आज महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीतील समस्या वाढत आहेत.
इव्हेंट्स
नैसर्गिक शेतीची पंचसूत्री अमलात आणा : सुभाष शर्मा
औरंगाबाद ः माती, पाणी, जातिवंत बियाणे, पीक नियोजन, श्रम ही नैसर्गिक शेतीची पंचसूत्री आहे. सरकारने नैसर्गिक शेतीचे महत्त्व ओळखून धोरणे निश्चित करणे आवश्यक आहे. भविष्यातील शेतीसमोरील संकटे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळले पाहिजे, असे प्रतिपादन नैसर्गिक शेतीचे अभ्यासक तथा शेतकरी सुभाष शर्मा (यवतमाळ) यांनी केले.
औरंगाबाद ः माती, पाणी, जातिवंत बियाणे, पीक नियोजन, श्रम ही नैसर्गिक शेतीची पंचसूत्री आहे. सरकारने नैसर्गिक शेतीचे महत्त्व ओळखून धोरणे निश्चित करणे आवश्यक आहे. भविष्यातील शेतीसमोरील संकटे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळले पाहिजे, असे प्रतिपादन नैसर्गिक शेतीचे अभ्यासक तथा शेतकरी सुभाष शर्मा (यवतमाळ) यांनी केले.
ॲग्रोवनच्या वतीने आयोजित कृषी प्रदर्शनात नैसर्गिक शेतीचे अनुभव सांगताना श्री. शर्मा म्हणाले, पृथ्वीची निर्मिती म्हणजे शेती. सूर्य म्हणजे शेती. जीवन म्हणजे शेती. सूर्यशक्ती, माती आणि पाणी समजून घेणे म्हणजे शेती. शाश्वत शेतीसाठी नैसर्गिक शेतीवर भर द्यावा लागेल. पशुपालन हा शेतीचा आत्मा असून, त्याशिवाय शेतीला बळकटी येऊ शकत नाही. शेणामुळे जमिनीची सुपीकता वाढते. रासायनिक खतांमुळे नाही. शेणामुळे जमिनीत जैविक घटकांची वाढ झाली. निसर्गात फवारणीची कुठेही व्यवस्था नाही. निसर्गात हजारो अन्नसाखळ्या आहेत. संपूर्ण सजीवांची व्यवस्था म्हणजे शेती. शेती पद्धतीमध्ये बदल न केल्यास येत्या पाच वर्षांत शेतकऱ्यांना संकटाला जावे लागेल. त्यामुळे पाणी, हवा, माती या घटकांना समजून घ्यावे लागेल. रासायनिक शेतीमुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यासाठी नैसर्गिक शेती महत्त्वाची आहे. नैसर्गिक शेतीसाठी गोपालन महत्त्वाचे आहे. नैसर्गिक निर्मिती जनावरांच्या शेण आणि मूत्राचा योग्य प्रमाणात वापर करावा. संकरित जनावरांचे शेण, मूत्र वापरू नये. शेतीला शाश्वत करण्यासाठी शेतात झाडे लावावीत. भविष्यात झाडाशिवाय शेती नाही. एकरी पाच वृक्ष लावावेत, वृक्षामुळे पक्षी येतात.
...तर पाणी उत्पादन वाढेल
शासनाने नैसर्गिक शेती पद्धतीबाबत धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. एक टिएमसी पाणीसाठवण क्षमतेचे धरण बांधण्यासाठी सरकार एक हजार कोटी रुपये खर्च करते. परंतु, नैसर्गिक शेती पद्धतीने कमी खर्चात पाणी साठविणे शक्य आहे. शेती हा आनंदाचा विषय आहे, आत्महत्येचा नव्हे. श्रमाने आनंदाची शेती उभी करुया, असेही शर्मा यांनी नमूद केले.
युवा शेतकरी सन्मान पुरस्कार
या वेळी श्री. शर्मा आणि ॲग्रोवनचे मुख्य उपसंपादक अमित गद्रे यांच्या हस्ते युवा शेतकरी सन्मान पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यात गणेश रेवगडे (देळेगव्हाण, जि. जालना), नवनाथ फुके (उमरखेडा, जि. जालना), शरद सवडे (नांदखेड, जि. जालना), वैशाली घुगे (अणदूर, जि. उस्मानाबाद), महेश जमाले (कसबे तडवळे, जि. उस्मानाबाद), बापू लहाने (देव धानोरा, जि. उस्मानाबाद), अर्चना भोसले (देवीसिंगा तूळ, जि. उस्मानाबाद), शिवाजी नवगिरे (बारुळ, जि. उस्मानाबाद), मीरा फड (कुंभारी, जि. लातूर), सचिन चिंते (घारोळा, जि. लातूर) यांचा समावेश होता.
फोटो गॅलरी
- 1 of 5
- ››