दुष्काळाशी यशस्वी लढा देणारे बाळासाहेब बिडवे 

बाळासाहेब बिडवे
बाळासाहेब बिडवे

जालना जिल्ह्यातील परतूरच्या सातोना गावातील बाळासाहेब बिडवे यांचे शेत म्हणजे दुष्काळग्रस्त मराठवाड्यात जिद्दीने लढणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रेरणास्थान. “दुष्काळ माझ्या ध्यानीमनी नाही. उलट शेतात नवा बंगला बांधण्याचे ध्येय मी ठेवले आहे असे बोलून दाखविणारे बाळासाहेब शेतकऱ्यांना चकीत करून दाखवतात.  ॲग्रोवनच्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात माहिती आणि प्रोत्साहन घेण्यासाठी आलेले बाळासाहेब खरे तर स्वतःच प्रोत्साहनाचे मोठे स्रोत आहेत. दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील जालना भागात १७ एकर शेती असलेल्या बाळासाहेबांची शेती पूर्वी तोट्याची होती. मात्र शेतीविषयक सतत नवी माहिती, तंत्रज्ञानाचा शोध आणि ॲग्रोवनचे काळजीपूर्वक वाचन हाच त्यांनी दिनक्रम ठेवला. जोडीला शेतीतील राबणेही सुरू होते. त्यातून त्यांनी शेतीत प्रगती केली. प्रल्हाद आणि सुनील ही बाळासाहेबांची दोन्ही मुले दुष्काळात जिद्दीने लढून वडिलांना साथ देत आहेत.  “मी ॲग्रोवनचा साथ धरली. त्यामुळे चांगली शेती करू शकलो. आमच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली. सन २०११ मध्ये बांधलेल्या घराला ॲग्रोवन असे नाव दिले. आता पाच एकरांवर कपाशी पिकवली. याशिवाय डाळिंबाची चार एकर आणि द्राक्षाची दीड एकर बाग उभी आहे. ते म्हणतात की, दुष्काळाची समस्या फार आड येत नाही. पाण्याशिवाय शेती नाही. मी पाण्याचा शोध घेत होतो. एका विहिरीवर जमत नव्हते. त्यामुळे निम्न दुधना सिंचन प्रकल्पापासून अडीच किलोमीटर पाइपलाइन करून गेल्या वर्षी पाणी आले. तीन बोअरवेल्स घेतल्या. आता दुष्काळातही विहिरीला पाच एचपीची मोटर चार तास चालते आहे. संरक्षित पाण्यामुळे एकरी दहा क्विंटल कपाशी केवळ पाण्यामुळे घेता आली, असे बाळासाहेब सांगतात. कोरडवाहू पिकांकडून कष्टाने फळबागांकडे वळलेले बाळासाहेब आता सोनाका वाणाच्या द्राक्ष बागेची आणि भगव्या डाळिंब बागेची मुलासारखी काळजी घेत आहेत. “शेतीत राबता असला आणि नवे तंत्रज्ञान तुमच्याकडे असले की प्रत्येक पीक फायदा मिळवून देते. मला पाच एकर कपाशीतून ५० क्विंटल उत्पादन मिळाले. त्यातील निम्मे उत्पादन प्रति क्विंटल साडेपाच हजार रुपयांनी ने विकले. दोन लाख रुपयांचा ऊस पिकला. आता नवी कोरी कार खरेदी केली आहे असे बाळासाहेब समाधानाने सांगतात. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com