आज महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीतील समस्या वाढत आहेत.
इव्हेंट्स
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : शेतकऱ्यांचा माती, पाणी अभ्यासाकडे कल..
औरंगाबाद ः माती आणि पाणी परीक्षणाविषयी शेतकऱ्यांना माहिती असले तरी ते करण्यासाठी प्रयोगशाळा फारशा उपलब्ध होत नाहीत. अशा वेळी सकाळ अॅग्रोवनच्या कृषी प्रदर्शनात एमआयटीने खास फिरती प्रयोगशाळाच आणली आहे. शेतकऱ्यांना माती, पाणी, पाने व देठ परीक्षणाविषयी माहिती आणि शंका समाधान या प्रयोगशाळेच्या माध्यमातून उपलब्ध झाले आहे.

या प्रदर्शनात एमआयटी- कार्स यांच्या वतीने माती, पाणी, खते, पान व देठ परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शनात उपलब्ध करून देण्यात आली. प्रयोगशाळेचे प्रमुख व एमआयटीचे उपसंचालक प्रा. डॉ. दीपक बोरनारे यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल निकम व नागेश ब्रह्मनाथकर हे प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना माती व पाणी परीक्षणाच्या अनुषंगाने महत्त्वाच्या बाबी समजावून सांगत आहेत. माती परीक्षणाचा उपयोग काय, माती परीक्षण का करावे, मातीचा नमुना केव्हा, कसा घ्यावा, मातीच्या नमुन्यासोबत पिशवीत नेमकी काय माहिती द्यावी, पाणी तपासणी का करावी व पाण्याचा नमुना कसा घ्यावा, याबाबतचे शंका समाधान केले जात आहे. त्याचप्रमाणे एमआयटी प्रयोगशाळेत नेमकी तपासणी करण्याची पद्धती कशी असते, याचीही माहिती दिली. राज्यभरातील जवळपास एक हजारावर शेतकऱ्यांनी प्रयोगशाळेला प्रत्यक्ष भेट दिली असून, पुढील काळात माती व पाणी तपासणी करण्याचे कॅम्प आयोजित करण्याचे नियोजन करत असल्याची माहिती निकम यांनी दिली.
- 1 of 5
- ››