली आहे. 

गहू जातीची वैशिष्ट्ये ः 

  • सध्याच्या या प्रदेशातील प्रमुख गहू जाती एचडी २९६७, के -३०७, एचडी २७३३, के १००६ आणि डीबीडब्ल्यू ३९ या आहेत. या प्रचलित जातीपेक्षा नव्याने प्रसारित केलेल्या जातींचे उत्पादन लक्षणीयरीत्या अधिक आहे. 
  • ही जात तांबेरा आणि करपा या दोन प्रमुख रोगासाठी प्रतिकारक आहे. 
  • ही जात ७७ दिवसांमध्ये फुलोऱ्यामध्ये येते आणि पेरणीनंतर सुमारे १२० दिवसांमध्ये पक्वता गाठते. 
  • गहू रोपांची सरासरी उंची १०० सेंमी असून, या जातीची हेक्टरी उत्पादनक्षमता ६४.७० क्विंटल इतकी आहे. 
  • या गव्हापासून तयार केलेल्या चपात्यांचा दर्जा उत्तम असून, त्याला १० पैकी ७.७ गुण देता येतात. 
  • दाण्यामध्ये लोहाचे प्रमाण अधिक (४३.१ पीपीएम) आहे. 

इतर बातम्या
अकोल्यात कोरोना बाधितांची संख्या...अकोला ः जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे...
दापोली कृषी विद्यापीठातर्फे बांधावर...रत्नागिरी ः दापोली कृषी विद्यापीठाच्या विस्तार...
मालेगाव बाजार समितीची मुख्यमंत्री...वाशीम ः कोरोनाविरुद्ध उपाययोजना करण्यास मदत...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३७ हजार क्विंटल...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात २०१९-२० या वर्षात ३६ हजार...
अकोल्यात अकरा कोटींच्या निविष्ठा...अकोला ः आगामी हंगामासाठी शेतकऱ्यांना बांधावर...
भंडारा जिल्ह्यात ५० हजारांवर मजुरांना...भंडारा ः लॉकडाऊन काळात आर्थिक आधार म्हणून...
खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात जळगाव : खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात आले आहेत...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बॅंकांची...जळगाव ः खरीप हंगाम तोंडावर आल्याने...
यंत्रमागाद्वारे रोजगाराचा प्रश्न सुटेल...मालेगाव, जि. नाशिक : ‘‘प्रतिबंधित...
खानदेशातील टंचाईग्रस्त भागात बऱ्यापैकी...जळगाव : खानदेशात टंचाईच्या झळा बसणाऱ्या धुळ्यातील...
अटीशर्तीविना मका खरेदी करा खासदार डॉ....नाशिक : केंद्र सरकारच्या आधारभूत किंमत खरेदी...
परभणीत सोयाबीन बियाण्यांचे नापासाच्या...परभणी  ः सोयाबीनमध्ये बियाणे नापासाचे प्रमाण...
जालन्यात १२ हजारावर शेतकऱ्यांनी तपासली...जालना : कृषी विभागातर्फे जिल्ह्यात एकाच दिवशी...
शेतकऱ्यांनो कृषी निविष्ठांची पावती...नांदेड : शेतकऱ्यांनी येत्या खरीप हंगामासाठी खते,...
नगर जिल्ह्यात ९३ टॅंकरव्दारे पाणीपुरवठानगर  ः नगर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता...
नगरमध्ये उद्योग सुरू; पण मजुरांची वानवानगर  ः लॉकडाउन शिथिल करताना केंद्र व राज्य...
नांदेड जिल्ह्यात ७० हजार क्विंटलवर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतंर्गंत...
हिंगोली जिल्ह्यात मोठ्या खरेदीदारांकडून...हिंगोली : जिल्ह्यातील बाजार समित्यांतील हळदीच्या...
नगर, पारनेर, नेवासेत कांदा लिलाव बंदचनगर  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन...
अंबडमध्ये कापूस खरेदीसाठी दोन...अंबड, जि. जालना : येथील मे सुरज ॲग्रोटेकच्या...