जीएम पिके- भारतात धोरण कोंडी कधी फुटणार?

जगभरात जीएम पिकांना एकीकडे जोरदार समर्थन तर दुसरीकडे तेवढाच विरोधही होत आहे.अनेक देशांत जीएम पिकांखालील क्षेत्र विस्तारत असताना भारत बीटी कापसापुरताच सीमित राहणार कीजीएम तंत्रज्ञानाच्या कक्षा रुंदावणार हाच महत्त्वाचा प्रश्‍न आहे.
जनुकीय सुधारीत पिकांमध्ये  मका हे जागतिक स्तरावर आघाडीवर पाच पिकांपैकी एक आहे.
जनुकीय सुधारीत पिकांमध्ये मका हे जागतिक स्तरावर आघाडीवर पाच पिकांपैकी एक आहे.

भारतात बीजी थ्री, एचटीबीटी कपाशी, बीटी वांगे या जीएम तंत्रज्ञानयुक्त पीकवाणांची मागणी जोर धरू लागली आहे. त्यातूनच अनधिकृत एचटी कापसासारखे जीएम वाण बाजारात उपलब्ध होत आहेत. जगभरात जीएम पिकांना एकीकडे जोरदार समर्थन तर दुसरीकडे तेवढाच विरोधही होत आहे. अनेक देशांत जीएम पिकांखालील क्षेत्र विस्तारत असताना भारत बीटी कापसापुरताच सीमित राहणार की जीएम तंत्रज्ञानाच्या कक्षा रुंदावणार हाच महत्त्वाचा प्रश्‍न आहे.   जागतिक स्तरावर जीएम पिकांच्या निर्मितीमागील मुख्य उद्देश

  • अधिक पोषणद्रव्ये असलेले वाण
  • अधिक उत्पादनक्षम
  • किडी-रोग प्रतिकारक, तणनाशक सहनशील
  • अवर्षण तसेच क्षार सहनशील
  • अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर होण्यासाठी
  • आर्थिक दृष्ट्य़ा गरीब व अल्पभूधारक शेतकऱ्यांचा फायदा
  • जागतिक दृष्ट्य़ा जीएम पिके

  • जगात जीएम तंत्रज्ञानाची व्यावसायिक सुरुवात- १९९६
  • क्षेत्र- १.७ दशलक्ष हेक्टर
  • सन २०१८- क्षेत्र १९१. ७ दशलक्ष हेक्टर
  • सुमारे २२ वर्षांच्या काळात जीएम पीक लागवडीखालील क्षेत्रात वाढ- ११३ पट
  • जीएम पिकांनी व्यापलेल्या देशांची संख्या- ७०
  • लागवड करणारे देश- २६
  • यात विकसनशील देश- २१ - जागतिक जीएम पिकांपैकी त्यांचा हिस्सा - ५४ टक्के
  • विकसित वा औद्योगिक देश- ५-
  • जागतिक जीएम पिकांपैकी त्यांचा हिस्सा - ४६ टक्के
  • अन्न, पशुखाद्य व प्रक्रिया या तीन कारणांसाठी जीएम पिकांची आयात करणारे देश- ४४- (मुख्यतः- युरोपीय)​
  •  जगातील चार मुख्य जीएम पिके-   

  • १) सोयाबीन- ९५. ९ दशलक्ष हेक्टर (जागतिक जीएम पिकांच्या ५० टक्के हिस्सा)
  • २) मका- ५८. ९ दशलक्ष हेक्टर
  • ३) कापूस- २४. ९ दशलक्ष हेक्टर
  • ४) कॅनोला- १०.१ दशलक्ष हेक्टर
  • जीएम पिकातील जगातील पहिले पाच देश (सन २०१८ नुसार)  (क्षेत्र दशलक्ष हेक्टर)

