आज महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीतील समस्या वाढत आहेत.
इव्हेंट्स
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : पारस, एमव्हीएस ॲक्मे, महाफिड च्या स्टाॅलवर गर्दी
पारस ग्रुपच्या स्टॉलवर शेतकऱ्यांची गर्दी
पारस ग्रुपच्या स्टॉलवर शेतकऱ्यांची गर्दी
ॲग्रोवनच्या प्रदर्शनात पारस ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या स्टॉलवर पीव्हीसी पाइप, ड्रिप आणि शेती अवजार उत्पादनांची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. “ड्रिप, पीव्हीसी, यूपीव्हीसी, सीपीव्हीसी, नांगर फाळ, चाप कटर, वॉटर टॅंक, बोअरवेलचे कॉलमपाइप, एचडीपीई पाइप अशा उत्पादनांची माहिती विचारणारे शेतकरी जास्त आहेत. ग्रामीण भागातील समस्या सांगत काही तरुणांनी आम्हाला नव्या उत्पादनासाठी आग्रहदेखील केला. ही बाब तरुण शेतकऱ्यांमध्ये उत्साह दर्शविणारी आहे,” असे कंपनीचे बिजनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह सोमनाथ घोरतळे यांनी सांगितले.
कृषी उत्पादनाची माहिती देण्यासाठी श्री. घोरतळे यांच्यासह श्रेयस देखणे, सुनील जाधव हे शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. बाजारामध्ये शेती उत्पादनात अनेक कंपन्या अप्रमाणित उत्पादने आणण्यासाठी क्लृप्त्या लढवत असताना शेतकऱ्यांसाठी पारस कंपनी दर्जेदार उत्पादनाची उपलब्धता करून देत आहे. या उत्पादनाची माहिती देताना आम्हाला आनंद वाटतो, असेही श्री. घोरतळे यांनी नमूद केले.
‘एमव्हीएस ॲक्मे’कडून शेततळ्यासाठी कूपन
दुष्काळी स्थितीमध्ये पाण्याचे मोल सांगावे लागत नाही. अनेक शेतकरी शेततळ्याच्या माध्यमातून पाणी टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. शेततळ्यासाठी दर्जेदार शेततळे कापड पुरवणाऱ्या एमव्हीएस ॲक्मे टेक्नॉलॉजिज् या कंपनीच्या स्टॉलवर शेतकरी मोठ्या संख्येने माहिती घेत होते. एमव्हीएसच्या पॉंडलायनर मार्केटिंग विभागाचे मॅनेजर योगेश रेपाळे म्हणाले की, “आमचे १५ कर्मचारी शेततळ्याविषयी सतत माहिती देत आहेत. शेतकऱ्यांची ज्ञानाची भूक मोठी आहे. प्रामुख्याने शेततळ्याच्या कापडाचा दर्जा आणि त्यासाठी उपलब्ध अनुदानाची माहिती शेतकरी सातत्याने विचारत आहेत.” कंपनीच्या स्टॉलवर शेततळ्याच्या कागदाचे नमुने, तांत्रिक माहिती तसेच पाच हजाराचे गिफ्ट कूपन ही देण्यात येते. या कुपनावर शेतकऱ्याला शेततळ्याच्या कागद खरेदीवर सूट दिली जाते. शेततळे, कॅनॉल लाईन, कृत्रिम तलाव, मत्स्यपालन तलाव आणि खाऱ्या पाण्याच्या तलावासाठी अॅक्मेमॅट कागद वापरला जातो.
महाफिडकडून मिळतेय संपूर्ण पीकपोषणाची माहिती
संपूर्ण पीकपोषणाची माहिती घेण्यासाठी महाफिड फर्टिलायझर्सच्या स्टॉलवर शेतकरी आवर्जून भेट देत आहेत. महाब्लुस्टर, महाब्लूम, महानायट्रेट, महापोटॅश, मल्टीफॉस, महामॅग्नम, मल्टीकॅन, एफ फ्रुट्स अशी १०० टक्के विद्राव्य (फर्टिगेशन) खते येथे शेतकऱ्यांना बघण्यास मिळतात. याशिवाय महाग्रीन, महाफ्लोरा, महाफ्रूट अशी विद्राव्य फवारणीची खतेही मांडण्यात आलेली आहेत. जैविक ताण सहन करणारे घटकदेखील टाकण्यात आलेले आहेत. चिलेटेड स्वरूपातील मिक्सॉल हे मिश्र सूक्ष्म अन्नद्रव्य खत येथे उपलब्ध असून इतर चिलेटेड खतांच्या मालिकेची माहिती महाफिडच्या प्रतिनिधींकडून दिली जाते. फळ गुणवत्ता वाढविणारी विशेष द्रवरुप पीक पुरक, फळ आरोग्य सुधारक, फळांचे आकार व रंगवर्धक याशिवाय नैसर्गिक दाणेदार पीकवर्धक व भूसुधारकांची माहिती महाफिडच्या स्टॉलवर मिळते. जमिनीतील क्षार सुधारक, पाणी पीएच नियंत्रक, जैववर्धके याविषयीदेखील शेतकरी उत्सुकतेने तांत्रिक माहिती घेत असल्याचे कंपनीच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले.
फोटो गॅलरी
- 1 of 5
- ››