बिटपासून अारोग्यदायी जेली

बिटपासून अारोग्यदायी जेली
बिटपासून अारोग्यदायी जेली

बीट हे जमिनीखाली वाढणारे एक कंदमूळ आहे. थंड तापमानात वाढलेल्या बिटामध्ये उच्च प्रमाणात साखर व उच्च दर्जाचा रंग आढळतो. बीट हे लाल रंगाचे असल्यामुळे त्याचा वापर बीट साबण, वाइन, रंग व औषधी लोणचे करण्यासाठी करतात. बीट जेली हा पारदर्शक व अर्धघट्ट पदार्थ आहे. घरच्याघरी बिटापासून जेली बनवून लघुउद्योग स्थापन करता येतो.

साहित्य ः बीटरस १८० मिलिग्रॅम (१०० ग्रॅम बिटापासून १८० मिली बीटरस मिळेल), पेक्‍टीन १.४ ग्रॅम, लिंबू रस ४ ग्रॅम, साखर ११४ ग्रॅम

  • बीट धुऊन साले काढावीत व बारीक किसून घ्यावे.
  • बिटाच्या प्रमाणाच्या दीडपट पाणी मिसळून १५-२० मिनिटे उकळून गाळून घ्यावे.
  • बिटच्या रसात दिलेल्या प्रमाणात साखर, लिंबू रस व पेक्‍टीन मिसळावे.
  • ढवळून जेलीचे मिश्रण व्यवस्थित शिजवावे. मिश्रणाचा टीएसएस ६५ ब्रिक्‍सपर्यंत आणावा
  • या मिश्रणाला जेलीच्या साच्यात ओतून १०-१५ मिनिटे भरलेले साचे स्थिर ठेवावेत.
  • साच्यातून जेली काढून पॅक करून साठवून ठेवावी.
  • बिटचे फायदे

  • रक्तदाब, हृदयविकार व वजन नियंत्रित ठेवते.
  • रक्तातील लाल पेशी नियंत्रित राहतात.
  • मेंदू तरबेज व ताणतणाव कमी करते.
  • रक्तातील लाल पेशींवर नियंत्रण करते. रक्तप्रवाह सुरळीत चालतो.
  • कर्करोग, त्वचा रोग व केसांच्या विकारावर फायदेशीर
  • --------- संपर्क ः सोनल चौधरी, ८८०६७६६७८३ (के. के. वाघ अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com