अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : फळरोपांबद्दल माहिती घेत रोपे खरेदी

सीताफळाच्या वाणाची माहिती घेताना शेतकरी.
सीताफळाच्या वाणाची माहिती घेताना शेतकरी.

औरंगाबाद ः शाश्वत उत्पन्नासाठी फळपिकांची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा ओढा आहे. प्रदर्शनात कमी पाण्यावर येणाऱ्या सीताफळ, पेरू यांसारख्या फळरोपांची खरेदी आणि माहिती घेण्यासाठी शेतकरी आवर्जून या स्टॅालला भेट देत होते. मराठवाड्यासह विदर्भातील शेतकऱ्यांची संख्या अधिक होती. साहजिकच, कृषी प्रदर्शनातील फळरोपांच्या या दालनावर शेतकऱ्यांची चांगलीच वर्दळ दिसत होती. कृषी प्रदर्शनामध्ये सीताफळ, पेरू, केळी या फळांची रोपे, फळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कमी पाण्यावर किफायतशीर उत्पादन मिळत असल्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी सीताफळ लागवडीकडे वळत आहेत. प्रदर्शनामध्ये सीताफळाच्या जवळपास दहा प्रकारच्या वाणांच्या रोपे उपलब्ध आहेत. मोठ्या आकाराची फळे, टिकाऊपणा आदी कारणांनी सीताफळाच्या संकरित वाणांचे लागवड क्षेत्र वाढत आहे. गेल्या काही वर्षांत मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा कल पेरू लागवडीकडेही वाढला आहे. त्यामुळे सीताफळ, पेरूच्या रोपांबाबतही या दालनांवर विचारणा केली जात होती. या रोपांच्या दालनाला भेट दिल्यानतंर तिथे फळांची लागवड तंत्रज्ञान, विविध वाण, दर्जेदार रोपांची उपलब्धता आदींबाबत माहिती समजून घेत होते. तसेच आमच्या भागात येईल का, त्याचे उत्पन्न किती, मार्केट काय, यांसारखे प्रश्नही विचारत होते. दर्जेदार उत्पादनासाठी केळीमध्ये उतिसंर्वधित रोपांची विचारणा होत होती. उच्च पोषणमूल्याच्या महत्त्वामुळे अळिंबी स्टॅालवरही शेतकरी माहिती घेत होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com