Agriculture story in marathi agrowon exhibition 2019 | Agrowon

मधमाशीपालन उद्योगात तरुणांना संधी -संजय पवार यांचे मत

टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 डिसेंबर 2019

औरंगाबाद ः महाराष्ट्रात मधमाशी पालन उद्योगास भरपूर संधी आहेत. गावागावातील तरुणांनी मधमाशीप्रमाणे कामाची विभागणी करुन काम केले तर मधुक्रांती शक्य आहे, असे प्रतिपादन पूर्वा केमटेकचे व्यवस्थापकीय संचालक संजय पवार यांनी केले.

औरंगाबाद ः महाराष्ट्रात मधमाशी पालन उद्योगास भरपूर संधी आहेत. गावागावातील तरुणांनी मधमाशीप्रमाणे कामाची विभागणी करुन काम केले तर मधुक्रांती शक्य आहे, असे प्रतिपादन पूर्वा केमटेकचे व्यवस्थापकीय संचालक संजय पवार यांनी केले.

अॅग्रोवनतर्फे आयोजित कृषी प्रदर्शनामध्ये मधमाशी पालन एक पुरक उद्योग या विषयावर परिसंवादामध्ये श्री. पवार आणि मधीमाशीपालक शेतकरी नानासाहेब इंगळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी श्री. पवार बोलत होते. ते म्हणाले मधमाशी उद्योगास भारतातील मधाचे उत्पादन 1.25 लाख टन आहे. एकट्या 30 टक्के उत्पादन पंजाबमध्ये होते. फक्त 1 ते 2 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. मधमाशी पालनाची भिती, जाणीव जागृती नाही. त्यामुळे हा प्रश्न आहे. जास्त तापमानात मधमाशी तग धरु शकत नाही. या उद्योगात परागीभवन खूप महत्वाचे आहे. हिमाचल प्रदेशात एक लाख हेक्टर सफरचंद लागवड आहे. परागीभवनासाठी मधमाश्यांची गरज आहे. परागीभवनासाठी मधपेट्या वापरल्या जातात. शेतक-यांनी एकत्र येऊन मधमाशीपालन सुरु करावे लागेल. राज्यात किमान एक लाख मधपेट्या लागतील. मधमाशी पालक हा शेतकरी उद्योजक आहे. प्रशिक्षण घेऊनच मधमाशी पालन सुरु करावे. तरुणांना त्यात सर्वाधिक संधी आहे.

एक गाव- एक ब्रॅड हि संकल्पना खूप महत्वाची आहे. तरुण शेतक-यांनी गटाने एकत्रित येऊन एका गावात किमान 500 मधपेट्या ठेवाव्यात. या उद्योगासाठी शेवगा, आवळा, सूर्यफूल, बाजरी, मका, मोहरी, तीळ, कोथिंबिर, तूर, वाल या पीकांची लागवड करणे अनिवार्य आहे, असेही ते म्हणाले.
 
मधमाशी उद्योग वाढीसाठी सूर्यफुल,
करडई लागवडीसाठी प्रोत्साहनाची गरज ःइंगळे

 
याच चर्चासत्रात देऊळगावसिध्दी (जि.नगर) येथील मधमाशीपालक उद्योजक नानासाहेब इंगळे यांनीही मार्गदर्शन केले. ते म्हणाले, महाराष्ट्रात मधमाशीपालन उद्योगाचा विस्तार होत आहे. पोकरा अंतर्गंत मधमाशी उद्योगाचा समावेश असल्यामुळे यासाठी अनुदान मिळू शकते. खादी ग्रामउद्योग महामंडाळामार्फत यासाठी प्रशिक्षण दिले जाते. शेतक-यांच्या उत्पन्न वाढीसाठी हा उद्योग महत्वाचा ठरत आहे. सूर्यफुलाची लागवड कमी झाल्यामुळे मधाचे उत्पादन घटले. त्यामुळे सूर्यफुलाचे लागवड क्षेत्र वाढवावे लागणार आहे. शासनाने सूर्यफूल, करईड या तेलबिया पीकांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन द्यावे.
 
