Agriculture story in marathi agrowon exhibition 2019 | Agrowon

कृषी विद्यापीठाने मांडले एकात्मिक शेतीचे मॅाडेल

टीम ॲग्रोवन
रविवार, 29 डिसेंबर 2019

औरंगाबाद ः प्रदर्शनामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या दालनामध्ये शेती अधिक फायदेशीर करणारे एकात्मिक शेतीचे मॉडेल मांडण्यात आले आहे. त्यासोबत विहीर पुनर्भरणाचे प्रारूप, गुलाबी बोंड अळी आणि हुमणीसारख्या नुकसानकारक ठरणाऱ्या किडींचे व्यवस्थापन याबाबत माहिती देण्यात येत आहे. येथे विद्यापीठाने संशोधित केलेले विविध पिकांच्या विविध जाती मांडल्या असून, त्यांची वैशिष्‍ट्ये सांगितली जात आहेत.

औरंगाबाद ः प्रदर्शनामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या दालनामध्ये शेती अधिक फायदेशीर करणारे एकात्मिक शेतीचे मॉडेल मांडण्यात आले आहे. त्यासोबत विहीर पुनर्भरणाचे प्रारूप, गुलाबी बोंड अळी आणि हुमणीसारख्या नुकसानकारक ठरणाऱ्या किडींचे व्यवस्थापन याबाबत माहिती देण्यात येत आहे. येथे विद्यापीठाने संशोधित केलेले विविध पिकांच्या विविध जाती मांडल्या असून, त्यांची वैशिष्‍ट्ये सांगितली जात आहेत.

बदलत्या हवामान परिस्थितीत शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळण्याच्या उद्देशाने परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल विकसित केले आहे. संरक्षित सिंचनासाठी शेततळ्यातील पाण्याचा पुनर्वापर करण्याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना आकर्षित करत आहे. गुलाबी बोंड अळी, हुमणी, मक्यावरील लष्करी अळी अशा या वर्षी अधिक नुकसानकारक ठरलेल्या किडींच्या एकात्मिक व्यवस्थापनाची माहिती देण्यात येत आहे.
कृषी विज्ञान केंद्राच्या दालनावर राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाअंतर्गंत तयार केलेली ट्रायकोकार्ड, कृषी दैनंदिनी, विद्यापीठाने विकसित केलेले ज्वारी, बाजरी, करडई, जवस यांचे वाण उपलब्ध करण्यात आले असल्याची माहिती समन्वयक डॉ. किशोर झाडे यांनी दिली. . जालना जिल्ह्यातील खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या दालनामध्ये समन्वयक डॉ.एस. व्ही. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विस्तार, शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. त्यांच्या दालनामध्ये रेशीम शेती, हळद पावडर निर्मिती, भाजीपाला पिकांची रोपनिर्मिती, सुगंधी गवत लागवड तंत्रज्ञान, बांबू लागवड तंत्रज्ञान आदी माहिती शेतकरी जाणून घेत आहेत.
 


इतर ताज्या घडामोडी
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८... सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...
कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा...पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या...
अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा...जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी...
राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण...नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण...
डाळिंब अंबिया बहरातील कीड- रोग...डाळिंब बागेत विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या...
कोरोनाबाबत डाॅ. सिंग यांनी सूचवलेला...नांदेड : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी माजी पंतप्रधान...
कोरोना व्हॅक्सिनसाठी वयाची अट शिथिल...कोल्हापूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच...
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगामपुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या...
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे ...चंद्रपूर : प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या...
पुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी...पुणे : गेल्या दीड महिन्यापासून उन्हाच्या झळा...
कोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन...नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक परिस्थिती...
पालखेडच्या आवर्तनाने शेतीसह पिण्याच्या...येवला, जि. नाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून...