agriculture stories in Marathismart cameras for agriculture | Agrowon

पीक व्यवस्थापनात स्मार्ट कॅमेऱ्याचा वापर

अपूर्वा देशमुख, डॉ. गोपाळ शिंदे
बुधवार, 30 डिसेंबर 2020

कृषी यंत्रणेमध्ये स्मार्ट कॅमेरा प्रणालीचा विकास आणि उपयोगाबाबत संशोधनाचा वेग वाढला आहे. यंत्रमानव, ड्रोनच्या मदतीने स्मार्ट कॅमेराचा वापर होऊ लागला आहे. काटेकोर शेती नियोजनात हे तंत्रज्ञान फायदेशीर आहे.

कृषी यंत्रणेमध्ये स्मार्ट कॅमेरा प्रणालीचा विकास आणि उपयोगाबाबत संशोधनाचा वेग वाढला आहे. यंत्रमानव, ड्रोनच्या मदतीने स्मार्ट कॅमेराचा वापर होऊ लागला आहे. काटेकोर शेती नियोजनात हे तंत्रज्ञान फायदेशीर आहे.

सध्या शेतीमध्ये ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्र, नांगरणी, मळणी, ऊस कापणी, बीबीएफ, सरी पाडणे, रोटाव्हेटर यासारख्या यंत्रांचा वापर वाढला आहे. याचबरोबरीने आता स्मार्ट कॅमेरा असलेल्या स्वयंचलित यंत्रणांचा वापर शेतीमध्ये वाढला आहे. कृषी यंत्रणेमध्ये स्मार्ट कॅमेरा प्रणालीचा विकास आणि उपयोगाबाबत संशोधनाचा वेग वाढला आहे. यंत्रमानव, ड्रोनच्या मदतीने स्मार्ट कॅमेराचा वापर होऊ लागला आहे.
१) स्मार्ट कॅमेरा ही इंटे‍लिजंट व्हिजन सिस्टीम आहे. या पद्धतीमध्ये प्रतिमेच्या बरोबरीने उपयुक्त माहिती संकलित करता येते. काही गोष्टींचे नियंत्रणदेखील करता येते.
२) स्मार्ट कॅमेरासाठी एम्बेडेड स्मार्ट कॅमेरा प्रणाली, प्रगत अल्गोरिदम, कृ‍त्रिम बुद्धिमत्ता, कृत्रिम तांत्रिक नेटवर्क, सखोल अभ्यासासोबत यंत्रमानव, ड्रोनच्या सह्याने अचूक शेती व्यवस्थापन करता येते.
३) कॅमेऱ्यामधून मिळणाऱ्या प्रतिमा ऑरडिनो किंवा रासबेरीपाय कंट्रोलर आणि सॉफ्टवेअरच्या साह्याने प्रक्रिया करून पिकाचे सखोल विश्‍लेषण करता येते.

शेती व्यवस्थापनात वापरले जाणारे स्मार्ट कॅमेरे ः
१) रीअल सेन्स कॅमेरा :

 •  कॅमेऱ्यामध्ये आयएमयू यंत्रणा आहे. ज्याद्वारे हे कॅमेरे ड्रोनसोबत जोडल्यानंतर यामध्ये कोनीय हालचाल आणि रेखीय हालचालींचा प्रवेग मोजता येतो.
 • उपयोग ः
 • अडथळा टाळणे.३ डी मध्ये पिकाची वाढ पाहणे.
 •  पीक, माती यांच्या खोलीचा अभ्यास. पीक निरीक्षण

वैशिष्ट्ये :
१) स्टेरिओ रिझोल्यूशन ः १२८० × ७२०
२) आरजीबी (लाल, हिरवा, निळा) रिझोल्यूशन ः १९२० × १०८०
३) प्रतिमा मिळविण्याची गती ः ३० ते १०० एफपीएस
४) रेंज ः ०.२ मी. ते १० मी. पर्यंत निरीक्षण शक्य.

