agriculture story in marathi, advantages of intercropping | Agrowon

आंतरपीक पद्धती ठरते फायदेशीर...
डॉ. वा. नि. नारखेडे, डॉ. डी. एन. गोखले
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

सध्याच्या काळात जमिनीतील ओलावा लक्षात घेऊन रब्बी ज्वारी अधिक करडई, जवस अधिक करडई, हरभरा अधिक मोहरी, सूर्यफूल अधिक करडई या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.

रब्बी हंगामात लागवडीचे नियोजन करताना
नत्र स्थिरीकरणासाठी हरभरा पिकाचा समावेश आंतरपीक पद्धतीत करावा. पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशक, जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी. माती परीक्षणानुसार एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन करावे. तेलवर्गीय व कडधान्य पिकांचा पीकपद्धती आणि आंतरपीक पद्धतीमध्ये समावेश करावा.

अत्यल्प पावसावर येणारी रब्बीतील आंतरपीक पद्धती
रब्बी ज्वारी आणि करडई

सध्याच्या काळात जमिनीतील ओलावा लक्षात घेऊन रब्बी ज्वारी अधिक करडई, जवस अधिक करडई, हरभरा अधिक मोहरी, सूर्यफूल अधिक करडई या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.

रब्बी हंगामात लागवडीचे नियोजन करताना
नत्र स्थिरीकरणासाठी हरभरा पिकाचा समावेश आंतरपीक पद्धतीत करावा. पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशक, जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी. माती परीक्षणानुसार एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन करावे. तेलवर्गीय व कडधान्य पिकांचा पीकपद्धती आणि आंतरपीक पद्धतीमध्ये समावेश करावा.

अत्यल्प पावसावर येणारी रब्बीतील आंतरपीक पद्धती
रब्बी ज्वारी आणि करडई

  • ही आंतरपीक पद्धती ज्या क्षेत्रावर रब्बी ज्वारी मोठया प्रमाणात घेण्यात येते, अशा क्षेत्रासाठी शिफारस करण्यात आली आहे.
  • वातावरणातील उष्ण तापमानाच्या तफावतीमध्ये ज्वारी किंवा करडई सलग येणारी घट आंतरपीक पद्धतीत कमी होऊन उत्पादनात स्थिरता येते.
  • आंतरपीक पद्धतीची शिफारस ६:३ या ओळीच्या प्रमाणात करण्यात आली आहे. इतर पीक व्यवस्थापन हे ज्वारी व करडईच्या सलग पीक पद्धतीसारखेच आहे.

करडई आणि हरभरा

  • मध्यम ते भारी जमिनीसाठी आंतरपीक पद्धतीची शिफारस आहे.
  • आंतरपीक पद्धती ६:३, ३:३ किंवा २:४ ओळींच्या प्रमाणात घेतल्यास जास्त फायदा होतो.

जवस आणि हरभरा

  • मध्यम ते भारी जमिनीमध्ये या आंतरपीक पद्धतीची शिफारस  आहे.
  • ही आंतरपीक पद्धती ६:३ किंवा ३:३ ओळींच्या प्रमाणात घेतल्यास अधिक फायदा होतो.

जिरायती आणि बागायती आंतरपीक पद्धती    

पिके  पेरणीच्या ओळीचे प्रमाण जमीन  मुख्य पीक पेरणी अंतर (सें.मी.)  
रब्बी ज्वारी आणि करडई  ६:३, ४:२ मध्यम ते भारी   ४५ बाय १०     
करडई अाणि हरभरा  २:४, ६:३, ३:३    मध्यम ते भारी   ४५ बाय १०     
हरभरा आणि सूर्यफूल  ३:३  मध्यम ते भारी   ४५ बाय १०     
जवस आणि  हरभरा/करडई  ६:३, ४:२ मध्यम ते भारी  ४५ बाय १०
गहू अाणि हरभरा  ३:१ मध्यम ते भारी  २२.५  
गहू अाणि मोहरी ६:३  मध्यम ते भारी  २२.५  