  • अमेरिका- ७५
  • ब्राझील- ५१.३
  • अर्जेंटिना- २३.९
  • कॅनडा-१२.७
  • भारत- ११.६ दशलक्ष हेक्टर (केवळ बीटी कॉटन हे एकमेव पीक)
  • सुमारे ६० लाख शेतकऱ्यांकडून वापर
  • या पाच देशांत मिळून ९१ टक्के म्हणजे १९१. ७ दशलक्ष हेक्टर क्षेत्र
  • पाच देशांतील १.९५ अब्ज लोकसंख्येला किंवा जागतिक ७. ७ अब्ज लोकसंख्येच्या २६ टक्के लोकसंख्येला त्याचा फायदा
  • अन्य व्यावसायिक जीएम पिके वांगे, सफरचंद, बटाटा, शर्कराकंद, पपया, . हे ठरले जगात सर्वप्रथम लागवड करणारे देश

  • बांगला देश- बीटी वांगे
  • ऑस्ट्रेलिया- तणनाशक प्रतिकारक कापूस
  • ब्राझील- कीड प्रतिकारक ऊस लागवड
  • इंडोनेशिया- दुष्काळ सहनशील ऊस
  • ऑस्ट्रेलिया- ओलेइक ॲसिडचे प्रमाण उच्च असलेली करडई
  • फिलीपाईन्स- जीएम मका घेणारा दक्षिण-पूर्व आशियातील पहिला देश
  • युरोपीय महासंघाअंतर्गत संमत एकमेव पीक- कीड प्रतिकारक मका
  • देश- स्पेन व पोर्तुगाल
  • जागतिक जीएम पिकांत या जनुकांचे वर्चस्व

  • किडीला (अळी) प्रतिकारक
  • तणनाशक सहनशील
  • (स्टॅक्ड ट्रेटस)
  • सध्या जागतिक दृष्ट्य़ा हे क्षेत्र ४२ टक्के
  • कापूस, सोयाबीन, मका, कॅनोला, अल्फाअल्फा (चारा पीक) यांच्याही तणनाशक सहनशील वाणांचे बाजारपेठेत वर्चस्व- त्यांचा जागतिक हिस्सा ४६ टक्के.
  • (स्रोत- दी इंटरनॅशनल सर्व्हिस फॉर दी ॲक्वीसीशन ऑफ ॲग्री बायोटेक ॲप्लीकेशन्स (आयएसएए) जीएम पिकांतील जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञान मका, सोयाबीन, कापूस

  • एकाच वाणात एकाहून अधिक विविध गुणधर्मांची जनुके
  • उदाहरणार्थ थ्रिप्स, बग यासारख्या रसशोषक किडींपासून संरक्षण देणारा जनुक अधिक 
  • बोंडअळ्या, टोबॅको बडवर्म व तत्सम अळ्यांपासून संरक्षण देणारा बीजी थ्री जनुक
  • पूर्वीच्या बीजी टू मध्ये बॅसिलस थुरींनजेंसीस (बीटी) जिवाणूतील
  • क्राय वन एसी अधिक क्राय टू एबी या दोन जनुकांचा समावेश.
  • बीजी थ्री मध्ये या दोन क्राय जनुकांसह व्हीआयपी थ्री ए हे तिसरे बीटी जनुक (प्रथिन)  अधिक
  • दोन किंवा तीन तणनाशकांना प्रतिकारक जनुक (बहुव्यापक क्षमता)
  • (म्हणजे यांपैकी कोणतेही तणनाशक वापरणे शक्य)
  • ग्लायफोसेट, ग्लुफॉसीनेट, डायकांबा
  • आधुनिक तंत्रज्ञानाबाबत केलेले दावे

  • बीजी थ्री तंत्रज्ञानात एकाच वाणात तीन जनुके. त्यामुळे बोंडअळीवर कार्य करण्याची पद्धती (मोड ऑफ ॲक्शन ) वेगळ्या प्रकारची. त्यामुळे अळीत प्रतिकारक्षमता विकसित होण्यास अडथळे
  • साहजिकच अळ्यांपासून पिकाला दीर्घ काळ संरक्षण
  • कीटकनाशकांच्या फवारण्यांच्या संख्येत घट
  • मित्रकिटक अधिक काळ तग धरू शकतात. मृत्यूदर कमी.
  • यंत्रे व मजुरबळ यांचा वापर कमी
  •  अन्य गुणधर्म 

