आज महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीतील समस्या वाढत आहेत.
इव्हेंट्स
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : यंत्रे, अवजारे वेधताहेत शेतकऱ्यांचे लक्ष
औरंगाबाद ः मजुरांच्या समस्येवर मात करण्यासाठी अनेक शेतकरी कृषी यांत्रिकरणावर भर देत आहेत. अॅग्रोवन कृषी प्रदर्शनामध्ये यंदा कृषी यांत्रिकीकरण दालनामध्ये विविध प्रकारची यंत्रे, औजारे, सुटे भाग उपलब्ध आहेत. अवजारे आणि यंत्राबाबत माहिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.
औरंगाबाद ः मजुरांच्या समस्येवर मात करण्यासाठी अनेक शेतकरी कृषी यांत्रिकरणावर भर देत आहेत. अॅग्रोवन कृषी प्रदर्शनामध्ये यंदा कृषी यांत्रिकीकरण दालनामध्ये विविध प्रकारची यंत्रे, औजारे, सुटे भाग उपलब्ध आहेत. अवजारे आणि यंत्राबाबत माहिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.
प्रदर्शनामध्ये विविध अवजारे उत्पादक कंपन्यांची दालने असून, त्यामध्ये लहान, मध्यम, मोठ्या शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील, अशी कृषी यंत्रे, अवजारे मांडण्यात आली आहेत. या दालनामध्ये शेतकरी त्यांच्या वापराची माहिती जाणून घेत आहेत. यंत्रामध्ये मशागतीसह पेरणीयंत्राचे स्वयंचलित, ट्रॅक्टरचलित, बैलचलित असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. टॅक्टरचलित यंत्रांमध्ये दोन फरो रेझर, काकरी पेरणी यंत्र, एक फाळी व दोन फाळी पलटी नांगर, काकरी यंत्र, दोन फाळ बार पॉईंट नांगर, व्ही पास, लेव्हलिंग ब्लेड, पंजी यंत्र, सहा बैली नांगर, सरी नांगर, चार बैली नांगर, हेवी नांगर, सारा यंत्र यांचा समावेश आहे. विविध प्रकारची ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्रे, रोटाव्हेटर, बीबीएफ पेरणी यंत्रासोबतच मनुष्यचलित एक आणि दोन फणी टोकन पेरणी यंत्र, तीन आणि चार फणी बैलचलित टोकण पेरणी यंत्र, मिनी ट्रॅक्टर चलित टोकण पेरणी यंत्र, तीन आणि चार फणी पॉवर टिलर चलित टोकण पेरणी यंत्र, ट्रॅक्टर चलित सहा ते नऊ फणी टोकण पेरणी यंत्र, स्पेशल कांदा टोकण पेरणी यंत्र, रोटो प्लॅंटर, नो सीड टिलर, व्हायब्रो सब सॉयलर, डबल पलटी हायड्रोलिक नांगर, नऊ दाती ॲडजेस्टेबल कल्टीवेटर येथे पाहता येतो. कडबा कुट्टी यंत्र, कपाशीची पऱ्हाटी, हत्ती घास, मका, बाजरी, उभी ज्वारीचे बारीक तुकडे करण्यासाठी उपयुक्त श्रेडर, उसाची पाचट, गव्हाचे तणकुट्टी साठी उपयुक्त रोटरी मल्चर, फळबागेमध्ये रोपांच्या लागवडीसाठी किंवा खांब उभे करण्यासाठी होल डिगर येथे ठेवला आहे. ऊस, भात आणि गहू पिकातील काडी कचरा गोळा करण्यासाठी स्वेकर बेलर, उभ्या ब्लेडने कडक जमिनीची जास्त खोल मशागत करण्यासाठी रोटरी नांगरही उपयुक्त आहेत. कमी खर्चात अगदी सोप्या पद्धतीने फवारणी करण्यासाठी हाय क्लियरेंस बूम स्पेयर पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. या अनेकविध यंत्रासह मिनी ट्रॅक्टरपासून मोठ्या ट्रॅक्टरपर्यंत आणि अगदी मोठ्या खोदकामासाठीच्या जेसीबीसारख्या यंत्रापर्यंत दालने गर्दीने वाहत आहेत.
फवारणी आणि पूरक उद्योगाची यंत्रे
सध्या पीक संरक्षणासाठी आवश्यक यंत्रांची मागणी वाढत आहे. या दालनांमध्ये नॅपसॅक, पॉवर स्प्रे पंप, बॅटरीवरील फवारणी पंप यासोबत अत्याधुनिक स्प्रे युनिट उपलब्ध आहेत. कडब्याची नासाडी कमी करण्यासाठी कडबा कुट्टी यंत्रे, शेती पुरक व्यवसायासाठी विविध प्रकारच्या पिठाच्या गिरण्या, रसवंती यंत्रे आदींचाही दालनामध्ये समावेश आहे.
- 1 of 5
- ››