agriculture stories in marathi, Worm pheromones protect major crops  | Agrowon

मातीतील सूक्ष्मकृमींच्या गंधाद्वारे करता येईल पिकांचे संरक्षण 

वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

कोणत्याही विषारी कीटकनाशकाशिवाय पिकांचे संरक्षण करण्याचे उद्दिष्ट दीर्घकाळापासून शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामध्ये मातीमध्ये आढळणाऱ्या सूक्ष्म गोलकृमीद्वारे तयार होणारी संयुगे त्यासाठी फायदेशीर ठरू शकतील, असा दावा न्यूयॉर्क (अमेरिका) येथील बॉयसे थॉम्पसन इन्स्टिट्यूट येथील संशोधकांनी केला आहे. या संशोधनामुळे पिकाची वाढ शाश्वत पद्धतीने करणे शक्य होणार आहे. हे संशोधन जर्नल ऑफ फायटोपॅथॉलॉजीच्या मे २०१९ च्या अंकामध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. 

कोणत्याही विषारी कीटकनाशकाशिवाय पिकांचे संरक्षण करण्याचे उद्दिष्ट दीर्घकाळापासून शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामध्ये मातीमध्ये आढळणाऱ्या सूक्ष्म गोलकृमीद्वारे तयार होणारी संयुगे त्यासाठी फायदेशीर ठरू शकतील, असा दावा न्यूयॉर्क (अमेरिका) येथील बॉयसे थॉम्पसन इन्स्टिट्यूट येथील संशोधकांनी केला आहे. या संशोधनामुळे पिकाची वाढ शाश्वत पद्धतीने करणे शक्य होणार आहे. हे संशोधन जर्नल ऑफ फायटोपॅथॉलॉजीच्या मे २०१९ च्या अंकामध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. 

मातीमध्ये असलेल्या सूक्ष्म कृमीच्या पिकांवरील परिणामांचा अभ्यास वरिष्ठ संशोधक सहयोगी मुरली मनोहर यांच्या नेतृत्वाखालील गटाने केला होता. या गटामध्ये प्रो. डेनियल क्लेसिग आणि फ्रॅंक स्क्रोईडर यांचा समावेश होता. एएससीआर-१८ (Ascr#१८) या नावाने ओळखले जाणारे सूक्ष्म कृमी हे अॅस्कॅरोसाईड कुळातील असून, एकमेकांच्या समन्वयासाठी, संपर्कासाठी एक विशिष्ट गंध सोडतात. संशोधकांनी जेव्हा या कृमीद्वारे सोयाबीन, भात, गहू आणि मका या पिकांवर या एएससीआर -१८ ची प्रक्रिया केली. त्यानंतर मुद्दामहून या पिकांवर विषाणू, जिवाणू, बुरशी किंवा ओकमायसेट यांचा प्रादुर्भाव केला. काही दिवसांनंतर तपासणी केली असता एएससीआर -१८ ची प्रक्रिया केलेल्या रोपे ही प्रक्रिया न केलेल्या रोपांच्या तुलनेमध्ये रोगांना अधिक प्रतिकारक असल्याचे दिसून आले. 
या संशोधनाविषयी माहिती देताना फ्रॅंक स्क्रोईडर यांनी सांगितले, की वनस्पतीची मुळे मातीमध्ये सातत्याने विविध गोलकृमींच्या संपर्कात येत असतात. त्यातून वनस्पतीच्या किडीविषयी संवेदना जागृत होतात. या संवेदना जागृत झाल्यानंतर त्यांच्या प्रतिकारशक्ती तयार होते. त्याचा फायदा विविध रोगापासून बचावासाठी होतो. या प्रक्रियेमध्ये कोणत्याही किडीला किंवा रोगकारक घटकाला मारले जात नाही. परिणामी या नैसर्गिक घटकांद्वारे पिकांचे चांगल्या प्रकारे संरक्षण होऊ शकते. 

