भारावलेल्या सोहळ्यात  उद्योजकांचा आनंद द्विगुणित 

पुणे : कोरोना संकटाच्या काळात अडचणींमधून राज्यातील कृषी उद्योजक वाटचाल करीत आहेत. त्यांना पाठबळ व आधाराची मोठी गरज आहे. सकाळ ॲग्रोवनतर्फे ‘बिझनेस एक्सलन्स ॲवॉर्ड २०२१ द्वारे त्यांना सन्मानित करण्यात येऊन पुढील वाटचालीस प्रोत्साहनही देण्यात आले.
अॅग्रोवन एक्सलन्स अॅवाॅर्डस, २०२१ चे पुरस्कार विजेते.
अॅग्रोवन एक्सलन्स अॅवाॅर्डस, २०२१ चे पुरस्कार विजेते.

पुणे : कोरोना संकटाच्या काळात अडचणींमधून राज्यातील कृषी उद्योजक वाटचाल करीत आहेत.  त्यांना पाठबळ व आधाराची मोठी गरज आहे. सकाळ ॲग्रोवनतर्फे ‘बिझनेस एक्सलन्स ॲवॉर्ड २०२१ द्वारे त्यांना सन्मानित करण्यात येऊन पुढील वाटचालीस प्रोत्साहनही देण्यात आले. भारावलेल्या व दिमाखदार झालेल्या या सोहळ्यात उद्योजकांनी आपले कुटुंबातील सदस्य तसेच कंपनीचा अधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्यासह उपस्थिती दर्शवून सोहळ्याचा आनंद द्विगुणित केला.          

कार्यक्रमस्थळी सायंकाळी दाखल झालेल्या उद्योजकांच्या सहकुटूबांचे औक्षण करून स्वागत  करण्यात आले. भव्य अशा कार्यक्रमाच्या हॉलमध्ये पुरस्कारार्थींच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून येत होता. सनईच्या मधुर स्वरांमुळे वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. सुसज्ज बैठक व्यवस्था असलेल्या उद्योजकांनी सेल्फी घेण्याचाही आनंद लुटला.   राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनीही मनोगत व्यक्त केले. कृषी उद्योजक तसेच शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या समजावून घेऊन त्या सोडवण्यासाठी  आमचे सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. ॲग्रोवनच्या सोळा वर्षातील कार्याचे कौतुक करण्याबरोबरच कृषी विभागातील त्रुटीही दाखवून दिल्याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला. पाठीवर थाप देऊन लढ म्हणणाऱ्या उद्योजक सम्नानार्थींचे   कृषी क्षेत्रात काम करताना मार्गदर्शन घेतले जाईल असेही ते म्हणाले. सरकारने सुरू केलेल्या विविध योजना, सुधारणा आदींचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला. सकाळ माध्यम समुहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी मनोगत व्यक्त करताना शेतीचे अर्थशास्त्र, शिक्षण, नवे तंत्रज्ञान यांचा आढावा घेतला. उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी सरकारने मदत करावी. शिक्षण पद्धतीत बदल करून तरुण उद्योजक म्हणून घडण्यासाठी व्यावहारिक पध्दतीचे प्रशिक्षण द्यायला हवे अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या. समाजातील चांगल्या गोष्टी स्वीकाराव्या लागतील. त्यातूनच आपण पुढे जाणार आहे. संशोधन, प्रयोगशीलता नसेल तर व्यवसाय पुढे जाणार नाही असेही ते म्हणाले.  ॲग्रोवनचे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. यामध्ये ॲग्रोवनचा सतरा वर्षांचा आढावा घेताना हे दैनिक वेगवान दमाने वाटचाल करीत असल्याचे सांगितले. सर्वात मोठी उद्योजकता महाराष्ट्रात असल्याने राज्यात, देशातच नव्हे तर परदेशातही आपले कृषी उद्योजक उत्पादनांची निर्यात करीत असल्याचे सांगून त्यांचे कौतुक केले.  सिनेमासृष्टीतील पुरस्कार सोहळ्यांप्रमाणे रंगतदार आयोजन करून कृषी उद्योजक व प्रयोगशील शेतकऱ्यांना ॲग्रोवनतर्फे पुरस्कार देऊन गौरवण्यात येते याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.  

कार्यक्रमात भरली रंगत  कार्यक्रमात निवेदक योगेश सुपेकर यांनी विविध मान्यवर व ज्येष्ठ राजकीय नेत्यांच्या आवाजाची, बोलण्याच्या शैलीची हुबेहुब नक्कल करून कार्यक्रमात हास्याची लकेर पेरली. उपस्थित उद्योजकांनीही टाळ्या वाजवून मनापासून दाद दिली. प्रत्येकवेळी तुतारी वाजवून मानवंदना व संगीताच्या गजरात सर्व पुरस्कारार्थींना सन्मानित करण्यात आले. अनेक उद्योजक व त्यांचे सहकारी सोहळ्यातील क्षण आपल्या मोबाईलमध्ये आवर्जून टिपून घेताना दिसत होते. विजयश्री इव्हेंटसचे निखील निगडे यांच्या सहकार्याने पार पडलेल्या या कार्यक्रमात आपल्या भारदस्त व बहारदार आवाजात योगेश सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले. 

‘ॲग्रोवन बिझनेस एक्सलन्स ॲवॉर्ड्स चे मानकरी 

  • कोठारी ग्रुपचे उज्ज्वल कोठारी,
  • ओम गायत्री नर्सरीचे मधुकर गवळी,
  • मल्टिलाइन ॲग्रो इंडस्ट्रीजचे मिलिंद बर्वे,
  • ऋषी ॲग्रो रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट सेंटरचे मारुती चव्हाण  
  • धनश्री क्रॉप सोल्यूशन्सचे महेश दामोदरे,
  • बायोकेअर इंडियाचे डॉ. सुहास बुद्धे, 
  • आर..एम.फॉस्फेट्‍स अँड केमिकल्सचे विनीत जैन,
  • टीएस ऑर्गो ऑर्गेनिकचे सूर्यभान ठाकरे, 
  • जीएनपी ॲग्रो सायन्सेसचे गौतम पाटील,
  • जी.के.प्लॅस्टिकच्या विजया गारुडकर   
  • कन्हैया ॲग्रोचे मच्छिंद्र लंके,
  • ईश्‍वेद समुहाचे संजय वायाळ,
  • महापीक फर्टिलायझर्स इंडियाचे सुहास कचरे,
  • सुमीत टेक्नॉलॉजीजचे संजय पाटील,
  • गोदावरी ॲग्रो स्प्रेअर्सचे ज्ञानेश्वर भुसे,
  • युनिव्हर्सल बायोकॉनचे विश्‍वास सोंडकर,
  • क्रेंटा केमिकलचे राजाराम येवले, 
  • पवन ॲग्रो चे लक्ष्मणराव काळे,
  • सह्याद्री ॲग्रोव्हेटचे नितीन हासे, 
  • अंकुर रोपवाटिकाचे तेजराव बारगळ,
  • ग्रीन व्हीजन लाइफ सायन्सेसचे डॉ. सतीलाल पाटील,  
  • मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे डॉ. विश्‍वजित मोकाशी  
  • भुदरगड नॅचरल फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे बाळासाहेब सोळांकुरे-पाटील, 
  • स्तिल इंडियाचे परिंद प्रभुदेसाई,
  • एस के बायोबीझचे अभय मस्के,
  • अथर्व हायटेक नर्सरीचे किरण शेवाळे,
  • सक्सेस बीज सायन्सचे अमोल मवाळ,
  • अशोका ॲग्रोफर्टचे सतीश पाटील.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com