आधुनिक तंत्र, बारमाही भाजीपाला

मदनकर यांनी भाजीपाला पिकांत क्राॅप कव्हरचा वापर केला आहे.
मदनकर यांनी भाजीपाला पिकांत क्राॅप कव्हरचा वापर केला आहे.

शेतीकडे पाहण्याचा व्यावसायिक दृष्टीकोन, शेतीत तज्ज्ञ होण्याची धडपड, कारले व चवळी व जोडीला भेंडी अशी बारमाही भाजीपाला पद्धती, आधुनिक तंत्राचा शोध व वापर या गुणवैशिष्ट्यांच्या आधारे खोलमारा (जि. भंडारा) येथील अमृत मदनकर यशस्वी शेती करताहेत. धानपट्ट्यात वेगळ्या पिकांचे प्रयोग करून अर्थकारण सुधारण्यासह गटशेती साकारण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न स्तुत्य आहे .    भंडारा जिल्हा भातशेतीसाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील खोलमारा गावातील शेतकरीदेखील  पारंपरिक पद्धतीने भाताची (धान) शेती करतात. एकरी उत्पादकता, खर्च व दर यांचा मेळ घालता  हाती फारच कमी रक्कम राहायची. प्रपंच, मुलांची शिक्षणे, घरच्या गरजा भागविण्यासाठी लागणाऱ्या पैशांची सोय करताना चांगलीच ओढाताण व्हायची. त्यामुळेच गावातील शेतकरी अर्थकारण उंचावणाऱ्या पर्यायी पिकांच्या शोधात होते. त्यातीलच एक अमृत मदनकर. त्यांची वडिलोपार्जित सुमारे साडेचार एकर शेती. त्यात विहिरींचा पर्याय आहे.  अर्थकारण सुधारणारी शेती  अमृत यांचे वडील पूर्वी अर्धा एकरांवर भाजीपाला घ्यायचे. त्यांच्याकडून धानासोबतच भाजीपाला शेतीचा वारसा अमृत यांना मिळाला. सन २०१० मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर शेतीची सूत्रे अमृत यांच्याकडेच आली. शेती व्यावसायिक दृष्टीकोनातूनच करायची असेच त्यांनी ठरवले होते.  त्यादृष्टीने पुढील बाबींचा विचार केला.  १) विहिरीला पाणी कमी आहे. अशावेळी कमी पाणी लागणाऱ्या, तसेच बाजारपेठेत कायम मागणी असेल अशा पिकांची निवड. त्यात भाजीपाला पिकांना पसंती  २) भाजीपाला क्षेत्र वाढविण्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड  ठिबक सिंचन तंत्राचा वापर  तत्कालीन तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर यांनी मदनकर यांच्या शेतीला भेट दिली. त्या वेळी कमी पाण्याच्या उपलब्धतेचा मुद्दा मदनकर यांनी मांडला. त्या वेळी ठिबक करण्याचा सल्ला मिळाला. सन २०१२ साली अर्धा एकर क्षेत्र ठिबकखाली आणले. त्यासाठी अनुदानही मिळाले. पुढील काळात ठिबकचे फायदे लक्षात आल्याने त्याखालील क्षेत्र वाढवले.  आजची पीकपद्धती व तंत्राचा वापर 

  • क्षेत्र- सुमारे चार एकर 
  • यात कारले व चवळीचे आंतरपीक 
  • विविध हंगामात लागवडीचे नियोजन 
  • उदा. १५ डिसेंबर- कारले लागवड 
  • त्यानंतर एप्रिलमध्ये दुसरी लागवड 
  • त्याचे होणारे फायदे 

  • वर्षभर अखंड कारले सुरू राहते. 
  • एका हंगामात समाधानकारक दर न मिळाल्यास दुसऱ्या हंगामात मिळण्याची आशा. 
  • लागवडीतील वैशिष्ट्ये 

  • कारली- गादीवाफा (बेड), पॉली मल्चिंग, बांबू व तारांची रचना 
  • साडेचार बाय दोन फूट अंतर. तशा पद्धतीचे बेडस 
  • आता दोन झाडांतील अंतर तीन फूट 
  •  उत्पादन 