सुधारित आणि संकरित जाती

रब्बी हंगामातील पिके   सुधारित/संकरित जाती
रब्बी ज्वारी  संकरित जाती ःसीसीएच – १५ आर, सीसीएच-१९ आर
रब्बी ज्वारी  सुधारित जाती ः परभणी मोती, परभणी ज्योती, पीकेव्ही क्रांती, फुले रेवती
हरभरा बीडीएन ९-३, बीडीएनजी-७९७, फुले जी-१२, फुले जी-५, विजय, विशाल, दिग्विजय, फुले विक्रांत
करडई पीबीएनएस-१२, पीबीएनएस-४०, नारी-६, शारदा, डीएसएच १२९
जवस लातूर जवस
गहू    मालविका, एचडी-४५०२, एनआयएडब्ल्यू-३०१ (त्र्यंबक), गोदावरी, तपोवन.
मोहरी  पुसा बोल्ड, सीता

डॉ. वा. ना. नारखेडे, ७५८८०८२१८४, (वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
हरभरा आणि जवस (३ः३) आंतरपीक पद्धती
हरभरा आणि सूर्यफूल (३ः३) आंतरपीक पद्धती

इतर अॅग्रोगाईड
सोयाबीनवरील कीडीची ओळख सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’...रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
राज्यात १५ जुलै ते १९ जुलै दरम्यान...राज्यातील हवामानाचा विचार करता उत्तर महाराष्ट्र व...
दमा, खोकल्यावर गुणकारी घोळ स्थानिक नाव    :   ...
पावसाळी वातावरणात द्राक्षबागेचे...गेल्या आठवड्यात द्राक्षबागेत सर्वत्र पाऊस सुरू...
कृषी अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये विविध...कृषी क्षेत्रातील होत असलेले बदल, आर्थिक गुंतवणूक...
पेरणी पद्धतीने भात लागवडभाताची लागवड १५ जुलै पर्यंत पूर्ण करावी. दोन...
व्यवस्थापन लिंबू फळबागेचेलिंबू फळबाग लागवडीसाठी योग्य जमीन, जात यांची निवड...
लामकानीमध्ये सहभागातून कुरण व्यवस्थापनरोजगार हमी योजनेतून लामकानी वनक्षेत्रात जल व...
कन्या वन समृद्धी योजनाशेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली, तर तिच्या...
बांबू विकासासाठी धोरणात्मक निर्णयांची...‘राष्ट्रीय बांबू अभियान’नुसार सुचविलेल्या सुधारित...
गरज सांडपाणी व्यवस्थापनाचीजिथे लोकसंख्या एकत्रित झालेली असते, तिथे निर्माण...
तंत्र शेवगा लागवडीचेमहाराष्ट्रातील सुमारे ८४ टक्के क्षेत्र कोरडवाहू...
बहुगुणी तेलबिया पीक लक्ष्मीतरूलक्ष्मीतरू (शास्त्रीय नाव - Simarouba glauca...
त्वचारोगावर टाकळा उपयुक्त स्थानिक नाव    :  ...
सीताफळाचे अन्नद्रव्य, ओलीत व्यवस्थापनसीताफळाची मुळे खोलवर न जाता वरच्या थरात राहतात,...
लोकसहभागातून कुरण विकासाची गरजगवताळ कुरणे मृदा-जल संवर्धनासाठी गरजेची आहेत,...
कृषी विभागाच्या योजना परंपरागत कृषी विकास योजना  उद्देश...
वैयक्तिक कृषी कौशल्य प्रशिक्षण...महाराष्ट्र शासनाच्या कौशल्यविकास मंत्रालयाच्या...
मांडा जलसंधारणाच्या कामाचे गणितमागच्या भागात आपण नागरी आणि ग्रामीण भागातील...