आंतरपिकातून मिळेल चांगले उत्पादन

ऊस अाणि बटाटा (1:1) अांतरपीक पद्धती
ऊस अाणि बटाटा (1:1) अांतरपीक पद्धती

आंतरपीक पद्धतीमध्ये चांगले उत्पादन मिळविण्यासाठी वेळेवर पेरणी, योग्य जातीची निवड, रासायनिक खतांचा संतुलित वापर, प्रमाणबद्ध रोपांची संख्या, तणांचे नियंत्रण, आंतर मशागत व गरजेनुसार पीक संरक्षण, तसेच मृद व जलसंधारण केल्यास अधिक उत्पादन मिळते. विविध पीक पद्धतीत कडधान्य पिकांचा समावेश केल्याने जमिनीचा पोत सुधारतो. या पिकांच्या मुळावरील ग्रंथीतील रायझोबियम जिवाणू हवेतील नत्र शोषून घेत असल्याने या पिकांची नत्राची गरज बऱ्याच प्रमाणात परस्पर भागविली जाते. शिवाय कडधान्य पिकानंतर घेण्यात येणाऱ्या पिकासाठी उत्तम बेवड तयार होतो. त्यामुळे आंतरपीक पद्धतीमध्ये कडधान्य पिकांचा समावेश करावा. आंतरपीक पद्धतीमध्ये चांगले उत्पादन मिळविण्यासाठी वेळेवर पेरणी, योग्य जातीची निवड, रासायनिक खतांचा संतुलित वापर, प्रमाणबद्ध रोपांची संख्या, तणांचे नियंत्रण, आंतर मशागत व गरजेनुसार पीक संरक्षण, तसेच मृद व जलसंधारण केल्यास अधिक उत्पादन मिळते.

बागायती आंतरपीक पद्धती गहू अाणि हरभरा

  • मध्यम ते भारी जमिनीमध्ये ६:३ ओळींच्या प्रमाणात ही आंतरपीक पद्धती फायदेशीर आहे.
  • गहू अाणि मोहरी
  • मध्यम ते भारी जमिनीमध्ये बागायती क्षेत्रासाठी या आंतरपीक पद्धतीची शिफारस आहे.
  • आंतरपीक पद्धतीत ६ ओळी गहू व ३ ओळी मोहरीच्या प्रमाणाची शिफारस आहे. इतर लागवडीच्या शिफारशी गहू व मोहरीच्या सलग पीक पद्धतीसारख्या आहेत.
  • पूर्वहंगामी उसातील आंतरपिके पूर्वहंगामी ऊस लागवड ऑक्टोबर-नोव्हेंबर यादरम्यान होते. या उसामध्ये मुख्यत्वे करून बटाटा, कांदा, लसूण, कोबी या पिकांची लागवड करावी. पट्टा अथवा जोड ओळ पध्दतीत (७५-१५० सें.मी.) आंतरपिकाच्या दोन ओळी घ्याव्यात. यासाठी ऊस लागवडीनंतर ६ ते ७ दिवसांत पाणी देण्याच्या आधी, तर पिकाची टोकण अथवा पुनर्लागवड करावी. मात्र या पिकांच्या व्यवस्थापनाबाबत विशेष लक्ष द्यावे. पूर्वहंगामी ऊस आणि कांदा

  • उसामध्ये कांद्याच्या रोपाची लागवड सरीच्या दोन्ही बाजूस १० ते १५ सें.मी. अंतरावर दुसऱ्या पाण्याच्या वेळी करावी.
  • या पिकाला मुख्य पिकांच्या खतमात्रेव्यतिरिक्त हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश द्यावे.
  • जमिनीची सुपीकता टिकवणे आणि वाढविण्याच्या दृष्टीने कांदा हे उत्तम पीक आहे.
  • पूर्वहंगामी ऊस अाणि बटाटा ः अ) सलग लागवड पद्धत :

  • जमिनीच्या प्रकारानुसार उसाची लागवड ८० सें.मी, १०० सें.मी व १२० सेंमी केली जाते.
  • ऊस आणि बटाट्याची एका वेळी लागवड करावयाची असल्यास मध्यम जमिनीवर प्रथम बटाटे १०० सें.मी. अंतरावर शेतामध्ये सरळ रेषेमध्ये १५ ते २० सें.मी. अंतरावर ठेवावेत. त्यानंतर दोन बटाट्याच्या ओळींमधून रिजर चालवावा, जेणेकरून अंथरलेले बटाटे हे वरंब्याखाली आपोआप झाकले जातात, तसेच रिजरमुळे ऊस लागवडीखाली सऱ्या तयार होतात. या सऱ्यांमध्ये ऊस लागवड करता येते.
  • उसामध्ये बटाटे आंतरपीक पद्धतीत सर्वसाधारणपणे बटाटा पिकांचे १५० ते २०० क्विंटल उत्पादन मिळते.
  • ब) जोड ओळ पट्टा पद्धत : जोड ओळ पट्टा पद्धतीने उसाचे उत्पादन चांगले येते. २.५ फुटांवर सलग सऱ्या पाडून प्रत्येक दोन सऱ्यात उसाची लागवड करून तिसरी सरी मोकळी सोडल्यास दोन जोडओळीत पाच फुटांचा पट्टा तयार होतो. अशा पट्ट्यात बटाटा, हरभरा किंवा कांदा यांची लागवड करावी. डॉ. वा. ना. नारखेडे, ७५८८०८२१८४, (वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com