  • मका- यातील एक जनुक मातीच्या वरील भागात राहणाऱ्या तसेच मातीच्या खाली मुळांत राहणाऱ्या किडीचे नियंत्रण करतो.
  •  एकाचवेळी विविध किडींपासून पिकाला संरक्षण देणारे जनुक
  • (तीन वेगवेगळ्या पद्धतीने कार्य- मोड ऑफ ॲक्शन )
  • उदा. युरोपियन कॉर्न बोरर, स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा, वेस्टर्न बीन कटवर्म, ब्लॅक कटवर्म, कॉर्न इअरवर्म
  •  अवर्षणात तगणारा मका

  • पाण्याची टंचाई असताना म्हणजेच पावसाचा दीर्घखंड असताना त्यात पीक तगून राहते.
  • अशा काळात झाडात प्रथिन तयार होते. ज्यामुळे झाडाच्या वाढीस चालना मिळते व उत्पादन
  • चांगल्या प्रकारे मिळते.
  •  भारतातील स्थिती भारतात कपाशीच्या बीजी वन आणि बीजी टू अशा दोन जनुकीय वाणांना कायदेशीर संमती मिळाली. आता बीजी टू वाण देखील बोंडअळ्यांसाठी निष्प्रभ ठरू लागल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. त्यापुढील तंत्रज्ञानाची आग्रही मागणी होत आहे. मजूरटंचाई, त्यांचे वाढलेले दर ही समस्या लक्षात घेता तणनाशक सहनशील जनुक असलेल्या एचटी (हर्बीसाईड टॉलरन्स) वाणांना कायदेशीर संमती देण्याची मागणी शेतकरी तसेच शेतकरी संघटनांच्या वतीने होऊ लागली आहे. अनधिकृत एचटी कपाशी वाण मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध होऊ लागले आहेत. बीटी वांग्याचाही असा एक वाण राज्यात नुकताच आढळला.   काय आहे बीटी वांगे? भारतात बीटी वांग्याची चर्चा सातत्याने होते. मात्र अद्याप व्यावसायिक लागवडीस केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. बांगला देशाने मात्र आघाडी घेत या वांग्याच्या लागवडीस संमती देणारा जगातील पहिला देश म्हणून मान पटकावला. येथील शेतकऱ्यांचे हे महत्त्वाचे अन्नपीक असून तेथे वांग्याचे क्षेत्र ५० हजार हेक्टरपर्यंत आहे. तंत्रज्ञानाविषयी

  • फळे व शेंडा पोखरणारी अळी (फ्रूट ॲण्ड शूट बोरर)
  • या पिकातील महत्त्वाची गंभीर कीड
  • फळाच्या आत राहून नुकसान करते. त्यामुळे रासायनिक नियंत्रण करणे अवघड.
  • पिकाचे वर्षाला होणारे नुकसान ५१ ते ७३ टक्के.
  • बीटी कापसाप्रमाणेच बॅसीलस थुरींनजेंसीस (बीटी) या जिवाणूतील जनुक वांग्यात प्रत्यारोपीत
  • त्यामुळे या वांग्यात विषारी प्रथिनाची निर्मिती
  • अळी पीक खाताच तिच्या पोटात ते जाऊन तिचा मृत्यू होतो.
  •  बांगला देशातील बीटी वांगे संमती (ठळक बाबी)

