ॲग्रोवन कृषी प्रदर्शन : मधमाशी उद्यानात शेतकऱ्यांचे मोहोळ

ॲग्रोवन कृषी प्रदर्शन : मधमाशी उद्यानात शेतकऱ्यांचे मोहोळ
ॲग्रोवन कृषी प्रदर्शन : मधमाशी उद्यानात शेतकऱ्यांचे मोहोळ

औरंगाबाद : जगातील अन्नधान्य उत्पादनात अतुलनीय योगदान देणाऱ्या मधमाशीला मानाचे स्थान मिळवून देणारे ‘बसवंत मधमाशी उद्यान’ ॲग्रोवनच्या कृषी प्रदर्शनात तयार केले आहे. त्यामध्ये मधमाशीची सचित्र माहिती तसेच आदर्श सेवरगाव रंजक पद्धतीने मांडले आहे. ते पाहताना शेतकरी आणि शहरातील आबालवृद्ध हरवून जात आहेत. शेतकरी, महाविद्यालयीन, तसेच शालेय विद्यार्थी आणि शहरवासीयांपर्यंत कृषी क्षेत्रातील मधमाशीचे स्थान पोचवण्यासाठी ‘पूर्वा केमिकल्स’ समूहाच्या ग्रीनझोन ॲग्रोकेम प्रा.लि. कंपनीने नाशिकच्या निफाड भागातील मुखेड येथे मधमाशी उद्यान व प्रशिक्षण केंद्र उभारले आहे. त्याचीच एक प्रतिकृती म्हणून अॅग्रोवनच्या प्रदशर्नामध्ये मधमाशी उद्यान तयार केले आहे. त्यात मधमाशीची उपयुक्तता, मधमाश्यांच्या पेट्या, वसाहती, वसाहतींची हाताळणी, राणीमाशीचे संगोपन, मधाची काढणी आणि संपूर्ण प्रक्रियेबद्दल सचित्र माहिती दिली जाते. निसर्गातील मधमाश्यांची आवश्यकता जाणून, त्यांच्या संवर्धनासाठी कीटकनाशकांचा वापर अत्यंत काटेकोर आणि काळजीपूर्वक करण्याचा संदेश शेतकऱ्यांपर्यंत पोचवला जात आहे. कारण मधमाशी आणि वनस्पतीमधील सहजीवन मानवासह वन्यजीवांसाठी अन्नाची उपलब्धता करते.

शेतकऱ्यांपर्यंत हा विषय अत्यंत गांभीर्याने पोचवला जात आहे. अनेक जागरूक शेतकरीही बारकाईने माहिती जाणून घेत असल्याचे दिसून येत होते. माहिती व मध चाखण्याच्या संधीसोबत ४०० रुपये किलोप्रमाणे मध खरेदीचा आनंदही अनेकजण घेत होते.

“मधमाशीचा प्रसार करण्यासाठी आम्ही बसवंत मधमाशी उद्यानाची स्थापना केली आहे. येथे केवळ माहितीच नव्हे तर मधमाशीचे प्रशिक्षणदेखील दिले जाते. मधमाशीमुळे जैविक शेतीला चालना मिळेल. रासायनिक शेतीकडून पर्यावरणपूरक शेतीकडे शेतकरी वळावे, असा हेतू या उपक्रमामागे आहे,” अशी माहिती ग्रीनझोन ॲग्रोकेम कंपनीच्या सूत्रांनी दिली. आदर्श सेवरगाव या उद्यानाशेजारीच सेवरगाव साकारले असून, आदर्श गावांची संकल्पना अधिक सुस्पष्टपणे मांडण्यात आली आहे. या आगळ्यावेगळ्या गावातून कृषिकेंद्रित ग्रामविकासाचा प्रभावशाली संदेश पोचवला जात आहे. शेतीशिवाय गावाचा विकास नाही; मात्र प्रकिया प्रकल्पांशिवाय शेती परवडणारी नाही. अशी शिकवण देतानाच जलसमृद्धी, उद्योग-व्यवसाय, प्रक्रिया उद्योग, मधमाशी पालन, उद्योजकता विकास अशा मुद्द्यांना सेवरगावमध्ये प्राधान्य दिले गेले आहे. येथील बसवंत बेदाण्याची चव घेत खरेदीलाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com