कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
इव्हेंट्स
कृषी विद्यापीठाने मांडले एकात्मिक शेतीचे मॅाडेल
औरंगाबाद ः प्रदर्शनामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या दालनामध्ये शेती अधिक फायदेशीर करणारे एकात्मिक शेतीचे मॉडेल मांडण्यात आले आहे. त्यासोबत विहीर पुनर्भरणाचे प्रारूप, गुलाबी बोंड अळी आणि हुमणीसारख्या नुकसानकारक ठरणाऱ्या किडींचे व्यवस्थापन याबाबत माहिती देण्यात येत आहे. येथे विद्यापीठाने संशोधित केलेले विविध पिकांच्या विविध जाती मांडल्या असून, त्यांची वैशिष्ट्ये सांगितली जात आहेत.

बदलत्या हवामान परिस्थितीत शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळण्याच्या उद्देशाने परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल विकसित केले आहे. संरक्षित सिंचनासाठी शेततळ्यातील पाण्याचा पुनर्वापर करण्याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना आकर्षित करत आहे. गुलाबी बोंड अळी, हुमणी, मक्यावरील लष्करी अळी अशा या वर्षी अधिक नुकसानकारक ठरलेल्या किडींच्या एकात्मिक व्यवस्थापनाची माहिती देण्यात येत आहे.
कृषी विज्ञान केंद्राच्या दालनावर राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाअंतर्गंत तयार केलेली ट्रायकोकार्ड, कृषी दैनंदिनी, विद्यापीठाने विकसित केलेले ज्वारी, बाजरी, करडई, जवस यांचे वाण उपलब्ध करण्यात आले असल्याची माहिती समन्वयक डॉ. किशोर झाडे यांनी दिली. . जालना जिल्ह्यातील खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या दालनामध्ये समन्वयक डॉ.एस. व्ही. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विस्तार, शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. त्यांच्या दालनामध्ये रेशीम शेती, हळद पावडर निर्मिती, भाजीपाला पिकांची रोपनिर्मिती, सुगंधी गवत लागवड तंत्रज्ञान, बांबू लागवड तंत्रज्ञान आदी माहिती शेतकरी जाणून घेत आहेत.