  • सुमारे सात वर्षे हरितगृहात व विविध क्षेत्रीय चाचण्या
  • २०१३ ऑक्टोबर- चार वाणांना संमती
  • प्रायोगिक निष्कर्षांनुसार उत्पादनवाढ- ३० टक्के
  • कीडनाशकांच्या फवारण्या व खर्चात बचत- ७१ ते ९० टक्के
  • सन २०१४- क्षेत्र- सुमारे २ हेक्टर
  • सन २०१७-
  • क्षेत्र सुमारे २४०० हेक्टर.
  • शेतकऱ्यांची संख्या- सुमारे २७००
  •  फिलीपाईन्स

  • बहुक्षेत्रीय चाचण्या (मल्टीलोकेशनल ट्रायल्स) पूर्ण करण्याचा टप्पा गाठला.
  • आता तो व्यावसायिक लागवडीच्या उंबरठ्यावर
  •  भारतातील सद्यःस्थिती

  • महाराष्ट्रातील बियाणे क्षेत्रातील खाजगी कंपनीकडून हे तंत्रज्ञान विकसित
  • सन २००२ ते २००६ पर्यंतच्या प्रक्षेत्र चाचण्या पूर्ण
  • केंद्रीय पर्यावरण मंत्रालयांतर्गत त्यावेळच्या जीईएसी (जेनेटिक इंजिनियरिंग अप्रूवल कमिटी) कडून त्यास ऑक्टोबर, २००९ मध्ये मंजुरी.
  • जीएम विरोधक व पर्यावरणवाद्यांकडून त्यास प्रचंड विरोध
  • तत्कालीन केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी घेतली देशभरात जनसुनावणी
  • त्यानंतर २०१० मध्ये मंजुरीला स्थगिती. ती आजगायत कायम
  • देशभरातील शास्त्रज्ञांत एकमत नाही. शास्त्रीय निष्कर्ष समाधानकारक मिळेपर्यंत स्थगिती असे निर्णयाबाबत स्पष्टीकरण
  • जीएम तंत्रज्ञान समर्थक काय म्हणतात?

  • कीडनाशकांच्या फवारण्या कमी होऊन रासायनिक प्रदूषण कमी होईल.
  • एचटी वाणांमुळे तणनाशकांचा वापर सुकर होऊन मजूरटंचाईवर मात होईल.
  • एकरी उत्पादनात वाढ व उत्पादन खर्च कमी होईल.
  • कोणतेही नवे तंत्रज्ञान वापरणे हा शेतकऱ्यांचा हक्कच. त्यापासून त्याला रोखता येणार नाही.
  • जीएम वाणांविषयीची भिती अनाठायी.
  • विविध देशांत विविध पिकांत वापर सुरू असून शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
  • जैवतंत्रज्ञान संशोधनावर घातलेले निर्बंध, अडथळे दूर करावेत.
  • लागवड हा पुढचा विषय. मात्र चाचण्यांनाच परवानगी नाकारली तर तंत्रज्ञानच मागे पडण्याची भिती
  • काहीवेळा राज्य सरकारांकडून चाचण्यांना संमती नाकारण्यात येते. त्यामुळे जीएम चळवळीला खीळ बसते.
  • सेंद्रिय शेतीबाबत आग्रही असलेल्या राज्यांकडून होऊ शकतो प्रतिबंध.
  • वास्तव व वस्तुस्थितीबाबत शेतकरी व ग्राहकांचेही प्रबोधन गरजेचे
  • विरोधकांचा सूर काय?

