Agriculture story in marathi agrowon exhibition 2019 | Agrowon

जादा उत्पन्नासाठी शेतमालाचे मूल्यवर्धन गरजेचे : गीताराम कदम

टीम अॅग्रोवन
रविवार, 29 डिसेंबर 2019

औरंगाबाद ः शेतीमालाच्या उत्पादनामध्ये जितकी काळजी घेतो, तितकीच किंबहुना त्यापेक्षा अधिक काळजी काढणीनंतर घेतली पाहिजे. शेतमालाचे मूल्यवर्धन प्रतवारी आणि पुढील प्रक्रियेतूनच साधू शकते. अगदी नियमित भाज्यांच्या निर्जलीकरणातूनही चांगले पैसे मिळू शकतात. कोणत्याही शेतमालासाठी ब्रॅड महत्त्वाचा असून, शेतकऱ्यांनी एकत्र येत विपणन साखळी उभी करणे गरजेचे असल्याचे मत पुणे जिल्ह्यातील न्हावरे येथील प्रक्रिया उद्योजक गीताराम कदम यांनी व्यक्त केले. सकाळ ॲग्रोवनतर्फे आयोजित कृषी प्रदर्शनामध्ये शेतमाल प्रक्रिया उद्योग या विषयावर कदम बोलत होते.

औरंगाबाद ः शेतीमालाच्या उत्पादनामध्ये जितकी काळजी घेतो, तितकीच किंबहुना त्यापेक्षा अधिक काळजी काढणीनंतर घेतली पाहिजे. शेतमालाचे मूल्यवर्धन प्रतवारी आणि पुढील प्रक्रियेतूनच साधू शकते. अगदी नियमित भाज्यांच्या निर्जलीकरणातूनही चांगले पैसे मिळू शकतात. कोणत्याही शेतमालासाठी ब्रॅड महत्त्वाचा असून, शेतकऱ्यांनी एकत्र येत विपणन साखळी उभी करणे गरजेचे असल्याचे मत पुणे जिल्ह्यातील न्हावरे येथील प्रक्रिया उद्योजक गीताराम कदम यांनी व्यक्त केले. सकाळ ॲग्रोवनतर्फे आयोजित कृषी प्रदर्शनामध्ये शेतमाल प्रक्रिया उद्योग या विषयावर कदम बोलत होते.

श्री. कदम म्हणाले की, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडण्यासाठी प्रक्रिया उद्योग महत्त्वाचे ठरणार आहेत. यातून शेतीमालाला दर मिळण्यासोबत अन्य लोकांना रोजगारही उपलब्ध होतील. धान्याची स्वच्छता, प्रतवारी करून विक्री करावी. शेतकऱ्यांनीही व्यापारी दृष्टिकोनातून विचार करायला शिकले पाहिजे. आपल्याला शेतमालाचा भाव ठरवता येत नाही. ही बाब अर्धवट सत्य आहे. कारण शेतमालाची स्वच्छता आणि प्रतवारी केल्यास दर्जानुसार दर मागता येतो. त्यातही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या उत्पादनासाठी स्वतःचा ब्रॅड विकसित करावा. आपली वेगळी विपणन साखळी निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. आपल्याकडे विजेची समस्या सातत्याने जाणवते. त्यावर मात करण्यासाठी पवनचक्की आणि सौरऊर्जा अशा पर्यायांचा विचार करावा.

अगदी नाशवंत मानल्या जाणाऱ्या भाजीपाल्यावर प्रक्रिया केल्यास चौपट दर मिळतो. निर्जलीकरण केलेल्या भाजीपाल्यात पोषणमूल्य अधिक असते. आपल्या शेतामधील किमान ७० टक्के भाजीपाला प्लॅस्टिक डोममध्ये वाळवून त्याची योग्य दर मिळताच विक्री करावी. मूल्यवर्धन होईल. स्वच्छता -प्रतवारी, पवन ऊर्जा आणि सौरऊर्जाचा संयुक्त वापर, निर्जलीकरण हे माॅडेल शेतकऱ्यांना उद्योजक बनवू शकेल. शेतकऱ्याला किमान एकरी एक लाख रुपये उत्पन्न मिळेल, असे नियोजन करावे. शेवग्याच्या शेंगांपेक्षा पानालाही मागणी आहे. ती चांगल्या प्रकारे वाळवून विक्री केल्यास शेंगांपेक्षा अधिक फायदा होऊ शकतो. कमी पाण्यावर येणारा शेवगा अनेक ठिकाणी उसापेक्षा अधिक उत्पन्न देऊ शकतो. एकरी एक लाखाचे उत्पन्न मिळू शकते. शेतकऱ्यांना विकण्याची सवय लागली पाहिजे. आपल्या वाटचालीमध्ये ॲग्रोवनचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर गीताराम कदम यांनी शेतकऱ्यांच्या प्रक्रिया उद्योगातील प्रश्न व शंका यांचे समाधान केले. पुरस्कारप्राप्त राजू घोडके या शेतकऱ्याने प्रातिनिधिक विचार व्यक्त केले.

