मधमाशीपालन उद्योगात तरुणांना संधी -संजय पवार यांचे मत

पूर्वा केमटेकचे व्यवस्थापकीय संचालक संजय पवार बोलताना.
पूर्वा केमटेकचे व्यवस्थापकीय संचालक संजय पवार बोलताना.

औरंगाबाद ः महाराष्ट्रात मधमाशी पालन उद्योगास भरपूर संधी आहेत. गावागावातील तरुणांनी मधमाशीप्रमाणे कामाची विभागणी करुन काम केले तर मधुक्रांती शक्य आहे, असे प्रतिपादन पूर्वा केमटेकचे व्यवस्थापकीय संचालक संजय पवार यांनी केले. अॅग्रोवनतर्फे आयोजित कृषी प्रदर्शनामध्ये मधमाशी पालन एक पुरक उद्योग या विषयावर परिसंवादामध्ये श्री. पवार आणि मधीमाशीपालक शेतकरी नानासाहेब इंगळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी श्री. पवार बोलत होते. ते म्हणाले मधमाशी उद्योगास भारतातील मधाचे उत्पादन 1.25 लाख टन आहे. एकट्या 30 टक्के उत्पादन पंजाबमध्ये होते. फक्त 1 ते 2 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. मधमाशी पालनाची भिती, जाणीव जागृती नाही. त्यामुळे हा प्रश्न आहे. जास्त तापमानात मधमाशी तग धरु शकत नाही. या उद्योगात परागीभवन खूप महत्वाचे आहे. हिमाचल प्रदेशात एक लाख हेक्टर सफरचंद लागवड आहे. परागीभवनासाठी मधमाश्यांची गरज आहे. परागीभवनासाठी मधपेट्या वापरल्या जातात. शेतक-यांनी एकत्र येऊन मधमाशीपालन सुरु करावे लागेल. राज्यात किमान एक लाख मधपेट्या लागतील. मधमाशी पालक हा शेतकरी उद्योजक आहे. प्रशिक्षण घेऊनच मधमाशी पालन सुरु करावे. तरुणांना त्यात सर्वाधिक संधी आहे. एक गाव- एक ब्रॅड हि संकल्पना खूप महत्वाची आहे. तरुण शेतक-यांनी गटाने एकत्रित येऊन एका गावात किमान 500 मधपेट्या ठेवाव्यात. या उद्योगासाठी शेवगा, आवळा, सूर्यफूल, बाजरी, मका, मोहरी, तीळ, कोथिंबिर, तूर, वाल या पीकांची लागवड करणे अनिवार्य आहे, असेही ते म्हणाले.   मधमाशी उद्योग वाढीसाठी सूर्यफुल, करडई लागवडीसाठी प्रोत्साहनाची गरज ःइंगळे   याच चर्चासत्रात देऊळगावसिध्दी (जि.नगर) येथील मधमाशीपालक उद्योजक नानासाहेब इंगळे यांनीही मार्गदर्शन केले. ते म्हणाले, महाराष्ट्रात मधमाशीपालन उद्योगाचा विस्तार होत आहे. पोकरा अंतर्गंत मधमाशी उद्योगाचा समावेश असल्यामुळे यासाठी अनुदान मिळू शकते. खादी ग्रामउद्योग महामंडाळामार्फत यासाठी प्रशिक्षण दिले जाते. शेतक-यांच्या उत्पन्न वाढीसाठी हा उद्योग महत्वाचा ठरत आहे. सूर्यफुलाची लागवड कमी झाल्यामुळे मधाचे उत्पादन घटले. त्यामुळे सूर्यफुलाचे लागवड क्षेत्र वाढवावे लागणार आहे. शासनाने सूर्यफूल, करईड या तेलबिया पीकांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन द्यावे.   युवा शेतकरी सन्मान पुरस्कार   या कार्यक्रमात अॅग्रोवन युवा सन्मान पुरस्काराचे वितरण यावेळी पूर्वा केमटेकचे व्यवस्थापकीय संचालक संजय पवार, मधमाशी उद्योजक नानासाहेब इंगळे, अॅग्रोवनचे मुख्य उपसंपादक अमित गद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यात शरद पवार (हरंगूळ,जि.लातूर), साधना दीपक देशमुख (गोंदेगाव,जि.लातूर), दिलीप अंभुरे (वर्णा,जि.परभणी), ज्ञानेश्वर देशमाने (मंगरुळ,जि.परभणी), आनंद शिनगारे (वालूर,जि.परभणी), मुक्ता झाडे,मुरुंबा,जि.परभणी), विठ्ल सिराळ (मांडाखळी,जि.परभणी), मंगेश देशमुख (पेडगाव,जि.परभणी), पंडित थोरात (खानापूर,जि.परभणी), गणेश बुरकुल (टाकळी माळी,जि.औरंगाबाद) त्यात या शेतकऱयांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com