  • कारले- एकरी ८ ते १० टनांपर्यंत 
  • दर- किलोला ४०, ५० रुपये ते ६० रुपये 
  •  खर्च- दीड लाख रू. 
  • नफा- सुमारे ७५ हजार ते एक लाख रुपये  
  • चवळी 

  • सुमारे १२० दिवसांत उत्पन्न देते 
  • एकरी उत्पादन- सात टनांपर्यंत 
  • दर- किलोला १० रुपयांपासून ४० ते ५० रू 
  • दिवाळीच्या आधी बाजारात आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने त्या काळात चांगला दर. 
  • फायदा- कारले पिकाचा बहुतांश उत्पादन खर्च कमी करते.    भेंडी 

  • सुमारे १० गुंठ्यांत. 
  • सुमारे ५५ दिवसांनी प्लॉट सुरू. 
  • दर १० रुपयांपासून ३० रुपयांपर्यंत. 
  • कारली, चवळीच्या तुलनेत कमी दर. भेंडीची काढणीही अडचणीची असल्याची समस्या. त्यामुळे पूर्वी जास्त असलेले भेंडीखालील क्षेत्र टप्‍प्याटप्‍प्याने कमी केले. 
  •  तंत्रज्ञानाचा वापर 

  • पॉली मल्चिंग 
  • एकरी सुमारे १६ हजार रुपये त्यावर खर्च 
  • त्याचे होणारे फायदे  
  • तण कमी येते. 
  • खतांची गरज कमी होते. 
  • मजुरी कमी. 
  • किडींचा त्रास कमी होतो. 
  • पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. 
  • मल्चिंगचा फायदा- दोन वर्षे त्याचा वापर होऊ शकतो.  क्रॉप कव्हर  मदनकर म्हणतात  कारले पिकासाठी मी यंदापासून वापर सुरू केला. फुलोरा येण्यापर्यंत त्याचा वापर करता येतो.  त्यानंतर परागीभवनासाठी कव्हर काढावे लागते. साधारण सहाशे मीटर्ससाठी सुमारे ३८०० रुपये खर्च येतो. बंडलापासून छोट्या पिशव्या तयार केल्या जातात. प्रती १० गुंठ्यांसाठी ६०० पिशव्यांची गरज भासते.  मिळत असलेले फायदे 

  • ‘अल्ट्रा व्हॉयलेट’ (अतिनील) किरणे व किडींना यामुळे रोखता येते. 
  • कीडनाशकांच्या सुमारे तीन फवारण्या वाचू शकतात. 
  • झाडे निरोगी राहतात. 
  • पुढील हंगामासाठीही वापर शक्य. 
  • .बाजारपेठ- मुख्यत्वे भंडारा  मार्गदर्शन-   नागपूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील प्रज्ञा गोळघाटे  कारले पिकातील खोलमारा  खोलमारा हे कारले व चवळी पिकांसाठी प्रसिद्ध असलेले गाव असल्याचे मदनकर सांगतात. गावात सुमारे ५० ते ६० शेतकरी या पिकांमध्ये आहेत. त्यातून गावचे अर्थकारण सुधारले  आहे.  मदनकर यांच्यातील गुण व गौरव 

  • भातपट्टयात जपली प्रयोगशीलता 
  • अभ्यासवृत्ती. कृषी विभागाच्या अभ्यास दौऱ्यांमार्फत विविध प्रयोगांची पाहणी. 
  • गावचे विद्यमान सरपंच. 
  • कृषी विभागामार्फत जिल्हास्तरावर कृषिमित्र पुरस्कार. मागील वर्षी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या हस्ते खासगी सोहळ्यात गौरव 
  • संघटनवृत्ती- गावातील सुमारे २० शेतकऱ्यांना एकत्र करून गटशेती. शाहू कृषक मंडळ असे त्याचे नाव. ‘आत्मा’अंतर्गत त्याची नोंदणी. गटाला शंभर एकरांवरील प्रकल्प मंजूर. त्याद्वारे भाजीपाला प्रक्रिया, दूग्ध विकासाला चालना देण्यासारखे प्रकल्प राबविण्याचे नियोजन. 
  • संपर्क- अमृत मदनकर- ९८२३४२६७११ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com