२) लिडार कॅमेरा :
 कॅमेऱ्यामध्ये एमईएमएस तंत्रज्ञान वापरले जाते. यामुळे चालू हालचालींमध्ये स्पष्ट प्रतिमा मिळविता येते.
उपयोग ः

 •  पीक आरोग्य नियंत्रण / निरीक्षण.
 •  पीक, मातीचा सखोल अभ्यास.
 •  नकाशे तयार करण्यासाठी. यामध्ये भूगर्भीयशास्त्र, भूगोलशास्त्र, वनीकरण, वातावरणीय भौतिकशास्त्र यांच्यासाठी केला जातो.
 •  रोबोट हालचालींचा मागोवा घेण्यासाठी उपयुक्त.

वैशिष्ट्ये :
१) खोलीचे दृश्य (Fov) ः ७० × ५५
२) खोलीचे रिझोल्यूशन ः ९०२४ × ७६८
३) प्रतिमा मिळविण्याची गती ः ३० ते ५० एफपीएस
४) किमान खोली अंतर ः ०.२५ मी. ते १५.५ मी.

स्टेरिओ व्हिजन कॅमेरा ः
उपयोग ः

 •  रोपांच्या वाढीचे परीक्षण, विश्‍लेषण.
 •  रोपवाटिका व हरितगृहामध्ये वापर.
 •  पिकावरील कीडनियंत्रण, कापणी नियंत्रणासाठी यूएव्ही किंवा ड्रोनमध्ये वापर.
 •  फळांचे अचूक निरीक्षण.

वैशिष्ट्ये :
१) रिझोल्यूशन ः ६४० × ४८०
२) पिक्सेल आकार ः ४८ मायक्रो मी. × ४८ मायक्रो मी
३) प्रतिमा मिळविण्याची गती ः ३७६
४) सेंन्सर ः पायथॉन ३००, चॉर्ज कपल्ड सेन्सर

झेड कॅमेरा ः

 •  ड्रोन किंवा यंत्रमानवाशी जोडणी करून पूर्ण शेतीचे निरीक्षण शक्य.
 • उपयोग :
 •  कॅमेऱ्याच्या मदतीने रोपांची वाढ, किडीचे निरीक्षण शक्य.
 •  जमीन किंवा रोपांची खोली मोजण्यासाठी.

वैशिष्ट्ये :
१) पिक्सेल आकार ः २ मायक्रो मी. × २ मायक्रो मी.
२) प्रतिमा मिळविण्याची गती ः १५ ते १०० एफपीएस
३) सेंन्सर ः ॲक्सिलरोमीटर, ग्यारोस्कोप (रेखीव व कोनीय) हालचाल मोजण्यासाठी, बॅरोमीटर (दाब मोजण्यासाठी ३०० ते ११०० हेक्टोपास्कल) तापमान सेंन्सर (-४० ते ७५ अंश सेल्सिअस), मॅग्नेटो मीटर (कॅमेऱ्याच्या परिपूर्ण ओरियन्टेशनचा अंदाज)
४) रिझोल्यूशन ः १२८० × ७२०

हायपरस्पेक्ट्रल किंवा मल्टीस्पेक्ट्रल कॅमेरा
 कॅमेऱ्यामध्ये आरजीबी (लाल, हिरवा, निळा) या व्यतिरिक्त इतर रंगाचे ब्रॅण्ड मिळतात (रेड एज, नियर इन्फ्रारेड)
उपयोग ः

 1.  वनस्पतीचे निरीक्षणाचा पूर्ण तपशील मिळवण्यासाठी.
 2.  भूप्रदेशाशी संबंधित पृथ्वीचे तपशीलवार नकाशे मिळविणे.
 3.  जमिनीतील घटक द्रव्ये पाहण्यासाठी.
 4.  स्पेस आधारित प्रतिमा मिळविणे
 5.  ड्रोनवर हे कॅमेरे बसवून कीटकनाशकांची काटेकोर फवारणी शक्य.
 6.  कॅमेऱ्यांच्या साह्याने रात्रीसुद्धा शेतावर देखरेख शक्य.
 7.  हवामान अंदाजासाठी उपयुक्त.