युवा शेतकरी सन्मान पुरस्कार
 
या कार्यक्रमात अॅग्रोवन युवा सन्मान पुरस्काराचे वितरण यावेळी पूर्वा केमटेकचे व्यवस्थापकीय संचालक संजय पवार, मधमाशी उद्योजक नानासाहेब इंगळे, अॅग्रोवनचे मुख्य उपसंपादक अमित गद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यात शरद पवार (हरंगूळ,जि.लातूर), साधना दीपक देशमुख (गोंदेगाव,जि.लातूर), दिलीप अंभुरे (वर्णा,जि.परभणी), ज्ञानेश्वर देशमाने (मंगरुळ,जि.परभणी), आनंद शिनगारे (वालूर,जि.परभणी), मुक्ता झाडे,मुरुंबा,जि.परभणी), विठ्ल सिराळ (मांडाखळी,जि.परभणी), मंगेश देशमुख (पेडगाव,जि.परभणी), पंडित थोरात (खानापूर,जि.परभणी), गणेश बुरकुल (टाकळी माळी,जि.औरंगाबाद) त्यात या शेतकऱयांचा समावेश आहे.


फोटो गॅलरी

इतर इव्हेंट्स
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : अद्ययावत...औरंगाबाद ः ‘‘‘सकाळ-ॲग्रोवन’ने आयोजित केलेल्या...
नैसर्गिक शेतीची पंचसूत्री अमलात आणा :...औरंगाबाद ः माती, पाणी, जातिवंत बियाणे, पीक नियोजन...
मधमाशीपालन उद्योगात तरुणांना संधी -संजय...औरंगाबाद ः महाराष्ट्रात मधमाशी पालन उद्योगास...
अॅग्रोवन’ कृषी प्रदर्शनास अलोट गर्दी...औरंगाबाद : २६ लाखांच्या अजस्त्र ‘बॅक हो लोडर’...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : शेतकऱ्यांचा...औरंगाबाद ः माती आणि पाणी परीक्षणाविषयी...
जादा उत्पन्नासाठी शेतमालाचे मूल्यवर्धन...औरंगाबाद ः शेतीमालाच्या उत्पादनामध्ये जितकी काळजी...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : पारस, एमव्हीएस...पारस ग्रुपच्या स्टॉलवर शेतकऱ्यांची गर्दी ...
कृषी विद्यापीठाने मांडले एकात्मिक...औरंगाबाद ः प्रदर्शनामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा...
कृषी विभागाच्या दालनावर योजनांसह कीड-...औरंगाबाद ः कृषी प्रदर्शनामध्ये जिल्हा परिषदेचा...
पायाभूत सुविधा दिल्यास कर्जमाफीची गरज...औरंगाबाद : कर्जमाफी झाली तरी पुढच्या हंगामात...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : यंत्रे, अवजारे...औरंगाबाद ः मजुरांच्या समस्येवर मात करण्यासाठी...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन :शेतकरी गट, बचत...औरंगाबाद ः सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेली...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : नवे तंत्रज्ञान...सकाळ - ॲग्रोवनच्या वतीने आयोजित भव्य कृषी...
पोपटराव पवार यांच्या हस्ते आज उद्‍घाटन औरंगाबाद: ‘सकाळ ॲग्रोवन’च्या भव्य कृषी...
औरंगाबाद येथे २७ पासून ॲग्रोवन कृषी...पुणे  : शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान व माहितीचा...
एकात्मिक कीडरोग व्यवस्थापनातून...नाशिक : पॉलिहाउस मध्ये वर्षानुवर्ष एकच पीक...
जलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...
शाश्वतता, जागतिक दर्जा, विस्तारीकरण ...पुणे ः कोणताही उद्योग शाश्वत असायला हवा, तुमची...
‘सकाळ रिलीफ फंडा’ची पूरग्रस्तांना एक...पुणे ः कोल्हापूर, सांगली, सातारा भागांत...
पाणी व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यास...नाशिक : जमिनीची सुपीकता वाढवण्याबरोबर योग्य पाणी...