युवा शेतकरी पुरस्कार

या चर्चासत्रादरम्यान ॲग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण, मराठवाडा आवृत्तीचे कार्यकारी संपादक संजय वरकड आणि गीताराम कदम यांच्या हस्ते ॲग्रोवन युवा शेतकरी सन्मान पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्यामध्ये संदीप करपे (जवळा, जि.बीड), अपर्णा विलास एस्के (नागापूर, जि.बीड), शरद चव्हाण (हातोला, जि.बीड), अण्णासाहेब जगताप (सावरगाव, जि.बीड), राजेंद्र जाधवर (सावरगाव, जि.बीड), पाराबाई मारग (कडेगाव, जि.बीड), दीपक बुनगे (रामगव्हाण, जि.जालना), शिवाजी घाडगे (शिवणी, जि.जालना), जयकिसन शिंदे (वरुडी, जि.जालना), राजू घोडके (डोणगाव, जि.जालना). 


फोटो गॅलरी

इतर इव्हेंट्स
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : अद्ययावत...औरंगाबाद ः ‘‘‘सकाळ-ॲग्रोवन’ने आयोजित केलेल्या...
नैसर्गिक शेतीची पंचसूत्री अमलात आणा :...औरंगाबाद ः माती, पाणी, जातिवंत बियाणे, पीक नियोजन...
मधमाशीपालन उद्योगात तरुणांना संधी -संजय...औरंगाबाद ः महाराष्ट्रात मधमाशी पालन उद्योगास...
अॅग्रोवन’ कृषी प्रदर्शनास अलोट गर्दी...औरंगाबाद : २६ लाखांच्या अजस्त्र ‘बॅक हो लोडर’...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : शेतकऱ्यांचा...औरंगाबाद ः माती आणि पाणी परीक्षणाविषयी...
जादा उत्पन्नासाठी शेतमालाचे मूल्यवर्धन...औरंगाबाद ः शेतीमालाच्या उत्पादनामध्ये जितकी काळजी...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : पारस, एमव्हीएस...पारस ग्रुपच्या स्टॉलवर शेतकऱ्यांची गर्दी ...
कृषी विद्यापीठाने मांडले एकात्मिक...औरंगाबाद ः प्रदर्शनामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा...
कृषी विभागाच्या दालनावर योजनांसह कीड-...औरंगाबाद ः कृषी प्रदर्शनामध्ये जिल्हा परिषदेचा...
पायाभूत सुविधा दिल्यास कर्जमाफीची गरज...औरंगाबाद : कर्जमाफी झाली तरी पुढच्या हंगामात...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : यंत्रे, अवजारे...औरंगाबाद ः मजुरांच्या समस्येवर मात करण्यासाठी...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन :शेतकरी गट, बचत...औरंगाबाद ः सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेली...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : नवे तंत्रज्ञान...सकाळ - ॲग्रोवनच्या वतीने आयोजित भव्य कृषी...
पोपटराव पवार यांच्या हस्ते आज उद्‍घाटन औरंगाबाद: ‘सकाळ ॲग्रोवन’च्या भव्य कृषी...
औरंगाबाद येथे २७ पासून ॲग्रोवन कृषी...पुणे  : शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान व माहितीचा...
एकात्मिक कीडरोग व्यवस्थापनातून...नाशिक : पॉलिहाउस मध्ये वर्षानुवर्ष एकच पीक...
जलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...
शाश्वतता, जागतिक दर्जा, विस्तारीकरण ...पुणे ः कोणताही उद्योग शाश्वत असायला हवा, तुमची...
‘सकाळ रिलीफ फंडा’ची पूरग्रस्तांना एक...पुणे ः कोल्हापूर, सांगली, सातारा भागांत...
पाणी व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यास...नाशिक : जमिनीची सुपीकता वाढवण्याबरोबर योग्य पाणी...