असे आहेत फायदे ः 

  • क्लेसिग यांनी सांगितले, की मातीतील सूक्ष्मकृमीद्वारे सोडली जाणारी अॅस्कॅरोसाईड ही नैसर्गिक संयुगे वनस्पती, प्राणी, मानव आणि पर्यावरणासाठी सध्या तरी सुरक्षित दिसत आहेत. 
  • भात हे जागतिक पातळीवरील सर्वात महत्त्वाचे पीक असून, सुमारे अर्ध्या लोकसंख्येचे अन्न आहे. भातातील झांथोमोनास ओरायझे पी.व्ही. ओरायझे या जिवाणूजन्य रोगामुळे आशियन देशामध्ये १० ते ५० टक्के नुकसान होत असते. या रोगापासून एएससीआर -१८ हे संरक्षण पुरवत असल्याचे दिसून आले. 
  • गहू हे दुसरे महत्त्वाचे पीक असून, त्यावरील झॅमोसेप्टोरिया ट्रिटिकी या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्याविरुद्ध एएससीआर -१८ फायदेशीर ठरते. 
  • मका हे अमेरिकेसह आफ्रिका खंडातील अन्न, जैवइंधन आणि पशुखाद्यासाठी महत्त्वाचे पीक आहे. या पिकावर कोचलिबोलस हेटेकोस्ट्रोफस या बुरशीमुळे दक्षिणी लिफ ब्लाईट हा रोग होतो. त्याविरुद्ध एएससीआर -१८ फायदेशीर ठरते. 
  • सोयाबीन पिकातील मर रोगासाठी कारणीभूत फायटोप्थोरा सोजीई या ओमायसेट्स आणि स्युडोमोनास सिरिंजेई पीव्ही ग्लासिना या बुरशी व सोयाबीन मोझाईक व्हायरस यांच्या प्रादुर्भावापासून एएससीआर -१८ संरक्षण पुरवते. 
  • अॅस्कॅरोसाईडच्या अत्यंत कमी तीव्रतेच्या संयुगांमुळे पिकामध्ये विविध रोगांपासून पुरेसे संरक्षण मिळते. हे प्रमाणही वनस्पतीनुसार ठरते, रोगकारक घटकाप्रमाणे नाही. 
  • संशोधकांचा गट सध्या या अॅस्कॅरोसाईडच्या पिकामध्ये प्रतिकारकता विकसित करण्याच्या नेमक्या मूलद्रव्यीय यंत्रणेची माहिती मिळविण्यासाठी काम करत आहेत. हे संशोधन एका नव्या स्टार्टअप कंपनीद्वारे व्यावसायिक करण्यात येणार आहे. 

इतर ताज्या घडामोडी
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...
अकोला जिल्हा परिषदेचा ७६ कोटींचा निधी...अकोला  ः ‘कोरोना’मुळे निर्माण झालेल्या...
हिंगोली जिल्ह्यात ५९ कोटींचे पीककर्ज...हिंगोली   ः हिंगोली जिल्ह्यातील विविध...
कापूस, सोयाबीन उत्पादक विमा...गडचिरोली: धान उत्पादक ३४ हजार शेतकऱ्यांना सुमारे...
नांदेडमध्ये ४७ कोटी ४७ लाखांचे पीक कर्ज...नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बॅंकांनी...
जालन्यात पाच हजार टन खते एकाच दिवशी...जालना  : जिल्ह्यात एकाच दिवशी पाच हजार...
कर्जमुक्‍ती योजनेची प्रक्रिया ३०...भंडारा ः शासनाने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव...
जयपूरमध्ये वीज पडून लाखो रुपयांच्या...नाशिक : पूर्वमोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर बागलाण...
बुलडाणा जिल्ह्यात १५ तारखेपर्यंत...बुलडाणा  : यंदा जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पाऊस...
भाजीपाल्याची थेट खरेदी विक्री व्यवस्था...पुणे ः कोरोना टाळेबंदीमध्ये शहरातील विविध भागात...
सातारा जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीसातारा ः जिल्ह्यात सोमवारी सर्वदूर पावसाने हजेरी...
कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांचा रास्तारोकोयवतमाळ ः महागाव तालुक्‍यातील गुंज येथील...
पुणे जिल्ह्यात पीककर्ज वितरणात...पुणे ः लाॅकडाऊनच्या काळात होरपळून निघालेल्या...