वैशिष्ट्ये :
१) तरंग लांबी ः ४०० ते १००० नॅनो मीटर आणि त्याहून अधिक.
२) वजन ः १५० ग्रॅम
३) कॅमेरा टेक्नॉलॉजी ः सीमॉस सेन्सर
४) प्रतिमा मिळविण्याची गती ः ३५० एफपीएस
५) तापमान ः ० ते ५५ अंश सेल्सिअस
६) रिझोल्यूशन ः १२८० × ७२० व त्याच्यापेक्षाही अधिक

संपर्क ः अपूर्वा देशमुख, ८८८८५२७५१५
(राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)


इतर टेक्नोवन
शून्य मशागतीसह पेरणी यंत्राचा वापरतागाच्या लागवडीसाठी शून्य मशागत तंत्रासह आधुनिक...
शेती व्यवस्थापनामध्ये ड्रोन...पिकाची वाढ,दुष्काळ, रोग, किडींचा प्रादुर्भाव,...
हुमणी भुंगेऱ्यांच्या नियंत्रणासाठी गंध...भारतीय कृषी संशोधन  संस्थेच्या बंगळूर येथील...
तुषार सिंचनाने वाढवले कडधान्य पिकांचे...हमिरपूर येथील कृषी विज्ञान केंद्राने शेतकरी...
मळणी यंत्राची क्षमता, गुणवत्ता...काढणीनंतर पिकांची मळणी केली जाते. मळणीसाठी...
आधुनिक यंत्राद्वारे खूर साळणी झाली सोपीदुधाळ जनावरांमध्ये खूरसाळणीला मोठे महत्त्व आहे....
कोबीवर्गीय पिकांतील कीडनियंत्रणासाठी...बंगळूर येथील भारतीय फळबाग संशोधन संस्थेने...
जमिनीतील बाष्प मोजण्याच्या पद्धतीया पूर्वीच्या लेखांमध्ये वातावरणातील पाण्याचे...
मत्स्य बीजोत्पादनातून पर्यायी...कोवालम गाव (जि. चेंगलपट्टू) येथील गटाने खारवट...
निचरा प्रणाली सुधारण्यासाठी सबसॉयलर,...फळबागांमध्ये कमी अधिक प्रमाणात यांत्रिकीकरणामुळे...
व्हर्जिन कोकोनट ऑइल’ तंत्रज्ञान...गोवा राज्यात भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत ‘...
मजुरी, वेळेत बचत करणारी अवजारेकृषी यांत्रिकीकरणामुळे मजूर टंचाईवर मात करणे शक्य...
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने शेती करता येईल...पारंपरिक पद्धतीची शेती करताना शेतकरी मेटाकुटीला...
अवघ्या सात हजारांत बनवली स्वयंचलित ठिबक...सोलापूर ः वीजपंपाच्या स्टार्टरला स्वतःच्या...
दोन एकर ‘व्हर्टिकल फार्म’ मध्ये ७२०...सॅनफ्रान्सिस्को येथील प्लेन्टी या कंपनीने...
पाण्यातील प्रतिमाही घेता येतील सहजतेनेस्टॅनफोर्ड येथील अभियंत्यांनी पाण्याबाहेरून...
डाळिंबाचे नवीन अधिक पोषक वाण ः सोलापूर... भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या राष्ट्रीय डाळिंब...
पीक व्यवस्थापनात स्मार्ट कॅमेऱ्याचा वापरकृषी यंत्रणेमध्ये स्मार्ट कॅमेरा प्रणालीचा विकास...
बहुउद्देशीय टोकण यंत्राने वाचवले...नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील सौरभ कदम व...
शेतीमाल वाळविण्यासाठी सोलर टनेल ड्रायर...भाजीपाला, फळांचे काप वाळविण्यासाठी सौर ऊर्जेचा...