  • जीएम पिकांबाबत सखोल, व्यापक, परिपूर्ण संशोधन हवे.
  • मानवी आरोग्य, पर्यावरण, जनावरांचे आरोग्य या बाबींना प्राधान्य देऊन त्यांच्यावर होणारे दूरगामी परिणाम अभ्यासणे गरजेचे
  • विविध पिकांत वापर होत राहिल्यास परागीभवन, जैवविविधता धोक्यात येऊ शकते. अन्न प्रदूषित होऊ शकते.
  • सर्व बाबींचे व समाजातील सर्व घटकांचे शंका निरसन होणार नाही तोपर्यंत चाचण्या वा लागवडीस संमती नको
  • जीएम वाण प्रयोग वा उत्पादनांसाठी कार्यक्षम परीक्षण यंत्रणा उभारण्याची गरज
  • संकरित वाण असल्याने बहुराष्ट्रीय कंपन्यांची मक्तेदारी होण्याचा धोका.
  • जीएम संबंधीच्या प्रयोगांचे अहवाल सामान्यांसाठी खुले (पारदर्शकता) होण्याची गरज
  • जीएम वाणांच्या बाजारपेठेत देशी वाण टिकून राहतील का याबाबत शंका
  • सेंद्रिय शेतीत जीएम तंत्रज्ञानाला संमती नसल्याने त्या उद्योगाकडूनही विरोध
  • सरकारचे धोरण स्पष्ट नाही- डॉ. मायी साउथ एशिया बायोटेक सेंटरने (नवी दिल्ली) केंद्र सरकारला पत्र पाठवून देशात सुरू असलेल्या अनधिकृत एचटी कापसाच्या लागवडीबाबत जागृत केले. सेंटरचे अध्यक्ष व जीएम तंत्रज्ञान तज्ज्ञ डॉ. सी.डी. मायी म्हणतात की हे तंत्रज्ञान अधिकृत करण्याच्या दृष्टीने सरकारने पावले टाकली पाहिजेत. एचटी- बीटी कापूस, बीटी वांगे यांच्या व्यावसायिक संमतीसाठी विलंब लागतो आहे. कारण भारताचे याबाबतचे धोरण स्पष्ट नाही. ‘जेनेटिक इंजिनियरिंग अप्रायजल कमिटीने (जीईएसी) बीटी वांग्याला मंजुरी देऊनही केवळ राजकीय हेतूने सरकारकडून मंजुरीची प्रक्रिया रखडली आहे. आपल्याच तांत्रिक तपशीलाआधारे बांगला देशाने मात्र हे पीक लागवडीखाली आणले. जीएम पिकांच्या चाचण्यांसाठी निश्‍चित प्रोटोकॉल असतो. त्यासंबंधी जैवसुरक्षेसंबंधीचा डाटा सरकार प्रमाणित प्रयोगशाळेतूनच सिद्ध व्हावा लागतो. मुंबई, इज्जतनगर, हैदराबाद, आदी विविध मान्यवर संस्थांमधून बीटी वांग्याच्या शास्त्रीय अहवालांचे परीक्षण झाले. त्यानंतरच जीईएसीने त्यास मंजुरी दिली.एचटीबीटी कपाशीसंबंधीचाही संपूर्ण तपशील दहा विद्यापीठे, नागपूर येथील संशोधन संस्था यांच्याकडून निर्माण करून जीईएसीला दिला आहे. मात्र नवे तंत्रज्ञान आणण्याची सरकारचीच नीती नसावी अशी शंका येते आहे.   उल्लेखनीय संशोधन

  • गोल्डन राईस
  • आशियाई देशांचे भात हे मुख्य पीक.
  • ए जीवनसत्त्वाने युक्त गोल्डन राईस अनेक वर्षांपासून जागतिक चर्चेत
  • मागील वर्षी फिलीपाईन्सकडून त्याच्या वापरास मंजुरी दिली. त्यासाठी आशियाई खंडातील तो पहिला देश ठरला.
  • इक्रिसॅट संस्थेने दुष्काळ सहनशील व ए जीवनसत्त्वाने युक्त भुईमूग विकसित केला आहे. तर कोइमतूर येथील ऊस पैदास संस्थेनेही दुष्काळ सहनशील उसावर संशोधन केले आहे.
  • तामिळनाडू कृषी विद्यापीठ व धारवाड कृषी विद्यापीठात बीटी वांग्यावर संशोधन झाले आहे.
  • संपर्क- मंदार मुंडले- ९८८१३०७२९४

    (लेखक ॲग्रोवनचे उपमुख्य उपसंपादक व जीएम तंत्रज्ञान विषयाचे अभ्यासक आहेत.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com