या आठवड्यात ढगाळ, थंड, कोरडे हवामान राहील

आठवड्याचे हवामान
आठवड्याचे हवामान

महाराष्ट्राच्या मध्य भागावर पूर्व व पश्‍चिम दिशेने १०१६ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील, त्यामुळे महाराष्ट्रातील उत्तर भागात थंडीचे प्राबल्य अधिक तर दक्षिण भागात तुलनेने कमी राहील. मात्र, थंडीचे प्राबल्य या आठवड्याच्या मध्यापर्यंत कायम राहील व त्यानंतर हळूवारपणे किमान व कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात होईल. दुपारी हवामान अत्यंत कोरडे राहील. मात्र, उत्तरेकडील काही भागांत सकाळी दव आणि याच भागात अतिथंड हवामान राहील. त्याचा पिकांवर विपरीत परिणाम होईल. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी पिकांची, जनावरांची, कोंबड्यांची विशेष काळजी घ्यावी.

आठवड्याच्या मध्यानंतर नागपूर व गोंदिया भागांत अल्पशा पावसाची शक्‍यता आहे. या आठवड्यात वाऱ्याच्या दिशेत बदल होऊन वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून व नैऋत्येकडून राहण्यामुळे थंडीचे प्राबल्य व किमान तापमानात हळुवारपणे वाढ होणे सुरूच राहील. मात्र, नागपूर व गोंदिया वगळता महाराष्ट्रात बहुतांशी भागात पावसाची शक्‍यता नाही. हवामान स्थितीत विशेष काळजी घ्यावी लागेल. द्राक्ष, ऊस पिकाचा साखर उतारा वाढेल.

कोकण, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील तापमानात वाढ होईल व ते ३३ अंश सेल्सिअस राहील. रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांत ते ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील तर ठाणे जिल्ह्यात ते २९ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी जिल्ह्यात किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील, रायगड जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस आणि ठाणे जिल्ह्यात ते १५ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील.

उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान २५ अंश सेल्सिअस राहील तर धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. नंदूरबार जिल्ह्यात किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील. धुळे व जळगाव जिल्ह्यांत किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहील, तर नाशिक जिल्ह्यात ते १२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. मराठवाडा लातूर व नांदेड जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. बीड जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. जालना व औरंगाबाद येथे तापमान १६ अंश सेल्सिअस राहील, तर बीड व परभणी जिल्ह्यांत किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील. लातूर, नांदेड व जालना जिल्ह्यांत किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील. औरंगाबाद जिल्ह्यात किमान तापमान १३ अंश सेल्सिअस तर उस्मानाबाद जिल्ह्यात ११ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. पश्‍चिम विदर्भ बुलडाणा जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ते ३० अंश सेल्सिअस राहील. बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत किमान तापमान १६ अंश सेल्सिअस तर वाशीम व अमरावती जिल्ह्यांत किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. मध्यविदर्भ यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान २८ ते ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान १४ ते १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७३ ते ८२ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ५८ टक्के राहील. पूर्व विदर्भ चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ते २९ अंश सेल्सिअस राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत किमान तापमान १४ ते १५ अंश सेल्सिअस राहील तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ते १६ ते १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. दक्षिण - पश्‍चिम महाराष्ट्र सोलापूर व पुणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. तसेच, सातारा व नगर जिल्ह्यांत ते ३१ अंश सेल्सिअस राहील. सांगली जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील व कोल्हापूर जिल्ह्यात ते २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नगर जिल्ह्यात १३ अंश सेल्सिअस राहील. सातारा जिल्ह्यात ते १५ अंश सेल्सिअस, सांगली व पुणे जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस, कोल्हापूर जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.   कृषी सल्ला ः

  • ज्याठिकाणी तापमान अति थंड म्हणजे ८ अंश सेल्सिअस अथवा त्याहून कमी असेल तेथे विशेष काळजी घ्यावी.
  • पिकांना सायंकाळी पाणी द्यावे, त्यामुळे जमिनी थंड होत नाहीत.
  • जनावरांना बंदिस्त गोठ्यात बांधावे. पोल्ट्री शेडमध्ये दिवे लावावेत.
  • (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व सदस्य प्रवृत्त पर्जन्य कृती दल सुकाणू समिती) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com